Petrol Diesel Price : नवी दिल्ली : महागाईने सर्वसामान्य लोकांचे बेहाल करून टाकले आहेत. यातच देशात पेट्रोल-डिझेलचे भाव (Petrol Diesel Price) उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी आज पेट्रोल (Petrol Price)-डिझेलचे (Diesle Price) आजचे नवे भाव जारी केले आहेत. आज देखील पेट्रोल-डिझेलच्या भावामध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जवळपास 1 महिन्यापासून देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.
याअगोदर 6 एप्रिल दिवशी पेट्रोल-डिझेलच्या भावात वाढ करण्यात आली होती. पेट्रोल आणि डिझेलमध्ये प्रत्येकी 80 पैशांची वाढ करण्यात आली आहे. इंडियन ऑईलने जारी केलेल्या नवीन भावानुसार, दिल्लीमध्ये 1 लिटर पेट्रोलचे दर 105.41 रुपये आहेत. एक लिटर डिझेलसाठी तेथील नागरिकांना 96.67 रुपये मोजावे लागत आहेत. तर देशाची आर्थिक राजधानी असलेलं शहर मुंबईमध्ये 1 लिटर पेट्रोलसाठी 120. 51 रुपये मोजावी लागत आहेत. तर 1 लिटर डिझेलसाठी 104.77 रुपये मोजावे लागत आहेत.
मागील काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीला ब्रेक लागला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर 10.20 रुपयांनी महाग झाले होते. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरामध्ये परत एकदा वाढ झाल्याचे दिसत आहे. यामुळे देशात परत एकदा पेट्रोल-डिझेलच्या भाववाढीचे सत्र सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
शहरं पेट्रोलच्या भाव (प्रति लिटर) डिझेलच्या भाव (प्रति लिटर)
मुंबई 120.51 104.77
दिल्ली 105.41 96.67
चेन्नई 110.85 100.94
कोलकाता 115.12 99.83
हैद्राबाद 119.49 105.49
कोलकाता 115.12 96.83
बंगळुरू 111.09 94.79
देशातील कच्च्या तेलाच्या करारातून पंपावर विकले जाणारे पेट्रोलचे चक्र 22 दिवसांचे असते म्हणजेच महिन्याच्या 1 तारखेला खरेदी केलेले कच्चे तेल 22 तारखेला पंपावर पोहोचते (सरासरी अंदाज). कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याचा खर्च एक लिटर किरकोळ तेलाच्या किंमतीमध्ये समाविष्ट केला जातो, त्यानंतर जेव्हा ते रिफायनरीतून बाहेर येते तेव्हा त्याची मूळ किंमत निश्चित केली जाते. त्यानंतर तेथून तेल पंपापर्यंत पोहोचवण्याचा खर्च, केंद्र व राज्याचे कर तसेच डीलरचे कमिशनही जोडले जाते. या सर्वाचा खर्च ग्राहकांकडून वसूल केला जातो.
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. तुम्ही इंडियन ऑइलचे (IOC) ग्राहक असल्यास, तुम्ही RSP<डीलर कोड> 9224992249 पाठवू शकता आणि HPCL ग्राहक 92249992249 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.