पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी कपात, पाहा आजचे दर

काम-धंदा
Updated Jun 10, 2019 | 10:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Petrol Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी कपात करण्यात आली आहे. या कपातीमुळे आता देशातील प्रमुख शहरांमध्ये काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर हे जाणून घ्या...

Petrol diesel rates slashed
पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी कपात  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली: सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देणारी बातमी आहे. कारण, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी घसरण झाली आहे. तेल कंपन्यांकडून दररोज जाहीर होणाऱ्या दरांनुसार, सोमवारी (१० जून) देशातील चार प्रमुख शहरांत पेट्रोलच्या दरात १३ पैसे प्रति लिटर तर डिझेलच्या दरात ११ ते १२ पैसे प्रति लिटर इतकी कपात झाली आहे. रविवारी सुद्धा तेल कंपन्यांनी पेट्रोलच्या दरात कपात केली होती. त्यामुळे देशातील प्रमुख चार शहरांमधील पेट्रोलच्या दरात १६ ते १७ पैसे प्रति लिटर इतकी कपात झाली होती. तर, डिझेलच्या दरात १५ ते १६ पैसे प्रति लिटर इतकी कपात झाली होती.

दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात १३ पैशांनी कपात झाली आहे त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर ७०.४३ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. रविवारी दिल्लीत पेट्रोलचा दर ७०.५६ रुपये प्रति लिटर इतका होता. तर, दिल्लीमध्ये डिझेलच्या दरात ११ पैसे प्रति लिटर इतकी कपात झाली आहे. त्यामुळे दिल्लीत डिझेलचा दर ६४.३९ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. रविवारी दिल्लीत डिझेलचा दर ६४.५० रुपये इतका होता. 

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, पेट्रोलच्या दरात कपात झाल्यामुळे मुंबईत पेट्रोल ७६.१२ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे तर डिझेलचा दर ६७.५१ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. तर, कोलकातामध्ये पेट्रोलच्या दरात १३ पैशांनी कपात झाल्यामुळे पेट्रोलसाठी प्रति लिटर ७२.६८ रुपये मोजावे लागणार आहेत. रविवारी कोलकातामध्ये पेट्रोलचा दर ७२.८१ रुपये इतका होता. डिझेलच्या दरातही ११ पैशांनी कपात झाली आहे त्यामुळे कोलकातात डिझेलसाठी ६६.३१ रुपये मोजावे लागणार आहेत. डिझेलचा दर रविवारी ६६.४२ रुपये इतका होता. 

चेन्नईतही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात झाली आहे. यामुळे चेन्नईत पेट्रोलचा दर ७३.१७ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ६८.११ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. चेन्नईत रविवारी डिझेलचा दर ६८.२३ रुपये प्रति लिटर इतका होता.

म्हणून दिल्लीत पेट्रोल स्वस्त

देशातील प्रमुख शहरांपेक्षा दिल्लीमध्ये पेट्रोलचा दर कमी आहे. कारण, दिल्लीमध्ये इंधनावर आकारण्यात येणारे कर (टॅक्स) कमी आहेत. हे कर देशातील इतर प्रमुख शहरांमध्ये जास्त आहेत. भारतामधील पेट्रोल-डिझेलचे दर हे आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किंमतीवर अवलंबुन असतात. तसेच तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले जातात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी कपात, पाहा आजचे दर Description: Petrol Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग पाचव्या दिवशी कपात करण्यात आली आहे. या कपातीमुळे आता देशातील प्रमुख शहरांमध्ये काय आहेत पेट्रोल-डिझेलचे दर हे जाणून घ्या...
loadingLoading...
loadingLoading...
loadingLoading...
taboola