Petrol-Diesel Price Today : देशातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर, जाणून आपल्या शहरातील इंधनाचे दर

काम-धंदा
भरत जाधव
Updated Dec 20, 2021 | 13:30 IST

Petrol Diesel Price Today :गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल(Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दरात कोणतीच वाढ झालेली नाही किंवा बदल झालेला नाही. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOC)ने जाहीर केलेल्या नियमानुसार, दिल्ली आणि मुंबई, कोलकात्ता तसेच चेन्नईमधील दर आजही स्थिर आहेत.

Petrol-Diesel Price
देशातील अनेक शहरात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर  |  फोटो सौजन्य: Times Now

 Petrol, Diesel  latest Price in Maharashtra : मुंबई : गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल(Petrol) आणि डिझेलचे (Diesel) दरात कोणतीच वाढ झालेली नाही किंवा बदल झालेला नाही. इंडियन ऑयल कॉर्पोरेशन (IOC)ने जाहीर केलेल्या नियमानुसार, दिल्ली आणि मुंबई, कोलकात्ता तसेच चेन्नईमधील दर आजही स्थिर आहेत.

4 नोव्हेंबरपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही आणि आजचे दर पाहता मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर खूप वाढले आहेत आणि देशातील सर्वात स्वस्त पेट्रोल अंदमान निकोबारच्या बंदरात असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये 95.41 रुपये एक लीटर पेट्रोलसाठी मोजावे लागत आहे. तर डिझेलसाठी 86.67 रुपये द्यावे लागत आहेत. मुंबईत पेट्रोलसाठी 109.98 रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलसाठी 94.14 रुपये द्यावे लागत आहेत.  

देशाच्या प्रमुख शहरातील इंधन दर 

दिल्ली: पेट्रोल- 95.41 रुपये, डिझेल- 86.67 रुपये प्रति लीटर
मुंबईः पेट्रोल-109.98 रुपये प्रति लीटर, डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर
कोलकाताः पेट्रोल-104.67 रुपये प्रति लीटर, डिझेल-89.79 रुपये लीटर
चेन्नईः पेट्रोल- 104.67 रुपये प्रति लीटर, डिझेल 89.79 रुपये प्रति लीटर

अंतरराष्ट्रीय बाजारात कच्चा तेलाचे दर  

अंतरराष्ट्रीय बाजारात, ब्रेंट क्रूड 1.92 टक्क्यांच्या घसरणीसह प्रति बॅरल $ 72.11 वर व्यवहार करत आहे आणि नायमॅक्स क्रूड प्रति बॅरल $ 70 च्या खाली गेले आहे. 2.13 टक्क्यांनी घसरल्यानंतर ते प्रति बॅरल $69.35 वर व्यापार करत आहे.

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरही https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर  सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी