पेट्रोल-डिझेल सलग चौथ्या दिवशीही स्वस्त, पाहा मुंबईत काय आहे दर

काम-धंदा
Updated Oct 06, 2019 | 13:58 IST

Petrol-Diesel Rate: गेले काही दिवस सतत वाढणारे पेट्रोल आणि डिझेल दर आता काहीसे कमी झाले आहेत. मागील चार दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर हे कमी होत आहेत. 

petrol diesel is also cheaper for the fourth consecutive day see what are the prices in Mumbai
पेट्रोल-डिझेल सलग चौथ्या दिवशीही स्वस्त, पाहा मुंबईत काय आहे दर  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पेट्रोल आणि डिझेल स्वस्त, दरात करण्यात आली कपात 
  • सलग चौथ्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात 
  • राजधानी दिल्लीसह प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल झालं स्वस्त 

मुंबई: गेल्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलचे दर सतत वाढत असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे मुंबईत पेट्रोल ८० रुपयांच्या घरात पोहचलं होतं. पण मागील चार दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत कपात होत असून आता मुंबईत पेट्रोलचे ८० रुपयांच्या खाली आले आहेत. तर तिकडे राजधानी दिल्लीमध्ये देखील पेट्रोलचे दर हे ७४ रुपयांपर्यंत उतरले आङेत. यामुळे नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पेट्रोल-डिझेल दर वाढल्यास त्याचा मोठ्या प्रमाणात फटका हा सरकारला देखील बसू शकतो. पण तूर्तास तरी पेट्रोल-डिझेलचे दर हे कमी झाले आहेत. 

तेल वितरण कंपन्यांनी देशातील चार प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर हे रविवार १२ ते १६ पैशांनी कमी केले आहेत. त्यामुळे मुंबईत आज पेट्रोलचे दर हे प्रति लीटर ७९.५० रुपये एवढे आहेत तर डिझेलचे दर ७०.२७ रुपये लीटर एवढे आहेत. पेट्रोल आणि डिझेलचे दर हे गेल्या चार दिवसांपासून सतत कमी होत आहेत. त्यामुळे चालकांना दिलासा मिळाल आहे. मुंबईप्रमाणेच राजधानी दिल्लीत देखील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घट झाली तिथे पेट्रोलचे दर हे ७८.८९ रुपये आणि डिझेलचे दर ६७.०३ रुपये प्रति लीटर एवढे आहेत. 

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, देशातील चार प्रमुख महानगरं दिल्ली, कोलकता, मुंबई आणि चेन्नईमध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग चौथ्या दिवशी कपात झाली आहे. पाहा या प्रमुख महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत. 

  1. मुंबई - पेट्रोल प्रति लीटर - ७९.५० रुपये, डिझेल प्रति लीटर - ७०.२७ रुपये प्रति लीटर 
  2. दिल्ली - पेट्रोल प्रति लीटर - ७३.८९ रुपये, डिझेल प्रति लीटर - ६७.०३ रुपये प्रति लीटर 
  3. कोलकाता - पेट्रोल प्रति लीटर - ७६.५३ रुपये, डिझेल प्रति लीटर - ६९.३९ रुपये प्रति लीटर  
  4. चेन्नई - पेट्रोल प्रति लीटर -  ७६.७४ रुपये, डिझेल प्रति लीटर - ७१.८१ रुपये प्रति लीटर 

पेट्रोलच्या दरात आज (रविवार) मुंबई आणि दिल्लीमध्ये १५ पैसे प्रति लीटर  घट झाली आहे. तर कोलकातामध्ये १४ पैसे आणि चेन्नईमध्ये १६ पैसे प्रति लीटर स्वस्त झालं आहे. तर मुंबई, दिल्ली आणि कोलकातामध्ये डिझेलच्या दरात १२ पैसे प्रति लीटर कपात करण्यात आली आहे. तर चेन्नईमध्ये १३ पैसे प्रति लीटर घट झाली आहे.  

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...