Petrol-Diesel Prices: काय सांगता! चक्क पाच दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर

काम-धंदा
भरत जाधव
Updated Apr 12, 2022 | 08:54 IST

देशात आधीच पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesle Price) किमतींनी उच्चांक गाठला आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे वाहनधारकांचा खिशाला अर्धा रिकामा होऊ लागलाय. अशात नागरिकांना गेल्या पाच दिवसांपासून तेल कंपन्यांनी दिलासा दिला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आपली भाववाढ थांबवली आहे.

Petrol-Diesel Prices
चक्क पाच दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर   |  फोटो सौजन्य: Times Now

Petrol-Diesle Price Today  : नवी दिल्ली : देशात आधीच पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesle Price) किमतींनी उच्चांक गाठला आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे वाहनधारकांचा खिशाला अर्धा रिकामा होऊ लागलाय. अशात नागरिकांना गेल्या पाच दिवसांपासून तेल कंपन्यांनी दिलासा दिला आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आपली भाववाढ थांबवली आहे. मंगळवारी सलग पाचव्या दिवशी तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आहे की नाही सुखद धक्का. दर कमी असण्याचं कारण म्हणजे जागतिक बाजारात कच्चे तेल स्वस्त असल्याने कंपन्यांनी दरवाढ थांबवली असल्याचं डीलर्सने सांगितलं आहे. 

पेट्रोल-डिझेलचे दर रोज वाढत असल्याने नागरिकांना रोज ते तपासावे लागतात. सरकारी तेल कंपन्यांनी आज मंगळवारी पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. त्यानुसार सलग पाचव्या दिवशी पेट्रोल डिझेलच्या दरात कोणतेही बदल झालेला नाही. सरकारी तेल कंपन्यांनी 22 मार्चनंतर आतापर्यंत पेट्रोल आणि डिझेल किमतीत 10.20 रुपये प्रति लीटरची वाढ झाली केली आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सध्या 120.51 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर डिझेल 104.77 रुपये प्रति लिटरवर स्थिर आहेत. तर देशाची राजधानी दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेल 96.67 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे.  

देशातील महानगरांत दर काय?
                     

शहरं   पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर) डिझेलच्या किमती (प्रति लिटर)
मुंबई  120.51 104.77 
दिल्ली  105.41   96.67
चेन्नई   110.85  100.94 
कोलकाता  115.12 99.83
हैद्राबाद 119.49   105.49 
कोलकाता  115.12   96.83
बंगळुरू 111.09   94.79  

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी