Petrol-Diesel Price Today : सलग 11 व्या दिवशी वाढले पेट्रोल आणि डिझेलचे दर, जाणून घ्या कुठे पोहचल्या किंमती 

मेघालय सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर सात रुपयांपेक्षा कमी कपात केली आहे. या राज्यात, सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 31.62 टक्क्यांवरून 20 टक्के किंवा प्रति लिटर 15 रुपये (जे जास्त ) कमी केले आहे

petrol diesel price petrol diesel rate petrol diesel on 19 February 2021
सलग 11 व्या दिवशी वाढले पेट्रोल आणि डिझेलचे दर  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये दररोज वाढ होत आहे.
  • आज शुक्रवार 19 फेब्रुवारी रोजी सलग अकराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले.
  • मेघालयात पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर सात रुपयांनी स्वस्त झाले आहेत.

नवी दिल्ली :  पेट्रोल, डिझेलच्या दरांमध्ये दररोज वाढ होत आहे. आज शुक्रवार 19 फेब्रुवारी रोजी सलग अकराव्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले. दिल्लीत शुक्रवारी पेट्रोल 31 पैशांनी वाढून 90.19 रुपयांवर पोहोचले. डिझेल देखील 33 पैशांनी वाढून 80.60 रुपये प्रति लिटरवर आला आहे. दोन्ही इंधनाचे दर आतापर्यंतच्या विक्रमी किंमतीवर आहे.  मुंबईत पेट्रोल 96.62 रुपयांवर पोचले आहे, जे मेट्रो शहरांमध्ये सर्वाधिक आहे. डिझेलची किंमत प्रतिलिटर 87.67 रुपयांवर पोहोचली आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 91.41  आणि डिझेल 84.19 रुपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले आहे. चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर अनुक्रमे 92.25 आणि 85.63 आहेत.

देशातील इतर राज्यांपैकी राजस्थानमध्ये पेट्रोलची किंमत प्रतिलिटर 100 रुपयांच्या पुढे गेली आहे. मध्य प्रदेशातील अनूपपुरात पेट्रोल 100 पैशांना 25 पैसे तर डिझेल 90.35 रुपयांना विकले जात आहे. राजस्थानात पेट्रोलवर सर्वाधिक व्हॅट आहे. त्यानंतर मध्य प्रदेशात सर्वाधिक कर आहे.

एकीकडे तेलाच्या किंमती दररोज वाढत असतानाच, मेघालयात पेट्रोल आणि डिझेल प्रतिलिटर सात रुपयांनी स्वस्त झाले आहेत. राज्यातील व्यावसायिक वाहन चालकांनी संप केल्यावर पेट्रोलियम इंधनावरील व्हॅट कमी करण्यात आला. मेघालय सरकारने मंगळवारी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित कर (व्हॅट) कमी केल्यामुळे राज्यात या पेट्रोलियम इंधनाच्या दरात प्रति लिटर पाच रुपयांपेक्षा कमी कपात केली आहे. या राज्यात, सरकारने पेट्रोलवरील व्हॅट 31.62  टक्क्यांवरून 20 टक्के किंवा 15 रुपये प्रतिलिटर (जे अधिक असेल ते) कमी केले आहे. डिझेलवरील व्हॅट 22.95 पासून कमी करुन 12 टक्के किंवा 9 रुपये प्रति लीटर (जे अधिक असेल ते)  करण्यात आले. काल राजस्थानच्या गंगानगरमध्ये पेट्रोल 100 रुपयांपेक्षा जास्त विकले गेले. उल्लेखनीय आहे की गेल्या महिन्यातच राजस्थान सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील व्हॅटमध्ये दोन टक्के कपात करण्याची घोषणा केली होती. सध्या पेट्रोलवरील व्हॅट 36 रुपये आणि टोल 1.5 रुपये प्रतिलिटर आहे. 

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी या आठवड्यात विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढविल्याबद्दल केंद्र सरकारला जबाबदार धरले.

महाराष्ट्रातील विविध शहरातील आजची पेट्रोलची किंमत - 19th February 2021

शहर

आजची पेट्रोल किंमत

कालची पेट्रोल किंमत

अहमदनगर

₹ 96.79 (0.22)

₹ 96.57

अकोला

₹ 96.49 (0.21)

₹ 96.28

अमरावती

₹ 98.08 (0.68)

₹ 97.40

औरंगाबाद

₹ 97.13 (0.49)

₹ 96.64

भंडारा

₹ 96.83 (0.13)

₹ 96.70

बीड

₹ 97.96 (0.52)

₹ 97.44

बुलढाणा

₹ 97 (0.02)

₹ 96.98

चंद्रपूर

₹ 96.54 (-0.58)

₹ 97.12

धुळे

₹ 96.48 (0.11)

₹ 96.37

गडचिरोली

₹ 97.36 (0.87)

₹ 96.49

गोंदिया

₹ 97.46 (0.16)

₹ 97.30

ग्रेटर मुंबई

₹ 96.37 (0.32)

₹ 96.05

हिंगोली

₹ 97.03 (0.15)

₹ 96.88

जळगाव

₹ 97.03 (-0.35)

₹ 97.38

जालना

₹ 97.29 (-0.03)

₹ 97.32

कोल्हापूर

₹ 96.23 (0.06)

₹ 96.17

लातूर

₹ 97.18 (0.07)

₹ 97.11

मुंबई

₹ 96.62 (0.3)

₹ 96.32

नागपूर

₹ 96.41 (-0.09)

₹ 96.50

नांदेड

₹ 98.39 (0.74)

₹ 97.65

नंदुरबार

₹ 96.82 (0.07)

₹ 96.75

नाशिक

₹ 96.41 (-0.01)

₹ 96.42

उस्मानाबाद

₹ 96.76 (0.14)

₹ 96.62

पालघर

₹ 96.48 (0.26)

₹ 96.22

परभणी

₹ 98.91 (0.82)

₹ 98.09

पुणे

₹ 96.07 (0.18)

₹ 95.89

रायगड

₹ 95.98 (-0.86)

₹ 96.84

रत्नागिरी

₹ 97.85 (0.6)

₹ 97.25

सांगली

₹ 96.61 (0.54)

₹ 96.07

सातारा

₹ 96.41 (-0.23)

₹ 96.64

सिंधुदुर्ग

₹ 97.63 (0.49)

₹ 97.14

सोलापूर

₹ 96.38 (0.01)

₹ 96.37

ठाणे

₹ 96.04 (0.18)

₹ 95.86

वर्धा

₹ 96.59 (0.19)

₹ 96.40

वाशिम

₹ 96.95 (0.3)

₹ 96.65

यवतमाळ

₹ 97.05 (-0.01)

₹ 97.06

महाराष्ट्रातील विविध शहरातील आजची डिझेलची किंमत - 19th February 2021

शहर

आजची डिझेल किंमत

कालची डिझेल किंमत

अहमदनगर

₹ 86.51 (0.27)

₹ 86.24

अकोला

₹ 86.25 (0.26)

₹ 85.99

अमरावती

₹ 87.77 (0.71)

₹ 87.06

औरंगाबाद

₹ 86.83 (0.53)

₹ 86.30

भंडारा

₹ 86.51 (0.14)

₹ 86.37

बीड

₹ 87.62 (0.53)

₹ 87.09

बुलढाणा

₹ 86.73 (0.07)

₹ 86.66

चंद्रपूर

₹ 86.30 (-0.49)

₹ 86.79

धुळे

₹ 86.17 (0.13)

₹ 86.04

गडचिरोली

₹ 87.02 (0.84)

₹ 86.18

गोंदिया

₹ 87.12 (0.18)

₹ 86.94

ग्रेटर मुंबई

₹ 87.37 (0.34)

₹ 87.03

हिंगोली

₹ 86.70 (0.16)

₹ 86.54

जळगाव

₹ 86.69 (-0.3)

₹ 86.99

जालना

₹ 86.92 (-0.02)

₹ 86.94

कोल्हापूर

₹ 85.93 (0.08)

₹ 85.85

लातूर

₹ 86.84 (0.08)

₹ 86.76

मुंबई

₹ 87.67 (0.35)

₹ 87.32

नागपूर

₹ 86.11 (-1.42)

₹ 87.53

नांदेड

₹ 88 (0.73)

₹ 87.27

नंदुरबार

₹ 86.49 (0.08)

₹ 86.41

नाशिक

₹ 86.08 (0.01)

₹ 86.07

उस्मानाबाद

₹ 86.43 (0.15)

₹ 86.28

पालघर

₹ 86.12 (0.27)

₹ 85.85

परभणी

₹ 88.49 (0.81)

₹ 87.68

पुणे

₹ 85.75 (0.2)

₹ 85.55

रायगड

₹ 85.64 (-0.8)

₹ 86.44

रत्नागिरी

₹ 87.46 (0.56)

₹ 86.90

सांगली

₹ 86.29 (0.53)

₹ 85.76

सातारा

₹ 86.08 (-0.2)

₹ 86.28

सिंधुदुर्ग

₹ 87.28 (0.49)

₹ 86.79

सोलापूर

₹ 86.07 (0.02)

₹ 86.05

ठाणे

₹ 85.69 (0.19)

₹ 85.50

वर्धा

₹ 86.28 (0.2)

₹ 86.08

वाशिम

₹ 86.63 (0.31)

₹ 86.32

यवतमाळ

₹ 86.73 (0.02)

₹ 86.71

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी