Petrol-Diesel Price Today : पेट्रोल-डिझेलचे दर वाढले की घटले जाणून घ्या, वाचा आपल्या शहरातील आजचे इंधनाचे दर

काम-धंदा
भरत जाधव
Updated Dec 22, 2021 | 09:30 IST

Petrol Diesel Rate Today : आयओसीएल (IOCL) ने आज बुधवारचे दर जारी केले आहेत. आजही किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतींमध्ये मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे.

Petrol-Diesel Price Today  22 December 2021
पेट्रोल-डिझेलचे दर 22 डिसेंबर 2021  |  फोटो सौजन्य: Times Now

Petrol, Diesel  latest Price in Maharashtra  : मुंबई :  आयओसीएल (IOCL) ने आज बुधवारचे दर जारी केले आहेत. आजही किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑईलच्या किमतींमध्ये मोठी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. परंतु, तरिसुद्धा देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झालेला नसून त्या जैसे थे अशाच आहेत. दरम्यान भारतीय तेल कंपन्यांनी 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा मिळणार आहे. 

गेल्या महिन्याभरात तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel Price) किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लीटर इतकी आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लीटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लीटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचे शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रती लीटरनं आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटरनं विकलं जात आहेत. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकले जात आहे. 

महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे. अहमदनगरमध्ये पेट्रोलचे दर एका लीटरसाठी 110.08 रुपये आहेत, तर डिझेल 92.86 रुपये लीटर आहे. औरंगाबादमध्ये पेट्रोलसाठी ग्राहक 111.17 रुपये मोजू लागले आहेत तर डिझेलसाठी 95.86 द्यावे लागत आहेत. जळगावमध्ये पेट्रोलचे दर 110.97 रुपये इतके आहेत. तर डिझेलचे दर  93.73 इतके आहेत. राज्याची उपराजधानी नागपूरमध्ये पेट्रोलसाठी 109.83 रुपये मोजावी लागत आहेत तर डिझेलसाठी 92.65 रुपये द्यावी लागत आहेत. नाशकात पेट्रोल 109.88 रुपये लीटर आहे, तर डिझेल 92.66 रुपये आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरही https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर  सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी