Petrol Diesel Price Today : भारतीय तेल कंपन्यांकडून पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी; जाणून घ्या आपल्या शहरातील आजचे दर

काम-धंदा
भरत जाधव
Updated Dec 21, 2021 | 08:41 IST

Petrol Diesel Rate Today : भारतीय तेल कंपन्यांनी (IOC) आजचे पेट्रोल (Petrol)-डिझेलचे (Diesel) दर जारी केले आहेत. परंतु आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

Petrol Diesel Price Today
सलग 47 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • सलग 47 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल नाही.
  • इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा

Petrol, Diesel  latest Price in Maharashtra : भारतीय तेल कंपन्यांनी (IOC) आजचे पेट्रोल (Petrol)-डिझेलचे (Diesel) दर जारी केले आहेत. परंतु आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नसून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. सलग 47 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. भारतीय तेल कंपन्यांनी (Indian oil companies) 04 डिसेंबरपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

इंधन दरवाढ कायम असल्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला काहीसा दिलासा आहे. IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलची किंमत 95.41 रुपये प्रति लीटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लीटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचे शहर असणाऱ्या मुंबई शहरात पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लीटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लीटरने आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लीटरने विकले जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकले जात आहे. 

महाराष्ट्रातील काही शहरांतील पेट्रोल-डिझेलचा दर

पुण्यात पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे.  अहमदनगरमध्ये पेट्रोलचे एका लीटरचे दर 110.15 रुपये आहेत. तर डिझेलचे दर 92.92 रुपये आहेत. नागपूरमध्ये एका लीटरच्या पेट्रोलसाठी 109.71 रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलसाठी 92.53 रुपये एका लीटरला द्यावे लागत आहेत. नाशिकमध्ये पेट्रोलचा दर 109.40 रुपये आहे. तर नाशकात डिझेलचे दर 92.29 रुपये आहेत.

गेल्या महिन्याभरात तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल केलेला नाही. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात कपात केली होती. त्यामुळे देशभरातील पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये घट झाल्याचे पाहायला मिळाले होते. नंतर अनेक राज्यांनी पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करत सर्वसामान्यांना दिलासा दिला होता.

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरही https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर  सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी