Petrol-Diesel Price Today : आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर, जाणून घ्या तुमच्या शहरात काय आहेत इंधनाचे दर?

काम-धंदा
भरत जाधव
Updated Dec 28, 2021 | 09:00 IST

Petrol Diesel Rate Today : पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या (Diesel ) किमतींमध्ये आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जवळपास दीड-पावणे दोन महिन्यांपासून तेल कंपन्यांनी (oil companies) पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत.

Petrol Diesel Price on 28 December
आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
  • इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळला

Petrol, Diesel  latest Price in Maharashtra : नवी दिल्ली : पेट्रोल (Petrol)-डिझेलच्या (Diesel ) किमतींमध्ये आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जवळपास दीड-पावणे दोन महिन्यांपासून तेल कंपन्यांनी (oil companies) पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. केंद्र सरकारद्वारे (Central Government) दिवाळी दरम्यान, पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात (excise duty) घट करण्यात आली होती. त्यानंतरपासून आतापर्यंत पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. भारतीय तेल कंपन्यांनी (Indian oil companies) 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळला आहे.

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज मुंबई शहरांत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लीटर इतकी आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलची किंमत (Petrol Price) 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचं शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकलं जात आहे. पाटणा येथे ग्राहक एका लीटरच्या पेट्रोलसाठी 105.92 रुपये मोजत आहेत. तर डिझेलसाठी 91.09 रुपये द्यावी लागत आहेत. 

महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे.  पुण्यात पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लीटर इतकी आहे.  अहमदनगर येथे पेट्रोलसाठी 110.52 रुपये द्यावी लागत आहेत. तर एका लीटरच्या डिझेलसाठी 93.27 रुपये मोजावी लागत आहेत.  औरंगाबाद येथे एक लीटरच्या पेट्रोलसाठी ग्राहकांना 110.14 रुपये मोजावी लागताय. तर डिझेलसाठी 92.91 रुपये. गडचिरोली येथे पेट्रोलचे दर प्रति लीटर 110.77 रुपये असून डिझेलचे दर हे प्रति लीटरसाठी 93.56 आहेत. नागपूर येथे पेट्रोल  110.32 रुपये लीटर मिळत आहे, तर डिझेलचे दर 93.11 प्रति लीटर आहेत. नाशिक येथे पेट्रोलचे दर 109.79 प्रति लीटर तर डिझेलचे दर 92.57 रुपये आहेत. 

गेल्या आठवड्यात आंतरराष्ट्रीय बाजारात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या ट्रेडिंग सत्रात, जागतिक मानक मानल्या जाणार्‍या ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 1.01 टक्क्यांनी वाढून $76.07 वर पोहोचली आहे. त्याच वेळी, जागतिक स्तरावर, न्यूयॉर्कमध्ये वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्च्या तेलाच्या किमती 1.42 टक्क्यांनी वाढून $73.79 प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. दरम्यान दिवाळीपूर्वी केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरही https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर  सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी