Petrol-Diesel Price : भर पावसाळ्यात पेट्रोल-डिझेलने घेतला भडका, गेल्या 37 दिवसांत पेट्रोल 5.15 रुपयांनी महाग

काम-धंदा
भरत जाधव
Updated Jun 09, 2021 | 13:40 IST

देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 19 पैशांची वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे.

Petrol-Diesel Price
भर पावसाळ्यात पेट्रोल-डिझेलने घेतला भडका; डिझेलही शंभरी जवळ  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • देशातील अनेक राज्यांत पेट्रोलच्या किंमतीने आपली शंभरी पार केली आहे.
  • गेल्या 37 दिवसांत पेट्रोलची किंमत ही 5.15 रुपयांनी वाढली आहे.
  • आंतरराष्ट्रीय स्तरावर कच्चा तेलाच्या किंमतीत घट

नवी दिल्ली : देशातील पेट्रोल-डिझेलच्या किंमती (Petrol-Diesel Price) दिवसेंदिवस वाढतच चालल्या आहेत. आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत 19 पैशांची वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर (International level) कच्चा तेलाच्या किंमतीत घट होत असताना भारतात मात्र इंधनाच्या दरात वाढ होत आहे. मुंबई (Mumbai) मध्ये पेट्रोलच्या किंमतीने शंभरी कधीच पार केली आहे. मुंबईत आज पेट्रोलची किंमत 101.71 रुपये तर डिझेलची किंमत 93.77 रुपये इतकी आहे. तर दिल्लीत पेट्रोलची किंमत ही 95.56 रुपये तर डिझेलची किंमत 86.47 रुपये इतकी आहे. 

देशातील महाराष्ट्र, राजस्थान, आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश आणि लड्डाख या सहा ठिकाणी पेट्रोलच्या किंमतीने शंभरी पार केली आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला आणि देशातील पेट्रोलच्या किंमतीत पुन्हा वाढ होण्यास सुरुवात झाली. गेल्या महिन्याच्या 4 तारखेपासून आतापर्यंत 22 व्या वेळा पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाली आहे. आतापर्यत झालेली वाढ पकडली असता ही वाढ 5.15 रुपये इतकी आहे.  देशात 15 जून  2017 पासून इंधनाचे दर रोज बदलण्यास सुरुवात झाली. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आता भारतातील तेल कंपन्या ठरवतात. आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रत्येक क्षणाला तेलाच्या किंमती बदलत असतात. त्यामुळे देशात आता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती दर दिवशी सकाळी सहा वाजता बदलतात. 

देशातील मुख्य शहरांमधील पेट्रोलचे प्रतिलिटर दर 

दिल्ली - 95.56 रुपये प्रतिलिटर
मुंबई   - 101.76 
चेन्नई  - 96.94
कोलकता -95.52
बंगळुरू - 98.75
लखनौ - 92.81
जयपूर - 102.14
चंडीगड - 91.91 

महाराष्ट्रातील विविध शहरातील आजचे पेट्रोलचे दर (Today's petrol rates in various cities in Maharashtra)

शहर आजची पेट्रोल किंमत कालची पेट्रोल किंमत
अहमदनगर ₹ 101.79 (0.02) ₹ 101.77
अकोला ₹ 101.68 (0.33)     ₹ 101.35
अमरावती ₹ 102.48 (-0.47)  ₹ 102.95
औरंगाबाद ₹ 103 (1.1) ₹ 101.90
भंडारा ₹ 102.28 (0.1) ₹ 102.18
बीड ₹ 103.17 (0.09) ₹ 103.08
बुलढाणा ₹ 102.38 (0.43) ₹ 101.95
चंद्रपूर ₹ 102.60 (1.2) ₹ 101.40
धुळे ₹ 102.14 (0.73) ₹ 101.41
गडचिरोली ₹ 102.86 (0.75) ₹ 102.11
गोंदिया ₹ 103.15 (0.52) ₹ 102.63
मुंबई शहर ₹ 101.81 (0.14)     ₹ 101.67
हिंगोली ₹ 102.69 (0.52) ₹ 102.17
जळगाव ₹ 102.51 (0.81) ₹ 101.70
जालना ₹ 102.80 (0.19) ₹ 102.61
कोल्हापूर ₹ 101.88 (-0.62)  ₹ 102.50
लातूर ₹ 102.95 (0.64) ₹ 102.31
मुंबई ₹ 101.76 (0.24) ₹ 101.52
नागपूर ₹ 102.06 (0.75)     ₹ 101.31
नांदेड ₹ 105.02 (1.58) ₹ 103.44
नंदुरबार ₹ 102.28 (-0.13)      ₹ 102.41
नाशिक ₹ 102.19 (0.25) ₹ 101.94
उस्मानाबाद ₹ 102.21 (0.19) ₹ 102.02
पालघर ₹ 102.02 (0.84) ₹ 101.18
परभणी ₹ 103.89 (-0.28)      ₹ 104.17
पुणे ₹ 101.91 (0.1) ₹ 101.81
रायगड ₹ 101.58 (-0.64)      ₹ 102.22
रत्नागिरी ₹ 103.42 (0.85)     ₹ 102.57
सांगली ₹ 101.89 (0.63) ₹ 101.26
सातारा ₹ 101.85 (-0.04) ₹ 101.89
सिंधुदुर्ग ₹ 103.21 (0.21) ₹ 103
सोलापूर ₹ 102.14 (0.24) ₹ 101.90
ठाणे ₹ 101.47 (0.44) ₹ 101.03
वर्धा ₹ 102.02 (0.28) ₹ 101.74
वाशिम ₹ 102.12 (0.32) ₹ 101.80
यवतमाळ ₹ 102.75 (0.62) ₹ 102.13
     
     

 

देशातील मुख्य शहरांमधील डिझेलचे प्रतिलिटर दर 

दिल्ली- 86.47 रुपये प्रतिलिटर
मुंबई - 93.59 
चेन्नई -90.92
कोलकाता-89.07
बंगळुरू-91.67
जयपूर-95.37 
चंदीगड-86.12 

महाराष्ट्रातील विविध शहरातील आजचे डिझेलचे दर (Today's diesel rates in various cities in Maharashtra)

शहर आजची डिझेल किंमत कालची डिझेल किंमत
अहमदनगर ₹ 92.44 (0.04) ₹ 92.40
अकोला ₹ 92.36 (0.35) ₹ 92.01
अमरावती ₹ 93.13 (-1.91) ₹ 95.04
औरंगाबाद ₹ 95.09 (2.58) ₹ 92.51
भंडारा ₹ 92.94 (0.13) ₹ 92.81
बीड ₹ 93.78 (0.11) ₹ 93.67
बुलढाणा ₹ 93.04 (0.44) ₹ 92.60
चंद्रपूर ₹ 93.25 (1.17) ₹ 92.08
धुळे ₹ 92.79 (0.73) ₹ 92.06
गडचिरोली ₹ 93.50 (0.75) ₹ 92.75
गोंदिया ₹ 93.77 (0.52) ₹ 93.25
मुंबई शहर  ₹ 93.90 (0.17) ₹ 93.73
हिंगोली ₹ 93.33 (0.52) ₹ 92.81
जळगाव ₹ 93.14 (0.8) ₹ 92.34
जालना ₹ 93.41 (0.21) ₹ 93.20
कोल्हापूर ₹ 92.55 (-0.57) ₹ 93.12
लातूर ₹ 93.57 (0.64) ₹ 92.93
मुंबई ₹ 93.85 (0.27)     ₹ 93.58
नागपूर ₹ 92.72 (0.75) ₹ 91.97
नांदेड ₹ 95.55 (1.52) ₹ 94.03
नंदुरबार ₹ 92.92 (-0.1) ₹ 93.02
नाशिक ₹ 92.82 (0.27) ₹ 92.55
उस्मानाबाद ₹ 92.86 (0.21) ₹ 92.65
पालघर ₹ 92.63 (0.84) ₹ 91.79
परभणी ₹ 94.46 (-0.24)     ₹ 94.70
पुणे ₹ 92.55 (0.12) ₹ 92.43
रायगड ₹ 92.21 (-0.58)     ₹ 92.79
रत्नागिरी ₹ 94 (0.85) ₹ 93.15
सांगली ₹ 92.56 (0.63) ₹ 91.93
सातारा ₹ 92.49 (-0.04) ₹ 92.53
सिंधुदुर्ग ₹ 93.83 (0.24) ₹ 93.59
सोलापूर ₹ 92.80 (0.27) ₹ 92.53
ठाणे ₹ 92.10 (0.46) ₹ 91.64
वर्धा ₹ 92.68 (0.29) ₹ 92.39
वाशिम ₹ 92.79 (0.34) ₹ 92.45
यवतमाळ ₹ 93.39 (0.63) ₹ 92.76
     

 

पेट्रोल आणि डिझेलचे दर कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं IndianOil ONE Mobile App तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx   पेट्रोल डिझेलचे दर सोप्या पद्धतीने पाहता येतील.


भारतात केंद्राचा 33 तर राज्याचा 32 रुपये कर

सध्या केंद्र सरकारकडून पेट्रोलवर 32.98 प्रति लिटर तर डिझेलवर 31.83 रुपये प्रती लिटर इतका कर लागतो. आता यावरच कर थांबत नाही. राज्य सरकार त्यावर वेगळा कर लावते. महाराष्ट्र सरकार पेट्रोलच्या किंमतीवर 25 टक्के व्हॅट लावते तर डिझेलवर 21 टक्के व्हॅट लावते. आता यावरही अधिकचा सेस लावला जातो. पेट्रोलवर 10 रुपये प्रती लिटर तर डिझेलवर 3 रुपये प्रति लिटर इतका सेस लावण्यात येतो. त्यामुळे देशात पेट्रोल-डिझेलचे दर वाढताना दिसत आहेत. 

कमी नाही होऊ शकत डिझेल आणि पेट्रोलचे दर 

सोमवारी माध्यमांशी बोलताना केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान म्हणाले की, यावेळी सरकारची आमदनी म्हणजेच उत्पन्न कमी झाले आहे. उत्पन्न कमी झाल्याने खर्च वाढला आहे. अशात डिझेल- पेट्रोलच्या किंमती कमी नाही होऊ शकतं. कारण सरकारवर अतिरिक्त बोझ पडत आहे.  
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी