Petrol, Diesel Price : कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट; तरीही पेट्रोलचे दर शंभरी पार? जाणून घ्या आपल्या शहरातील आजचे इंधन दर?

काम-धंदा
भरत जाधव
Updated Nov 26, 2021 | 14:56 IST

देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती सलग 22व्या दिवशी बदललेल्या नाहीत. शुक्रवारी म्हणजेच, 26 नोव्हेंबर 2021 रोजी देशात ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी तेलाच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

Big fall in crude oil prices,Still petrol prices exceed 100
कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी घट, पण इंधनाचे दर काय?  

Petrol, Diesel Price Today: देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती सलग 22व्या दिवशी बदललेल्या नाहीत. शुक्रवारी म्हणजेच, 26 नोव्हेंबर 2021 रोजी देशात ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी तेलाच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्याने घट होत असल्याचे दिसत आहे. आंतरराष्ट्रीय तेल मानक ब्रेंट क्रूड गुरुवारच्या व्यापारात 0.38 टक्क्यांनी घसरून 81.94 डॉलर प्रति बॅरलवर आले. दुसरीकडे, ब्रेंट क्रूड ऑइल फ्युचर्स 0.36 टक्क्यांनी घसरून प्रति बॅरल 81.95 डॉलरवर आले. 

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलची किंमत (Petrol Price) 103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरने आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकले जात आहे. 

महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. पुण्यातही पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे. 

महाराष्ट्रातील इतर शहारातील आजचे पेट्रोलचे दर 

शहर आजचे पेट्रोलचे दर कालचे पेट्रोलचे दर
अहमदनगर ₹ 109.56 (-0.53) ₹ 110.09
अकोला ₹ 110.19 (0.45) ₹ 109.74
अमरावती ₹ 110.82 (-0.3) ₹ 111.12
औरंगाबाद ₹ 110.92 (0.88) ₹ 110.04
भंडारा ₹ 110.60 (0.27) ₹ 110.33
बीड ₹ 111.11 (1.22) ₹ 109.89
बुलढाणा ₹ 110.45 (-0.04) ₹ 110.49
चंद्रपूर ₹ 110.11 (-0.25) ₹ 110.36
धुळे ₹ 110.46 (0.57) ₹ 109.89
गडचिरोली ₹ 110.96 (0.33) ₹ 110.63
गोंदिया ₹ 111.14 (-0.22) ₹ 111.36
मुंबई शहर ₹ 109.98 (-0.01) ₹ 109.99
हिंगोली ₹ 111.43 (0.63) ₹ 110.80
जळगाव ₹ 111.30 (1.16)  ₹ 110.14
जालना ₹ 111.55 (-0.06) ₹ 111.61
कोल्हापूर ₹ 109.86 (-1.19) ₹ 111.05
लातूर ₹ 111.44 (0.33) ₹ 111.11
मुंबई  उपनगर ₹ 109.98 (0) ₹ 109.98
नागपूर ₹ 110.06 (0.35) ₹ 109.71
नांदेड ₹ 112.34 (-0.07) ₹ 112.41
नंदुरबार ₹ 110.67 (-0.1) ₹ 110.77
नाशिक ₹ 110.13 (0.46) ₹ 109.67
उस्मानाबाद ₹ 110.63 (-0.19) ₹ 110.82
पालघर ₹ 109.49 (-0.87) ₹ 110.36
परभणी ₹ 113.13 (0.59) ₹ 112.54
पुणे ₹ 109.74 (-0.33) ₹ 110.07
रायगड ₹ 109.84 (0.09) ₹ 109.75
रत्नागिरी ₹ 111.67 (0.13) ₹ 111.54
सांगली ₹ 109.65 (0) ₹ 109.65
सातारा ₹ 110.59 (0.18) ₹ 110.41
सिंधुदुर्ग ₹ 111.58 (-0.09) ₹ 111.67
सोलापूर ₹ 110.19 (-0.16) ₹ 110.35
ठाणे ₹ 110.35 (0.78) ₹ 109.57
वर्धा ₹ 110.38 (-1.23) ₹ 111.61
वाशिम ₹ 110.54 (0.32) ₹ 110.22
यवतमाळ ₹ 111.41 (0.52) ₹ 110.89

महाराष्ट्रातील इतर शहारातील आजचे डिझेलचे दर 

शहर आजचे डिझेलचे दर कालचे डिझेलचे दर
अहमदनगर ₹ 92.36 (-0.5)     ₹ 92.86
अकोला ₹ 92.99 (0.44) ₹ 92.55
अमरावती ₹ 93.60 (-0.28) ₹ 93.88
औरंगाबाद ₹ 93.66 (0.84) ₹ 92.82
भंडारा ₹ 93.38 (0.26) ₹ 93.12
बीड ₹ 93.85 (1.17) ₹ 92.68
बुलढाणा ₹ 93.24 (-0.03) ₹ 93.27
चंद्रपूर ₹ 92.93 (-0.23) ₹ 93.16
धुळे ₹ 93.23 (0.55) ₹ 92.68
गडचिरोली ₹ 93.74 (0.32) ₹ 93.42
जळगाव ₹ 94.03 (1.11) ₹ 92.92
गोंदिया ₹ 93.90 (-0.22) ₹ 94.12
मुंबई शहर ₹ 94.14 (-0.02) ₹ 94.16
हिंगोली ₹ 94.18 (0.61) ₹ 93.57
जालना ₹ 94.27 (-0.06) ₹ 94.33
कोल्हापूर ₹ 92.67 (-1.14) ₹ 93.81
लातूर ₹ 94.18 (0.32) ₹ 93.86
मुंबई उपनगर ₹ 94.14 (0) ₹ 94.14
नागपूर ₹ 92.86 (0.33) ₹ 92.53
नांदेड ₹ 95.05 (-0.06) ₹ 95.11
नंदुरबार ₹ 93.43 (-0.1)      ₹ 93.53
नाशिक ₹ 92.90 (0.44) ₹ 92.46
उस्मानाबाद ₹ 93.40 (-0.18) ₹ 93.58
पालघर ₹ 92.26 (-0.84) ₹ 93.10
परभणी ₹ 95.78 (0.56) ₹ 95.22
पुणे ₹ 92.53 (-0.31) ₹ 92.84
रायगड ₹ 92.59 (0.08) ₹ 92.51
रत्नागिरी ₹ 94.41 (0.13) ₹ 94.28
सांगली ₹ 92.47 (0) ₹ 92.47
सातारा ₹ 93.34 (0.15) ₹ 93.19
सिंधुदुर्ग ₹ 94.33 (-0.08) ₹ 94.41
सोलापूर ₹ 92.97 (-0.16) ₹ 93.13
ठाणे ₹ 93.08 (0.75) ₹ 92.33
वर्धा ₹ 93.06 (-0.12) ₹ 93.18
वाशिम ₹ 93.54 (0.22) ₹ 93.32
यवतमाळ ₹ 93.62 (-0.54) ₹ 94.16


पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी सरकारचा मेगाप्लान 

पेट्रोलियम मंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी करण्यासाठी भारत सरकारचा राखीव पेट्रोलियम साठ्यातून (स्ट्रैटेजिक पेट्रोलियम रिझर्व्ह) 50 लाख बॅरेल कच्चं तेल रिलीज केले जाणार आहे. दरम्यान, हे रिलीज करण्यापूर्वी सरकार अमेरिका, चीन, जपान आणि दक्षिण कोरिया यांसारख्या मोठ्या ग्राहकांचा विचार करण्यात येणार आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरही https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर  सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी