Petrol Price: स्वस्त असलेलं पेट्रोल तुमच्या गाडीच्या टाकीत येईपर्यंत कसं होतं महाग? जाणून घ्या कसे...

How fuel prices are calculated: पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत सातत्याने वाढ होताना दिसते. गेल्या काही दिवसांत मुंबईत पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडली आहे. मात्र, पेट्रोलचा दर कमी असताना तुमच्यापर्यंत येईपर्यंत त्याचा भाव नेमका कसा वाढतो? जाणून घ्या...

Petrol Diesel price movement and how to calculate in india read details in marathi
Petrol Price: 57 रुपयांच्या पेट्रोलसाठी तुम्हाला 100 रुपये का मोजावे लागतात? वाचा काय आहे गणित  |  फोटो सौजन्य: BCCL

Petrol and Diesel price calculation and taxation : कच्च्या तेलाच्या भावात तेजी असताना आता भारतातील पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात किरकोळ बदल सोडले तर दोन्ही इंधनांमध्ये गेल्या काही दिवसांत मोठे बदल झालेले नाहीये. 17 एप्रिल 2023 च्या दरानुसार, देशाची राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलचा दर 96.72 रुपये इतका आहे. तर एक लिटर डिझेलचा दर 89.62 रुपये इतका आहे. तर मुंबईत एक लिटर पेट्रोलचा दर 106.31 रुपये इतका असून डिझेलचा दर 94.27 रुपये प्रति लिटर इतका आहे. मात्र, तुम्हाला ऐकल्यावर आश्चर्य वाटेल की, दिल्लीत 96.72 रुपये लिटर इतक्या दराने विक्री होणाऱ्या पेट्रोलची बेस प्राईस केवळ 57.16 रुपये प्रति लिटर इतकी आहे.

आता प्रश्न असा उपस्थित होतो की, बेस प्राईस इतकी कमी असताना आपल्याला पेट्रोलसाठी जवळपास दुप्पट पैसे का मोजावे लागतात? जाणून घ्या यामागचं नेमकं गणित काय आहे?

हे पण वाचा : या 10 भाज्या आहेत कॅन्सरच्या शत्रू, खाल्ल्यास कर्करोगाचा धोका होईल दूर

एक लिटर पेट्रोलची बेस प्राईस

दिल्लीत एक लिटर पेट्रोलची बेस प्राईस 57.16 रुपये इतकी आहे. आता तुम्ही विचार करत असाल की, बेस प्राईस इतकी कमी असलेलं पेट्रोल तुमच्या गाडीत पोहोचेपर्यंत त्याचा भाव जवळपास डबल का होतो? जाणून घ्या काय आहे यामागचं गणित?...

हे पण वाचा : हे 7 पदार्थ खाल तर बनाल शक्तिमान

दिल्लीत पेट्रोलची बेस प्राईस 57.16 रुपये इतकी आहे. यावर आधी 0.20 रुपये प्रति लिटर या दराने भाडे लागत असे. या भाड्यासह डीलरपर्यंत पोहोचता-पोहोचता पेट्रोलचा दर 57.36 रुपये प्रति लिटर इतका होतो. त्यानंतर त्यावर 19.90 रुपये प्रति लिटर या दराने एक्साईज ड्यूटी लागते. याच्या व्यतिरिक्त डीलर आपले कमिशनच्या स्वरूपात एक लिटर पेट्रोलसाठी सरासरी 3.75 रुपये वसूल करतात. एक्साइज ड्यूटी आणि डीलर यांच्या कमिशननंतर तुम्हाला एक लिटर पेट्रोलवर 15.71 रुपये वॅट द्यावा लागतो.

हे पण वाचा : या सवयींमुळे ऐन तारुण्यात येतो हार्ट अटॅक, तुम्हाला आहेत का या सवयी?

पेट्रोलची बेस प्राईस आणि सेलिंग प्राईसमध्ये 40 रुपयांचं अंतर

म्हणजेच याचा थेट अर्त होतो की, दिल्लीत 57.16 रुपयांच्या बेस प्राईस असलेलं पेट्रोलच्या खरेदीवर एका व्यक्तीला व्यक्तीला भाडे, डीलरचं कमिशन, एक्साईज ड्यूटी आणि वॅट सर्व भरावे लागते. यानंतर त्याची किंमत 96.72 रुपये प्रति लिटर इतकी होते. म्हणजेच एका लिटर पेट्रोलच्या बेस प्राईसवर 39.56 रुपये दिल्लीत भरावे लागतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी