Petrol Diesel Rate Today:आज परत वाढला पेट्रोल-डिझेलचा भाव, पेट्रोलियम कंपन्यांनी 35 पैशांची केली दरवाढ; जाणून घ्या आपल्या शहरातील दर

काम-धंदा
भरत जाधव
Updated Oct 17, 2021 | 11:37 IST

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे. देशभरात रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली.

Petrol-diesel prices rose again today
आज परत वाढला पेट्रोल-डिझेलचा भाव  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पॉवर पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115.73 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 105.84आणि 94.57रुपये इतका आहे.
  • दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो.
  • ऑक्टोबर महिन्यात 13 वेळा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे.

मुंबई: ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये वाढ होत आहे. देशभरात रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने सामान्य नागरिकांचा खिसा खर्चाच्या ओझ्याने फाटला आहे. 

पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.77रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 102.52 रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115.73 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर अनुक्रमे 105.84आणि 94.57रुपये इतका आहे. हे दर आज दिवसभरासाठी लागू राहतील. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटरचा टप्पा गाठेल, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दररोज 6 वाजता बदलतात किंमती

दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत बदल होत असतो. सकाळी सहा वाजता नवे दर लागू केले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमती एक्साइज ड्युटी, डिलर कमिशन आणि अन्य गोष्टी जोडल्यानंतर त्याचा भाव जवळपास दुप्पट होतो.

कुठे पाहाल पेट्रोल- डिझेलचा दर 

आपण एसएमएसच्या माध्यमातून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकता. पेट्रोल-डिझेलच्या किमती दररोज सकाळी 6 वाजता बदलतात. इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवावा लागणार आहे. या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घेऊ शकतात.

जाणून घ्या तुमच्या शहरातील १७ ऑक्टोबरचा पेट्रोलचा दर 

शहर आजची पेट्रोल किंमत कालची पेट्रोल किंमत
अहमदनगर ₹ 111.88 (0.35) ₹ 111.53
अकोला ₹ 111.53 (-0.05) ₹ 111.58
अमरावती ₹ 113.28 (0.28) ₹ 113
औरंगाबाद ₹ 112.09 (-0.66)      ₹ 112.75
भंडारा ₹ 112.12 (0.02) ₹ 112.10
बीड ₹ 113.05 (-0.1) ₹ 113.15
बुलढाणा ₹ 112.46 (0.43) ₹ 112.03
चंद्रपूर ₹ 111.55 (0.02)     ₹ 111.53
धुळे ₹ 111.48 (0.33) ₹ 111.15
गडचिरोली ₹ 112.77 (0.75) ₹ 112.02
गोंदिया ₹ 113.24 (0.88)     ₹ 112.36
 मुंबई शहर ₹ 111.77 (0.34)     ₹ 111.43
हिंगोली ₹ 112.77 (0.34) ₹ 112.43
जळगाव ₹ 113.20 (0.47) ₹ 112.73
जालना ₹ 113.61 (1.08) ₹ 112.53
कोल्हापूर ₹ 111.84 (0.38) ₹ 111.46
लातूर ₹ 112.67 (0) ₹ 112.67
मुंबई उपनगर ₹ 111.77 (0.34)     ₹ 111.43
नागपूर ₹ 111.49 (0.34) ₹ 111.15
नांदेड ₹ 113.59 (0.12) ₹ 113.47
नंदुरबार ₹ 112.50 (0.45)     ₹ 112.05
नाशिक ₹ 112.40 (0.62) ₹ 111.78
उस्मानाबाद ₹ 112.69 (0.84) ₹ 111.85
पालघर ₹ 111.53 (-0.19)      ₹ 111.72
परभणी ₹ 113.95 (-0.36)      ₹ 114.31
पुणे ₹ 111.61 (0.2) ₹ 111.41
रायगड ₹ 111.42 (0.44) ₹ 110.98
रत्नागिरी ₹ 113.19 (-0.42)  ₹ 113.61
सांगली ₹ 111.52 (-0.33)  ₹ 111.85
सातारा ₹ 112.41 (0.34) ₹ 112.07
सिंधुदुर्ग ₹ 112.89 (-0.07)  ₹ 112.96
सोलापूर ₹ 111.52 (0.34) ₹ 111.18
ठाणे ₹ 111.61 (0.5) ₹ 111.11
वर्धा ₹ 111.87 (0.26) ₹ 111.61
वाशिम ₹ 112.51 (0.58) ₹ 111.93
यवतमाळ ₹ 112.85 (0.5) ₹ 112.35

 

जाणून घ्या तुमच्या शहरातील १७ ऑक्टोबरचा डिझेलचा दर 

शहर आजची डिझेल किंमत

कालची डिझेल किंमत

अहमदनगर ₹ 101.06 (0.38)     ₹ 100.68
अकोला ₹ 100.74 (-0.01)  ₹ 100.75
अमरावती ₹ 104.06 (1.94) ₹ 102.12
औरंगाबाद ₹ 101.25 (-2.22)      ₹ 103.47
भंडारा ₹ 101.31 (0.06)     ₹ 101.25
बीड ₹ 102.18 (-0.07)  ₹ 102.25
बुलढाणा ₹ 101.64 (0.46)     ₹ 101.18
चंद्रपूर ₹ 100.78 (0.06)     ₹ 100.72
धुळे ₹ 100.68 (0.36) ₹ 100.32
गडचिरोली ₹ 101.94 (0.75) ₹ 101.19
गोंदिया ₹ 102.39 (0.89)     ₹ 101.50
मुंबई शहर ₹ 102.52 (0.37)     ₹ 102.15
हिंगोली ₹ 101.94 (0.37) ₹ 101.57
जळगाव ₹ 102.32 (0.49)     ₹ 101.83
जालना ₹ 102.72 (1.08) ₹ 101.64
कोल्हापूर ₹ 101.04 (0.4) ₹ 100.64
लातूर ₹ 101.83 (0.04)     ₹ 101.79
मुंबई उपनगर ₹ 102.52 (0.37) ₹ 102.15
नागपूर ₹ 100.70 (0.36)     ₹ 100.34
नांदेड ₹ 102.71 (0.15)     ₹ 102.56
नंदुरबार ₹ 101.66 (0.48)     ₹ 101.18
नाशिक ₹ 101.52 (0.6) ₹ 100.92
उस्मानाबाद ₹ 101.85 (0.85) ₹ 101
पालघर ₹ 100.69 (-0.14)      ₹ 100.83
परभणी ₹ 103.05 (-0.3) ₹ 103.35
पुणे ₹ 100.79 (0.24)     ₹ 100.55
रायगड ₹ 100.58 (0.47) ₹ 100.11
रत्नागिरी ₹ 102.34 (-0.36)      ₹ 102.70
सांगली ₹ 100.73 (-0.28) ₹ 101.01
सातारा ₹ 101.55 (0.36)     ₹ 101.19
सिंधुदुर्ग ₹ 102.05 (-0.02)      ₹ 102.07
सोलापूर ₹ 100.72 (0.36) ₹ 100.36
ठाणे ₹ 100.76 (0.52)     ₹ 100.24
वर्धा ₹ 101.07 (0.29)     ₹ 100.78
वाशिम ₹ 101.69 (0.6) ₹ 101.09
यवतमाळ ₹ 101.15 (-0.83)  ₹ 101.98

 

 

 

अवघ्या 13 दिवसांत सुस्साट दरवाढ

ऑक्टोबर महिन्यात 13 वेळा इंधनाच्या दरात वाढ झाली आहे. या काळात पेट्रोल 3.85 रुपयांनी तर डिझेल प्रतिलीटरमागे 4.35 रुपयांनी महाग झाले आहे. आगामी काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर 90 डॉलर्स प्रतिबॅरल इतके होण्याचा अंदाज आहे. 

कच्च्या तेलाचे दर सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 78.17 डॉलर्स प्रतिबॅरल इतका झाला आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. तर ब्रेंट क्रूडची किंमत प्रतिबॅरल 81 डॉलर्स इतकी आहे. कोरोनामुळे खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी