Petrol-Diesel Price Today : नवी दिल्ली : देशात पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel )वाढत्या दरांनी सर्वसामान्यांच्या खिसा खाली होऊ लागला आहे. आजही सरकारी तेल कंपन्यांनी (oil companies) पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ केली आहे. आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत 80 पैशांची वाढ झाली आहे तर आज सीएनजीनेही आपला भाव वाढवला आहे. दरम्यान तेल कंपन्यांनी वाढवलेल्या दरानुसार, आज मुंबईत प्रति लिटर पेट्रोल 120.51 रुपये आणि प्रति लिटर डिझेल 104.77 रुपयांवर पोहोचलं आहे. तर दिल्लीत पेट्रोलची किंमत 105.41 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 96.67 रुपयांवर पोहोचलं आहे. पेट्रोल-डिझेलचे दर वाढल्यानंतर आता सीएनजीनेही आपला भाव वाढवला असून सीएनजी सीएनजीमध्ये 1 रुपयांची दरवाढ झाली आहे.
या वाढीनुसार आज सीएनजी 67 रुपये किलो झाला आहे. आठवड्याभरातच पुण्यात सीएनजीमध्ये मोठी वाढ झाली आहे. आजपासून सीएनजीत 5 रुपये 80 पैशाची वाढ झाली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विशिष्ट गॅसची किम्मत दुप्पट झाल्याने मोठा परिणाम दिसून येत आहे. 1 एप्रिलपासून राज्य सरकारने सीएनजी 6 रुपयांनी कमी केला होता. मात्र आठवड्यातच सीएनजी दर जैसे थेच आहेत. सीएनजी वाहनधारकांना आजपासून 68 रुपयांनी सीएनजी गॅस मिळणार आहे.
चार महिन्यांपेक्षा अधिक काळानंतर 22 मार्च रोजी पहिल्यांदा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ करण्यात आली होती. त्यानंतर केवळ 16 दिवसांमध्येच इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. आजची दरवाढ ही सोळा दिवसांत झालेली चौदावी वाढ आहे. 22 मार्च पासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेल तब्बल 10 रुपयांनी महागलं आहे. तसेच आज सीएनजीच्या दरांतही अडीच रुपयांची वाढ झाली आहे.
आज दिल्लीमध्ये पेट्रोल प्रति लिटर 105.41 रुपये तर डिझेल प्रति लिटर 96.67 रुपयांवर पोहोचले आहे. मुंबईमध्ये आज पेट्रोलचा भाव 120.51 रुपये लिटर आहे. तर डिझेलने देखील शंभरी पार केली असून, डिझेल 104.77 रुपयांवर पोहोचले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोलचे रेट 110.11 रुपये तर डिझेलसाठी 100.19 रुपये मोजावे लागत आहेत. कोलकातामध्ये पेट्रोल 114.28 रुपये लिटरवर पोहोचले आहे.
नव्या दरानुसार आज राजधानी मुंबईमध्ये पेट्रोचा दर प्रति लिटर 120.51 तर डिझेल प्रति लिटर 104.77 रुपयांवर पोहेचले आहे. उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोल प्रति लिटर 119.33 तर डिझेल 102.65 रुपयांवर पोहोचले आहे. नाशिकमध्ये पेट्रोल आणि डिझेलसाठी अनुक्रमे 119.11 व 101.83 रुपये मोजावे लागत आहेत. औरंगाबादमध्ये पेट्रोल 119.97 रुपये तर डिझेलच्या दरामध्ये वाढ होत 102.65 रुपये लिटर झाले आहे. पुण्यात पेट्रोलचे दर प्रति लिटर 119.07 रुपये एवढा झाला आहे तर डिझेलचे दर प्रति लिटर 102.67 रुपयांवर पोहोचले आहेत.
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत, परंतु स्थानिक करांनुसार, त्यांच्या किमती वेगवेगळ्या राज्यांमध्ये बदलतात. क्रिसिल रिसर्चनुसार, आंतरराष्ट्रीय तेलाच्या किमतीत झालेल्या वाढीवर पूर्णपणे मात करण्यासाठी प्रति लिटर 9-12 रुपयांची वाढ आवश्यक आहे. तेलाची गरज भागवण्यासाठी भारत 85 टक्के आयातीवर अवलंबून आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात.