Petrol-Diesel Price Today : देशातील अनेक राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, जाणून घ्या आपल्या शहरातील इंधनाचा दर

काम-धंदा
भरत जाधव
Updated Dec 05, 2021 | 11:20 IST

Petrol, Diesel Rates Today : सर्वसामान्यांना इंधन दरवाढीतील दिलासा कायम आहे. मागील काही दिवसांपासून इंधन कंपन्यांनी इंधन दरात कोणतीही वाढ झालेली नाही. जवळपास महिनाभरापासून इंधन कंपन्यांनी दर स्थिर ठेवले आहेत.

petrol-diesel prices on 5 December
देशातील अनेक राज्यात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर  |  फोटो सौजन्य: Times of India

Petrol, Diesel  latest Price in Maharashtra : सर्वसामान्यांना इंधन दरवाढीतील दिलासा कायम आहे. मागील काही दिवसांपासून इंधन कंपन्यांनी इंधन दरात कोणतीही वाढ झालेली नाही. जवळपास महिनाभरापासून इंधन कंपन्यांनी दर स्थिर ठेवले आहेत. मुंबईत (Mumbai) पेट्रोल (Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दर स्थिर आहेत. मुंबईत पेट्रोलचा दर 109.98 प्रतिलीटर आणि आणि डिझेलचा दर 94.14 प्रतिलिटर रुपयांवर स्थिर आहे. 

देशाची राजधानी दिल्ली, मुंबई, कोलकातासह देशातील विविध शहरांमध्ये रविवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर कायम राहिले आहेत. दिल्लीत सध्या पेट्रोलचा दर 95.41 प्रतिलीटर आणि डिझेलचा दर 86.67 प्रतिलीटर आहे. दरम्यान, इंधन दर स्थानिक कर आणि वाहतूक खर्चावर अवलंबून असल्याने दर राज्यानुसार इंधनाचे दर बदलतात. केंद्र सरकारने वॅटमध्ये कपात केल्यामुळे पेट्रोलवरील एकूण कर 50 टक्क्यांपर्यंत आणि डिझेलवर कर 40 टक्क्यांपर्यंत कमी झाला आहे. त्यामुळे ज्या राज्यांनी स्थानिक विक्री करातही कपात केली आहे. अशा राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेल अधिक स्वस्त आहे.

देशातील महत्त्वाच्या शहरातील इंधन दर

  • मुंबई 

पेट्रोल - 109.98  रुपये प्रति लिटर 
डिझेल - 94.14 रुपये  प्रति लिटर

  • दिल्ली

पेट्रोल - 95.41 रुपये  प्रति लिटर 
डिझेल - 86.67 रुपये प्रति लिटर 

  • चेन्नई

पेट्रोल - 104.67 रुपये प्रति लिटर
डिझेल -  89.79 रुपये  प्रति लिटर 

  • कोलकाता

पेट्रोल- 101.40 रुपये   प्रति लिटर 
डिझेल - 91.43 रुपये  प्रति लिटर 

  • बंगळुरू 

पेट्रोल- 100.58  रुपये प्रति लिटर 
डिझेल - 85.01 रुपये 

  • हैदराबाद 

पेट्रोल- 108.20 रुपये  प्रति लिटर 
डिझेल - 94.62 रुपये  प्रति लिटर 


 
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील पेट्रोल- डिझेल दर 

या राज्यात पेट्रोल-डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. 

लद्दाख, कर्नाटक, पुडुचेरी, जम्मू -कश्मीर, सिक्किम, मिजोरम, हिमाचल प्रदेश, दमन आणि दीव, दादरा आणि नगर हवेली, चंडीगढ़, छत्तीसगढ़, आसाम, मध्य प्रदेश, त्रिपुरा, गुजरात, नागालँड ,पंजाब, गोवा, मेघालय, ओडिशा, राजस्थान, अरुणाचल प्रदेश, मणिपुर, अंदमान आणि निकोबार, बिहार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि हरियाणामध्ये व्हॅट कमी करण्यात आला आहे. त्यानंतर या राज्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी घट झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरही https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर  सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

दरम्यान, जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर आणखी काही दिवस घसरण्याची शक्यता आहे. ही घसरण कायम राहिल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत किरकोळ किमती 15 दिवसांच्या 'रोलिंग' सरासरीच्या आधारे ठरवल्या जातात. अशा स्थितीत जागतिक स्तरावर दर सातत्याने घसरल्यानंतरच देशात इंधनाचे दर कमी होतील. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी