Petrol-Diesel Price Today : तब्बल 40 दिवसांपासून इंधनाचे दर ना कमी ना जास्त, जाणून घ्या आपल्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर

काम-धंदा
भरत जाधव
Updated Dec 14, 2021 | 08:40 IST

Petrol, Diesel Rates Today : नवी दिल्ली : देशात सलग 40व्या दिवशी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol, Diesel) दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधानांचे दर आजही स्थिर आहेत. IOCL च्या अधिकृत वेबसाईट(website)वरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

Petrol-Diesel Price Today
जाणून घ्या आपल्या शहरातील आजचे पेट्रोल-डिझेलचे दर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 15 दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये चढ-ऊतार होत आहे.
  • भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले असून आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर

 Petrol, Diesel  latest Price in Maharashtra : नवी दिल्ली : देशात सलग 40व्या दिवशी ऑईल मार्केटिंग कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या (Petrol, Diesel) दरांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. इंधानांचे दर आजही स्थिर आहेत. IOCL च्या अधिकृत वेबसाईट(website)वरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. 

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत  86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचे शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरने आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकले जात आहे. 

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या 15 दिवसांमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये चढ-ऊतार होत आहे. परंतु, तरिही पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल झाला नाही. भारतीय तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले असून आजही पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर असल्याचं पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट करत सर्वसामान्यांना मोठा दिलासा दिला होता. त्यानंतर काही राज्य सरकारांनीही पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी केला होता. तेव्हापासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. 

कच्च्या तेलाच्या किमतींबाबत बोलायचं झालं तर आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या ट्रेडिंग सत्रात, जागतिक मानक मानल्या जाणार्‍या ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल 0.08 टक्क्यांनी वाढून $74.48 वर पोहोचली. त्याच वेळी, जागतिक स्तरावर, वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट कच्च्या तेलाच्या किमती न्यूयॉर्कमध्ये 0.37 टक्क्यांनी वाढून $71.20 प्रति बॅरलवर पोहोचल्या आहेत. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरही https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर  सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी