Petrol-Diesel Price Today : एक लिटर पेट्रोलसाठी किती रुपये मोजणार? जाणून घ्या आपल्या परिसरातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर

काम-धंदा
भरत जाधव
Updated Dec 16, 2021 | 13:08 IST

Petrol-Diesel Price Today : भारतीय तेलं कंपन्यांनी गुरुवारी सकाळी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. पण आजही दरामध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही. जवळपास दीड महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Petrol Diesel Price
जाणून घ्या आपल्या परिसरातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर   |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देत उत्पादन शुल्कात कपात केली होती.
  • आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

Petrol, Diesel  latest Price in Maharashtra : मुंबई : भारतीय तेलं कंपन्यांनी गुरुवारी सकाळी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. पण आजही दरामध्ये कोणताच बदल करण्यात आलेला नाही. जवळपास दीड महिन्यांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. केंद्र सरकारनं दिवाळीपूर्वी सर्वसामान्यांना दिलासा देत उत्पादन शुल्कात कपात केली होती. तेव्हापासून देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. 

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आज मुंबई शहरांत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. राजधानी दिल्लीत दिल्लीकरांना पेट्रोलसाठी 95.41 रुपये प्रति लीटरसाठी मोजावी लागत आहे. तर डिझेलसाठी 86.67 रुपये द्यावे लागत आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोलसाठी 101.40 रुपये द्यावे लागत आहेत, तर एक लिटर डिझेलसाठी तेथील नागरिक 91.43 रुपये मोजत आहेत. कोलकातामध्ये एक लीटर पेट्रोलचा दर 104.67 रुपये आहे तर    डिझेलसाठी 89.79 रुपये इतका दर आहे. 

महाराष्ट्रातील पुण्यात पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर नागपूर येथे पेट्रोल 109.71 या दराने मिळत आहे तर डिझेल 92.53 या दराने विकलं जात आहे. नाशिकमध्ये पेट्रोलसाठी ग्राहकांना 110.44 रुपये मोजावी लागत आहेत, तर डिझेलसाठी 93.17 रुपये द्यावे लागत आहेत. यवतमाळमधील ग्राहकांना 111.09 रुपये एका लीटरच्या पेट्रोलसाठी द्यावी लागत आहेत. तर डिझेलसाठी 93.86 रुपये द्यावी लागत आहेत. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरही https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर  सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी