खूशखबर... पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा कपात, जाणून घ्या आजचे नवे दर

Petrol Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात होणारी घसरण सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. शनिवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात झाली आहे. जाणून घ्या आजचे नवे दर काय आहेत. 

petrol diesel price today slashed 2nd november business news marathi
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा कपात
  • इंधन दरात कपात झाल्याने नागरिकांना मोठा दिलासा
  • जाणून घ्या देशातील महत्वाच्या शहरांत काय आहे आजचे इंधन दर

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सुरु असलेली घसरण आज शनिवारी कायम असल्याचं दिसून आलं. शनिवारी पेट्रोलच्या दरात पाच ते सहा पैसे प्रति लिटर इतकी कपात झाली आङे. तर डिझेलच्या दरात पाच ते सात पैसे प्रति लिटरने कपात झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोलच्या दरात ५ पैसे प्रति लिटर इतकी कपात झाली आहे. त्यामुळे दिल्लीत पेट्रोलचा दर ७२.८१ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. तर डिझेलचा दर ६५.८० रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. 

मुंबईत पेट्रोल-डिझेलचा दर 

देशाच्या आर्थिक राजधानीत मुंबईत पेट्रोलच्या दरात झालेल्या कपातीनंतर हा दर ७८.४८ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. तर डिझेलचा दर ६८.९९ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. दिल्लीमध्ये आकारण्यात येणारे कर हे देशातील इतर महानगरांपेक्षा कमी आहेत त्यामुळे दिल्लीत पेट्रोल-डिझेल इतर महानगरांच्या तुलनेत स्वस्त मिळत.

कोलकातामध्ये काय आहे दर?

कोलकातामध्ये पेट्रोलच्या दरात ३ पैशांनी कपात झाली आहे त्यामुळे तेथे पेट्रोलचा दर ७५.५२ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. तर चेन्नईत पेट्रोलचा दर ७५.६७ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. दिल्लीला लागून असलेल्या नोएडा येथे पेट्रोलच्या दरात २ पैशांनी कपात झाल्यामुळे तेथे पेट्रोल ७४.५७ रुपये प्रति लिटर या दराने मिळत आहे.

अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारा संदर्भात सुरु असलेल्या सकारात्मक चर्चेमुळे दोन्ही देशांतील आर्थिक परिस्थितीवर त्याचा चांगला परिणाम दिसून आला. शुक्रवारी कच्च्या तेलाच्या किमतीत जवळपास ४ टक्कयांनी वाढ झाली आहे. शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया ११ पैशांनी मजबूत स्थितीत पोहोचत ७०.८१ रुपयांवर पोहोचला.

दरम्यान इंधन दरात झालेल्या या कपातीमुळे त्याचा मोठा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार आहे. यामुळे नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच बाजारातील तज्ञांच्या मते, अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार परिस्थिती आणखी सुधारल्यास इंधन दरात मोठी घसरण होण्याची शक्यता आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी