लोक या दिवसांत काढत आहेत एटीएममधून अधिक पैसे, जाणून घ्या काय आहे यामागचे कारण

बँकेच्या शाखा आणि एटीएममधून रोख रक्कम काढण्याचे प्रमाण आर्थिक वर्ष २०२१मध्ये आत्तापर्यंत बरेच वाढले आहे. चलनात येणाऱ्या नोटांमध्ये २१% दराने वृद्धी झाली आहे जो एका दशकातील सर्वोच्च स्तर आहे.

People are withdrawing more money
आर्थिक वर्ष २०२१मध्ये रोख पैसे काढण्यात झाली वाढ 

थोडं पण कामाचं

  • अर्थव्यवस्थेसोबत वाढतो रोखीचा स्तर
  • गेल्या नोव्हेंबरपासून रोख काढण्याच्या प्रमाणात १०% वाढ
  • जाणून घ्या का काढले जात आहेत एटीएममधून अधिक पैसे

नवी दिल्ली: बँकेच्या शाखा (Bank branches) आणि एटीएममधून (ATM machines) रोख रक्कम काढण्याचे प्रमाण (cash withdrawals) आर्थिक वर्ष (financial year) २०२१मध्ये आत्तापर्यंत बरेच वाढले (drastic increase) आहे. चलनात येणाऱ्या नोटांमध्ये (currency notes) २१% दराने वृद्धी (rise) झाली आहे जो एका दशकातील सर्वोच्च स्तर (highest level in decade) आहे. आरबीआयच्या आकडेवारीतून (RBI statistics) ही माहिती समोर आली आहे.

अर्थव्यवस्थेसोबत वाढतो रोखीचा स्तर

एका अर्थव्यवस्थेत रोख रकमेचा स्तर हा अर्थव्यवस्थेसोबतच वाढतो. रोख पैसे काढण्याच्या प्रमाणात वाढ जमाखोरीमुळे झालेली असो किंवा सामान्य असो, रोख आणि जीडीपीचे गुणोत्तर हे एक अधिक अचूक परिमाण आहे. हे प्रमाण नोटबंदीनंतर आलेल्या मंदीनंतर आर्थिक वर्ष २०१२मध्ये १२%च्या सरासरी प्रमाणावर परत आले. पण चलनाच्या होल्डिंग्समध्ये नुकत्याच झालेल्या वाढीचा अर्थ आहे की हे प्रमाण आर्थिक वर्ष २०२१मध्ये जीडीपीच्या १४ ते १५%पर्यंत वाढू शकते.

गेल्या नोव्हेंबरपासून रोख काढण्याच्या प्रमाणात १०% वाढ

गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून रोख रक्कम काढण्याच्या प्रमाणात साधारण १०% वाढ झाली आहे. तर यूपीआय पेमेंटमध्ये यादरम्यान साधारण २०% इतकी वाढ झाली आहे. डिजिटल व्यवहारांमध्ये वाढ आणि यूपीआय देवाणघेवाणींचे प्रमाण दोन अरबवर पोहोचले आहे, तरीही एटीएममधून काढण्यात आलेल्या रोख रकमेचे प्रमाण अधिकच आहे.

काय आहे सरासरी तिकीट साईज?

जर सरासरी तिकीट साईजबद्दल बोलायचे झाले तर आरबीआयच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर २०१९मध्ये यूपीआय व्यवहारांमध्ये सरासरी तिकीट साईज १५४९ रुपये होता जो ऑगस्ट २०२०मध्ये १८५० रुपये झाला. तर एटीएममधून पैसे काढण्याबद्दल बोलायचे झाले तर नोव्हेंबर २०१९मध्ये सरासरी तिकीट साईज ४५०७ होता जो ऑगस्ट २०२०मध्ये ४९५९ रुपये झाला.

जाणून घ्या का काढले जात आहेत एटीएममधून अधिक पैसे

  1. कोरोना विषाणूच्या संकटाच्या सुरुवातीच्या काळात आणि लॉकडाऊनदरम्यान देशवासियांनी एटीएममधून खूप कमी पैसे काढले. त्यांनी आपल्या मूलभूत गरजांसाठीच पैसे काढले आणि रोख राखून ठेवली. मार्चच्या शेवटी आणि एप्रिल-मे या महिन्यांत देवाणघेवाण खूप कमी राहिली. यानंतर जून महिन्यापासून या परिस्थितीत हळूहळू सुधारणा होत गेली. लॉकडाऊनमधील निर्बंध शिथिल झाले आणि अर्थव्यवस्था सैलावू लागली. त्यामुळे लोक आपल्या मूलभूत खर्चांव्यतिरिक्तही इतर खर्चांसाठी एटीएममधून पैसे काढू लागले.
  2. लॉकडाऊनदरम्यान लोकांना मौजमजा करण्याची संधी मिळाली नव्हती. त्यामुळे सणासुदीचे दिवस आल्यावर लोसांनी स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी आणि आपल्या घरासाठी खरेदी करण्यासाठी एटीएममधून पैसे काढले.
  3. यादरम्यान असाही एक ट्रेंड पाहण्यात आला की लोकांनी एटीएममधून १०० ते ३०० रुपये किंमतीची छोटी रक्कम खूप कमी काढली. याचे मोठे कारण असे आहे की लोकांनी या कमी रकमेच्या व्यवहारांसाठी यूपीआय आणि डिजिटल पेमेंट वापरले.
  4. कोरोनाच्या संकटाचा धोका जास्त असताना आणि लॉकडाऊनदरम्यान लोक घराबाहेर पडताना घाबरत होते. ऑफिसमध्ये जाण्याऐवजी घरातूनच काम करण्यास (वर्क फ्रॉम होम) त्यांचे प्राधान्य होते. यानंतर जेव्हा अर्थव्यवस्थेतील हालचाल वाढली आणि लोकांची कोरोनाची भीती कमी झाली तेव्हा त्यांनी त्यांच्या गरजांसाठी पैसे खर्च करण्यास सुरुवात केली.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी