Petrol-Diesel Price Today : कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ; मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर, जाणून घ्या आपल्या शहरातील इंधनाचे दर

काम-धंदा
भरत जाधव
Updated Dec 10, 2021 | 10:09 IST

Petrol, Diesel Rates Today : पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

Petrol-Diesel Price Today
जाणून घ्या आपल्या शहरातील इंधनाचे दर   |  फोटो सौजन्य: Times Now

 Petrol, Diesel  latest Price in Maharashtra : नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये आज कोणताही बदल करण्यात आलेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. गेल्या महिन्याभरापासून तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये बदल केलेला नसून सलग 36 व्या दिवशीही देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. पण तरिही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. मोदी सरकारने 3 नोव्हेंबर रोजी पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात घट केली होती. त्यानंतर 4 नोव्हेंबरपासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लीटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लीटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचे शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोलसाठी 101.40 रुपये प्रति लीटरला मोजावे लागत आहेत आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकले जात आहे. मुंबई शहरांत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. 

पुण्यात (Petrol-Diesel Price In Pune) पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.  
अहमदनगरमध्ये पेट्रोल प्रति लीटर 110.52 रुपयांना विकले जातं आहे, तर डिझेल 93.27 रुपये प्रति लीटर. नागपूरमध्ये पेट्रोल 110.32 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेलसाठी  93.11 रुपये प्रती लीटरसाठी मोजावे लागत आहेत. नाशिक येथे पेट्रोलसाठी 109.79  मोजावे लागत आहेत. तर डिझेलला प्रति लीटरसाठी  92.57 मोजावे लागत आहे.
 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरही https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर  सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी