Paytm वर होऊ शकतात Bitcoinचे व्यवहार, पाहा पेटीएमच्या महत्त्वाच्या अधिकाऱ्याने काय सांगितले

Bitcoin : पेटीएमचे सीएफओ मधुर देवडा यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की जर सरकारने जर परवानगी दिली तर ते बिटकॉइनची विक्री पेटीएमद्वारे करणार आहेत. जर भारतात क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांना मंजूरी मिळाली तर पेटीएम या व्यवहारांवर लक्ष केंद्रीत करणार आहे.

Paytm
पेटीएमवर क्रिप्टोकरन्सी 
थोडं पण कामाचं
  • पेटीएमचा जवळपास १८,००० कोटी रुपयांचा आयपीओ लवकरच बाजारात
  • पेटीएम क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार करण्यास इच्छुक
  • आरबीआयने परवानगी दिल्यास बिटकॉइनची खरेदी विक्री पेटीएमवर करता येणार

Paytm | नवी दिल्ली : डिजिटल व्यवहार आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेली पेटीएम (Paytm)शेअर बाजारात आपला आयपीओ (Initial public offer) आणते आहे. पेटीएमचा हा आयपीओ जवळपास १८,००० कोटी रुपयांचा आहे. याच महिन्यात हा आयपीओ बाजारात येणार आहे. दरम्यान पेटीएमच्या सीएफओने केलेल्या विधानामुळे बाजारात चर्चाना उधाण आले आहे. पेटीएमवर क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार होतील असे पेटीएमच्या सीएफओने म्हटले आहे. यामुळे एकच खळबळ माजली आहे. अर्थात पेटीएमवर होणारी बिटकॉइनची विक्री ही रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाची मंजूरी मिळाल्यानंतर होणार आहे. (Paytm : Transaction of Bitcoin will be done on Paytm, says Paytm CFO)

मंजूरी मिळाल्यास करणार क्रिप्टोकरन्सीचे व्यवहार

पेटीएमचे सीएफओ मधुर देवडा यांनी ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की जर सरकारने जर परवानगी दिली तर ते बिटकॉइनची विक्री पेटीएमद्वारे करणार आहेत. त्यांनी म्हटले की या क्रिप्टोकरन्सीवर सध्या प्रतिबंध आहे. जर भारतात क्रिप्टोकरन्सीच्या व्यवहारांना मंजूरी मिळाली तर पेटीएम या व्यवहारांवर लक्ष केंद्रीत करणार आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने मार्च २०२० मध्ये क्रिप्टोकरन्सीवर बंदी घातली होती. अर्थात सरकार यासाठी तयार नव्हते. मात्र आरबीआयने या बंदीचे समर्थन केले होते.

पेटीएमची भांडवल उभारणी

याचदरम्यान पेटीएमने आपल्या सुरूवातीच्या शेअर विक्रीतून बुधवारी अॅंकर गुंतवणुकदारांकडून ८,२३५ कोटी रुपयांचे भांडवल उभारले आहे. पेटीएमने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की त्यांनी अॅंकर गुंतवणुकदारांद्वारे म्हणजे ब्लॅकरॉक, सीपीपी बोर्ड, बिर्ला एमएफ आणि इतर गुंतवणुकदारांद्वारे भांडवलाची उभारणी केली आहे. ब्लॅकरॉकने १,०४५ कोटी रुपये, कॅनडा पेन्शन योजना गुंतवणूक बोर्डाने ९३८ रुपये आणि जीआयसीने ५३३ कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. पेटीएमचा आयपीओ ८ नोव्हेंबरला खुला होणार आहे. इक्विटीसाठी किंमतपट्टा २,०८०-२,१५० रुपये प्रति शेअर ठेवण्यात आला आहे.

पेटीएमचा आयपीओ

समोर आलेल्या माहितीनुसार पेटीएमची मुख्य प्रवर्तक कंपनी One97 Communications Ltd चा हा आयपीओ असणार आहे. हा आयपीओ ८ नोव्हेंबर खुला होणार आहे. तर १० नोव्हेंबर ही त्याची अंतिम तारीख आहे. म्हणजेच सर्वसामान्य गुंतवणुकदारांना यामध्ये ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान गुंतवणूक करता येणार आहे. शेअर बाजारात पेटीएमची लिस्टिंग १८ नोव्हेंबरला होण्याची शक्यता आहे. 

पेटीएम आपला आयपीओ बाजारात आणते आहे. म्हणजेच पेटीएमची नोंदणी शेअर बाजारात होणार आहे. हा देशातील आतापर्यतचा सर्वात मोठा आयपीओ असणार आहे. पेटीएम आयपीओच्या (Paytm IPO)  माध्यमातून तब्बल १८,००० कोटी रुपयांची उभारणी करणार आहे. पेटीएम आज देशातील सर्वाधिक लोकप्रिय युपीआय अॅप आहे.

मुहुर्त ट्रेडिंग  (Diwali Muhurat)ही एक खास परंपरा शेअर बाजारात दिवाळीच्या काळात साजरी केली जाते. आज ट्रेडिंग सेशनची वेळ संध्या. ६:१५ वाजेपासून ते ७:१५ वाजेपर्यत होती. या दरम्यान शेअर बाजारात तेजीने सुरूवात झाली. शेवटी सेन्सेक्स २९५.७० अंशांनी वधारून ६०,०६७.६२ अंशांवर बंद झाला. निफ्टीमध्ये देखील तेजी नोंदवण्यात आली. निफ्टी ९१.८० अंशांनी वधारून १७,९२१ अंशांवर बंद झाला. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी