Petrol-Diesel Price | देशात सर्वात स्वस्त पेट्रोल पंजाबात, लडाखमध्ये डिझेल १९ रुपयांनी स्वस्त

Petrol-Diesel Price in india | केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ५ रुपये लिटरची कपात केल्यानंतर आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात १० रुपयांची कपात केल्यानंतर २५ राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी व्हॅटमध्ये कपात केल्याने इंधनाच्या दरवाढीने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य माणसाला थोडासा दिलासा मिळाला आहे. त्याधी पेट्रोल आणि डिझेलचे दर देशभरात उच्चांकीवर पोचले होते.

Petrol-Diesel Price
पेट्रोल आणि डिझेलचे दर 
थोडं पण कामाचं
  • पंजाबात पेट्रोलच्या दरात सर्वात मोठी कपात
  • लडाख या केंद्रशासित प्रदेशातदेखील डिझेलच्या दरात मोठी कपात
  • उत्पादन शुल्क आणि व्हॅटमध्ये कपात झाल्याने पेट्रोल स्वस्त

Petrol-Diesel Price | नवी दिल्ली : देशात इंधनाच्या (Fuel Price)वाढलेल्या दरांबद्दल मागील काही काळापासून चर्चा सुरू आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच भाजपशासित राज्यांमध्ये पेट्रोल (Petrol Price)आणि डिझेलच्या दरात (Diesel Price)घट झाली होती. आता पंजाबात पेट्रोलच्या दरात (Petrol price cheapest in Punjab) सर्वात मोठी कपात करण्यात आली आहे. पंजाबमध्ये स्थानिक कर किंवा व्हॅटमध्ये कपात केल्याने देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल सध्या पंजाबात मिळते आहे. तर लडाख या केंद्रशासित प्रदेशातदेखील (reduction in diesel price in Ladakh) डिझेलच्या दरात मोठी कपात झाली आहे. (Petrol-Diesel Price | Petrol prices cheapest in Punjab & Ladakh sees reduction in diesel price)

उत्पादन शुल्क आणि व्हॅटमध्ये कपात झाल्याने पेट्रोल स्वस्त

केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ५ रुपये लिटरची कपात केल्यानंतर आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात १० रुपयांची कपात केल्यानंतर २५ राज्यांमध्ये आणि केंद्र शासित प्रदेशांनी व्हॅटमध्ये कपात केल्याने इंधनाच्या दरवाढीने त्रस्त झालेल्या सर्वसामान्य माणसाला थोडासा दिलासा मिळाला आहे. त्याधी पेट्रोल आणि डिझेलचे दर देशभरात उच्चांकीवर पोचले होते. पेट्रोलच्या दरात १६.०२ रुपये प्रति लिटरची कपात झाली आहे तर डिझेलचा भाव १९.६१ रुपये प्रति लिटरने खाली आला आहे. उत्पादन शुल्क आणि व्हॅट यामध्ये कपात केल्याचा संयुक्त परिणाम होत इंधनाच्या दरात घसरण झाली आहे.

पंजाब मध्ये  पेट्रोल सर्वात स्वस्त

पंजाबात पेट्रोलच्या दरात सर्वाधिक १६.०२ रुपये प्रति लिटरची कपात झालेली पाहायला मिळाल. त्यानंतर केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये १३.४३ रुपये प्रति लिटर तर कर्नाटकात १३.३५ रुपये प्रति लिटरची कपात झाली आहे. पंजाबात व्हॅटमध्ये ११.२७ रुपये प्रति लिटरची कपात करण्यात आली आहे. तर उत्तर प्रदेशात पेट्रोलवरील व्हॅटमध्ये ६.९६ रुपयांची कपात झाली आहे. पंजाब आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. गुजरातमध्ये व्हॅटमध्ये ६.८२ रुपये लिटरची कपात करण्यात आली आहे तर ओडिशातील विक्री कर ४.५५ रुपये प्रति लिटरने कमी करण्यात आला आहे. बिहारमध्ये प्रति लिटर ३.२१ रुपयांची कपात झाली आहे.

लडाखमध्ये डिझेल सर्वात स्वस्त

लडाखमध्ये डिझेलच्या दरात सर्वाधिक घसरण झाल्याचे दिसून आले. लडाखमध्ये डिझेलचा भाव ९.५२ रुपये प्रति लिटरने खाली आला आहे. लडाखमध्ये व्हॅटमध्ये कपात झाल्याने तसेच उत्पादन शुल्कात प्रति लिटर १० रुपयांची कपात झाल्याने डिझेलच्या भावात चांगलीच घसरण झाली आहे. कर्नाटक राज्यानेदेखील डिझेलवरील व्हॅट ९.३० रुपयांनी कमी केला आहे. तर पुडुचेरीने डिझेलवरील व्हॅट ९.०२ रुपयांनी कमी केला आहे.

व्हॅटमधील कपात

पंजाबमध्ये डिझेलवरील व्हॅट ६.७७ रुपये प्रति लिटरने तर उत्तर प्रदेशात डिझेलवरील व्हॅट २.०४ रुपये प्रति लिटरने कमी करण्यात आला आहे. उत्तराखंड येथेदेखील डिझेलवरील व्हॅट २.०४ रुपये प्रति लिटरने आणि हरियाणात २.०४ रुपये प्रति लिटरने कमी करण्यात आला आहे. बिहारमध्ये डिझेलवरील व्हॅट ३.९१ रुपये प्रति लिटरने, ओडिशात ५.६९ रुपये प्रति लिटरने आणि मध्य प्रदेशात डिझेलवरील व्हॅट ६.९६ रुपये प्रति लिटर कमी करण्यात आला आहे.

इंधन महाग असणारी राज्ये

ज्या राज्यांनी अद्याप इंधनावरील व्हॅट कमी केलेला नाही त्यामध्ये राजस्थान, छत्तीसगढ, महाराष्ट्र, झारखंड, तामिळनाडू, दिल्ली, प. बंगाल, केरळ, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश यांचा समावेश आहे. पेट्रोल आणि डिझेलवर केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्हींकडून कर लावण्यात येतो. ४ नोव्हेंबरपासून उत्पादन शुल्कात कपात करण्यात आल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या भावात बदल झालेला नाही.

काही राज्य सरकारे आणि केंद्र सरकारने इंधनावरील करात कपात केल्यानंतर सर्वात महागडे पेट्रोल राजस्थानात विकले जाते आहे. तिथे पेट्रोलचा भाव १११.१० रुपये प्रति लिटर आहे. त्यानंतर मुंबईत पेट्रोलचा भाव १०९.९८ रुपये प्रति लिटर आहे. तर आंध्र प्रदेशात १०९.०५ रुपये प्रति लिटरने पेट्रोल विकले जाते आहे. याशिवाय कर्नाटकात पेट्रोलचा भाव १००.५८ रुपये प्रति लिटर, बिहारमध्ये १०५.९० रुपये प्रति लिटर, मध्य प्रदेशात १०७.२३ रुपये प्रति लिटर आणि लडाखमध्ये १०२.९९ रुपये प्रति लिटरने विकले जाते आहे. 

तुमच्या शहरातील १५ नोव्हेंबरचे पेट्रोलचे दर 

शहर

आजची पेट्रोल किंमत

कालची पेट्रोल किंमत

अहमदनगर

₹ 110.60 (1.04)

₹ 109.56

अकोला

₹ 110.02 (-0.14)

₹ 110.16

अमरावती

₹ 110.80 (-0.75)

₹ 111.55

औरंगाबाद

₹ 110.25 (-1.12)

₹ 111.37

भंडारा

₹ 110.89 (-0.01)

₹ 110.90

बीड

₹ 111.43 (0.41)

₹ 111.02

बुलढाणा

₹ 109.93 (-0.52)

₹ 110.45

चंद्रपूर

₹ 110.54 (0.43)

₹ 110.11

धुळे

₹ 110.31 (-0.15)

₹ 110.46

गडचिरोली

₹ 112.11 (1.15)

₹ 110.96

गोंदिया

₹ 111.57 (0.2)

₹ 111.37

मुंबई शहर

₹ 109.98 (0)

₹ 109.98

हिंगोली

₹ 111.07 (0)

₹ 111.07

जळगाव

₹ 109.85 (-1.24)

₹ 111.09

जालना

₹ 110.92 (-0.53)

₹ 111.45

कोल्हापूर

₹ 110.86 (0.33)

₹ 110.53

लातूर

₹ 110.97 (-0.47)

₹ 111.44

मुंबई उपनगर

₹ 109.98 (0)

₹ 109.98

नागपूर

₹ 110.06 (0.17)

₹ 109.89

नांदेड

₹ 112.06 (-0.37)

₹ 112.43

नंदुरबार

₹ 110.67 (-0.1)

₹ 110.77

नाशिक

₹ 109.86 (-0.78)

₹ 110.64

उस्मानाबाद

₹ 110.84 (0.21)

₹ 110.63

पालघर

₹ 110.35 (0.25)

₹ 110.10

परभणी

₹ 113.13 (0)

₹ 113.13

पुणे

₹ 109.69 (-0.39)

₹ 110.08

रायगड

₹ 109.61 (-0.23)

₹ 109.84

रत्नागिरी

₹ 111.96 (0.29)

₹ 111.67

सांगली

₹ 109.96 (0.05)

₹ 109.91

सातारा

₹ 110.25 (0.23)

₹ 110.02

सिंधुदुर्ग

₹ 111.65 (0.16)

₹ 111.49

सोलापूर

₹ 110.41 (-0.06)

₹ 110.47

ठाणे

₹ 109.72 (0.05)

₹ 109.67

वर्धा

₹ 110.27 (-0.11)

₹ 110.38

वाशिम

₹ 110.76 (0.27)

₹ 110.49

यवतमाळ

₹ 111.41 (0.32)

₹ 111.09

तुमच्या शहरातील १५ नोव्हेंबरचे डिझेलचे दर 

शहर

आजची डिझेल किंमत

कालची डिझेल किंमत

अहमदनगर

₹ 93.36 (1)

₹ 92.36

अकोला

₹ 92.83 (-0.13)

₹ 92.96

अमरावती

₹ 93.58 (-2.16)

₹ 95.74

औरंगाबाद

₹ 93.01 (-1.08)

₹ 94.09

भंडारा

₹ 93.66 (-0.01)

₹ 93.67

बीड

₹ 94.17 (0.41)

₹ 93.76

बुलढाणा

₹ 92.74 (-0.5)

₹ 93.24

चंद्रपूर

₹ 93.33 (0.4)

₹ 92.93

धुळे

₹ 93.09 (-0.14)

₹ 93.23

गडचिरोली

₹ 94.85 (1.11)

₹ 93.74

गोंदिया

₹ 94.32 (0.2)

₹ 94.12

 मुंबई शहर

₹ 94.14 (0)

₹ 94.14

हिंगोली

₹ 93.83 (-0.01)

₹ 93.84

जळगाव

₹ 92.63 (-1.19)

₹ 93.82

जालना

₹ 93.66 (-0.51)

₹ 94.17

कोल्हापूर

₹ 93.63 (0.31)

₹ 93.32

लातूर

₹ 93.73 (-0.45)

₹ 94.18

मुंबई उपनगर

₹ 94.14 (0)

₹ 94.14

नागपूर

₹ 92.86 (0.16)

₹ 92.70

नांदेड

₹ 94.78 (-0.35)

₹ 95.13

नंदुरबार

₹ 93.43 (-0.1)

₹ 93.53

नाशिक

₹ 92.65 (-0.74)

₹ 93.39

उस्मानाबाद

₹ 93.61 (0.21)

₹ 93.40

पालघर

₹ 93.08 (0.24)

₹ 92.84

परभणी

₹ 95.78 (0)

₹ 95.78

पुणे

₹ 92.47 (-0.38)

₹ 92.85

रायगड

₹ 92.37 (-0.22)

₹ 92.59

रत्नागिरी

₹ 94.69 (0.28)

₹ 94.41

सांगली

₹ 92.76 (0.04)

₹ 92.72

सातारा

₹ 93.01 (0.22)

₹ 92.79

सिंधुदुर्ग

₹ 94.39 (0.15)

₹ 94.24

सोलापूर

₹ 93.17 (-0.07)

₹ 93.24

ठाणे

₹ 92.43 (-1.85)

₹ 94.28

वर्धा

₹ 93.06 (-0.12)

₹ 93.18

वाशिम

₹ 93.54 (0.26)

₹ 93.28

यवतमाळ

₹ 94.16 (0.3)

₹ 93.86


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी