Petrol-Diesel Price : पेट्रोल-डिझेलच्या भडक्यानं नागरिकांच्या बजेटला आग; आज पुन्हा इंधनाच्या दरात 80 पैशांची वाढ

काम-धंदा
भरत जाधव
Updated Apr 05, 2022 | 08:14 IST

आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) क्रूड ऑईल (Crude Oil) ची किंमत जरी 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. अशातच, भारतीय बाजारात (Indian market) पेट्रोल-डिझेलच्या किमतींच्या (Petrol-Diesel) दरवाढीचं सत्र मात्र काही करुन थांबेना. देशात (Fuel Prices) पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दररोज वाढ होत आहे.

Petrol-Diesel Price
आज पुन्हा इंधनाच्या दरात 80 पैशांची वाढ   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • या वाढीमुळे आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9.20 रुपयांची वाढ झाली.
  • पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी वाढ

Petrol-Diesel Price Today : नवी दिल्ली :  आंतरराष्ट्रीय बाजारात (international market) क्रूड ऑईल (Crude Oil) ची किंमत जरी 100 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचली आहे. अशातच, भारतीय बाजारात (Indian market) पेट्रोल-डिझेलच्या किमतींच्या (Petrol-Diesel) दरवाढीचं सत्र मात्र काही करुन थांबेना. देशात (Fuel Prices) पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये दररोज वाढ होत आहे. दिवसागणिक वाढणाऱ्या पेट्रोल-डिझेलच्या दरांमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसत आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून नवीन दर लागू झाले आहेत. तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलसाठी प्रतिलिटर 80 पैशांनी वाढ जाहीर केली आहे. पंधरा दिवसांतील ही 13वी वाढ आहे. या वाढीमुळे आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर 9.20 रुपयांची वाढ झाली आहे. वाढलेल्या दरानुसार, देशाची राजधानी दिल्लीमध्ये 2 आठवड्यात हळूहळू पेट्रोल 9.20 रुपयांनी महागलं आहे. या वाढीमुळे राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोलची किंमत 104.61 रुपये, तर डिझेलची किंमत 95.87 रुपये प्रति लीटर झाली आहे.

भारतीय तेल कंपन्यांनी 5 एप्रिल रोजी पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80-80 पैशांनी वाढ केली आहे. भारतीय पेट्रोलियम विपणन कंपनी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOCL) च्या ताज्या अपडेटनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत 84 पैशांची वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरांत 85 पैसे प्रति लिटरची वाढ झाली आहे. दरवाढीनंतर मुंबईत पेट्रोल 119.67 रुपये प्रति लिटरवर, तर डिझेल 103.92 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. मुंबईतर गेल्या पंधरा दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या दरांत झालेली ही 13 वी वाढ आहे. 

दररोज बदलतात पेट्रोल-डिझेलच्या किमती 

आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीच्या आधारे पेट्रोल आणि डिझेलची किंमत दररोज बदलली जाते. तेल विपणन कंपन्या दररोज पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्थान पेट्रोलियम तेल कंपन्या दररोज सकाळी वेगवेगळ्या शहरांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींची माहिती अपडेट करतात. 22 मार्चपासून सुरू झालेलं वाढीचं सत्र अजून थांबलेलं नाहीये. पंधरा दिवसांपैकी 24 मार्च आणि 1 एप्रिल हे दोनच दिवस पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत कोणताही बदल न झाल्यानं दर स्थिर होते. 

देशातील प्रमुख शहराचे दर 

  शहर    पेट्रोल           डीझेल
दिल्ली      -  104.61       95.87
कोलकाता - 114.28       99.02
मुंबई       -119.67           103.92
चेन्नई       -110.09           100.18

सीएनजीचे दर वाढले

यापूर्वी सीएनजीचे दरही किलोमागे 80 पैशांनी वाढले होते. या दरवाढीनंतर दिल्लीत सीएनजीची नवीन किंमत 61.61 रुपये प्रति किलो झाली आहे. सीएनजीच्या दरातही आठवडाभरात तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. आठवडाभरात ते 2.40 रुपये किलोने महागले आहे
 

क्रमांकांवरुन जाणून घ्या इंधनाच्या किमती 

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत याची माहिती तुम्ही एसएमएसद्वारेही मिळवू शकता. यासाठी इंडियन ऑइलच्या (IOCL) ग्राहकांना RSP कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुम्हाला इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर कोड सापडेल. इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx वर देखील पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी