Petrol, Diesel Price : डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी नागरिकांना दिलासा; पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर; जाणून घ्या आपल्या शहरातील इंधनाचे दर

काम-धंदा
भरत जाधव
Updated Dec 01, 2021 | 14:58 IST

Petrol, Diesel Price Today: भारतीय तेल कंपन्यांनी (Indian oil companies) पेट्रोल-डिझेलचे (Petrol-diesel) आजचे दर जारी केले आहेत. आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत.

Petrol-diesel prices stable
डिसेंबर महिन्याच्या पहिल्या दिवशी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर  |  फोटो सौजन्य: Times Now

Petrol, Diesel Price Today: नवी दिल्ली : भारतीय तेल कंपन्यांनी (Indian oil companies) पेट्रोल-डिझेलचे (Petrol-diesel) आजचे दर जारी केले आहेत. आजही देशातील सर्वात मोठ्या महानगरांतील पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातही ब्रेंट क्रूडच्या किमतींमध्ये आजही घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये अशीच घट सुरू राहिली तर मात्र येत्या काही दिवसांत पेट्रोल (Petrol) आणि डिझेल (Diesel) स्वस्त होऊ शकते. 

IOCL च्या अधिकृत वेबसाईटवरुन देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरांत पेट्रोलची किंमत 109.98 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 94.14 रुपये प्रति लिटर इतकी आहे. महाराष्ट्रातही पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी सर्वोच्च पातळी गाठली आहे. पुण्यात पेट्रोलची किंमत 109.45 रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत 92.25 रुपये प्रति लिटर इतकी आहे. अहमदनगरमध्ये प्रति लिटर पेट्रोलसाठी 110.48 रुपये मोजावे लागत आहेत. तर डिझेलसाठी 93.25 रुपये द्यावे लागत आहेत. नाशिकमध्ये एक लिटर पेट्रोलसाठी 109.60 रुपये द्यावे लागत आहेत. तर डिझेलसाठी 92.39 रुपये मोजावी लागत आहेत. 

देशाची राजधानी असलेल्या दिल्लीत पेट्रोलची किंमत 103.97 रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत 86.67 रुपये प्रति लिटर इतकी आहे. याशिवाय देशातील इतर महानगरांपैकी महत्त्वाचे शहर असणाऱ्या चेन्नईत पेट्रोल 101.40 रुपये प्रति लिटरने आणि डिझेल 91.43 रुपये प्रति लिटरने विकले जात आहे. तर कोलकातामध्ये डिझेलची किंमत 89.79 रुपये आणि पेट्रोल 104.67 रुपयांनी विकले जात आहे. 

देशातील महत्त्वाच्या शहरांतील पेट्रोल-डिझेलच्या किमती (Petrol Diesel Price ) काय?

  • मुंबई -

पेट्रोल 109.98    
डिझेल     94.14

  • दिल्ली    -

पेट्रोल 109.69     
डिझेल- 98.24

  • कोलकाता     

पेट्रोल -104.67     
डिझेल -89.79

  • चेन्नई     

पेट्रोल - 101.40
डिझेल  -91.43

  • नोएडा-

पेट्रोल – ₹95.51 प्रति लीटर
डिझेल– ₹87.01 प्रति लीटर

  • भोपाल-

पेट्रोल – ₹107.23 प्रति लीटर
डिझेल– ₹90.87 प्रति लीटर

  • बंगळुरू-

पेट्रोल – ₹100.58 प्रति लीटर
डिझेल– ₹85.01 प्रति लीटर

  • लखनऊ

पेट्रोल- 95.28 रुपये प्रति लीटर
डिझेल- 86.80 रुपये प्रति लीटर

  • चंडीगढ-

पेट्रोल – ₹94.23 प्रति लीटर
डिझेल– 80.90 रुपये प्रति लीटर

जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर आणखी काही दिवस घसरण्याची शक्यता आहे. ही घसरण कायम राहिल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत किरकोळ किमती 15 दिवसांच्या 'रोलिंग' सरासरीच्या आधारे ठरवल्या जातात. अशा स्थितीत जागतिक स्तरावर दर सातत्याने घसरल्यानंतरच देशात इंधनाचे दर कमी होतील. 

Today's Petrol Price in Maharashtra Cities  महाराष्ट्रातील शहारातील आजचे पेट्रोल दर 

शहर आजचे पेट्रोल दर  कालचे पेट्रोल दर
अहमदनगर ₹ 110.48 (0.3) ₹ 110.18
अकोला ₹ 110.09 (0.25) ₹ 109.84
अमरावती ₹ 111.46 (0.66) ₹ 110.80
औरंगाबाद ₹ 111.27 (-0.37)  ₹ 111.64
भंडारा ₹ 110.84 (0.03) ₹ 110.81
बीड ₹ 111.11 (-0.4) ₹ 111.51
बुलढाणा ₹ 110.52 (-0.18)  ₹ 110.70
चंद्रपूर ₹ 110.04 (-0.1) ₹ 110.14
धुळे ₹ 110.31 (0.64)     ₹ 109.67
गडचिरोली ₹ 110.98 (-1.13) ₹ 112.11
गोंदिया ₹ 111.21 (0.27) ₹ 110.94
मुंबई शहर ₹ 109.98 (-0.12)      ₹ 110.10
हिंगोली ₹ 111.59 (0.52) ₹ 111.07
जळगाव ₹ 111.03 (-0.32)  ₹ 111.35
जालना ₹ 111.66 (0.34) ₹ 111.32
कोल्हापूर ₹ 110.50 (-0.05)      ₹ 110.55
लातूर ₹ 111.50 (0.41)     ₹ 111.09
मुंबई उपनगर ₹ 109.98 (0) ₹ 109.98
नागपूर ₹ 109.71 (-0.38)  ₹ 110.09
नांदेड ₹ 112.63 (0.07) ₹ 112.56
नंदुरबार ₹ 110.94 (0) ₹ 110.94
नाशिक ₹ 109.60 (-0.8) ₹ 110.40
उस्मानाबाद ₹ 110.50 (-0.44)      ₹ 110.94
पालघर ₹ 110.35 (-0.28)      ₹ 110.63
परभणी ₹ 112.43 (0) ₹ 112.43
पुणे ₹ 110.32 (0.8) ₹ 109.52
रायगड ₹ 110.53 (0.91)     ₹ 109.62
रत्नागिरी ₹ 111.54 (-0.66)      ₹ 112.20
सांगली ₹ 109.65 (-0.4) ₹ 110.05
सातारा ₹ 110.59 (0.57) ₹ 110.02
सिंधुदुर्ग ₹ 111.65 (0.13) ₹ 111.52
सोलापूर ₹ 109.99 (-0.58)      ₹ 110.57
ठाणे ₹ 109.45 (-0.6)     ₹ 110.05
वर्धा ₹ 109.91 (-0.34)     ₹ 110.25
वाशिम ₹ 110.55 (0) ₹ 110.55
यवतमाळ ₹ 112.38 (0.65) ₹ 111.73

Today's Diesel Price in Maharashtra Cities महाराष्ट्रातील शहरातील आजचे डिझेल दर 

शहर आजचे डिझेल दर कालचे डिझेल दर
अहमदनगर ₹ 93.25 (0.29)     ₹ 92.96
अकोला ₹ 92.89 (0.24) ₹ 92.65
अमरावती ₹ 94.21 (0.64) ₹ 93.57
औरंगाबाद ₹ 94 (-1.79) ₹ 95.79
भंडारा ₹ 93.61 (0.02) ₹ 93.59
बीड ₹ 93.85 (-0.4) ₹ 94.25
बुलढाणा ₹ 93.30 (-0.18) ₹ 93.48
चंद्रपूर ₹ 92.86 (-0.09) ₹ 92.95
धुळे ₹ 93.09 (0.62)     ₹ 92.47
गडचिरोली ₹ 93.76 (-1.09)     ₹ 94.85
गोंदिया ₹ 93.97 (0.26) ₹ 93.71
मुंबई शहर ₹ 94.14 (-0.12) ₹ 94.26
हिंगोली ₹ 94.34 (0.5) ₹ 93.84
जळगाव ₹ 93.79 (-0.28) ₹ 94.07
जालना ₹ 94.38 (0.34) ₹ 94.04
कोल्हापूर ₹ 93.29 (-0.04) ₹ 93.33
लातूर ₹ 94.23 (0.39)     ₹ 93.84
मुंबई उपनगर ₹ 94.14 (0) ₹ 94.14
नागपूर ₹ 92.53 (-0.36) ₹ 92.89
नांदेड ₹ 95.33 (0.07) ₹ 95.26
नंदुरबार ₹ 93.69 (0) ₹ 93.69
नाशिक ₹ 92.39 (-0.77)     ₹ 93.16
उस्मानाबाद ₹ 93.27 (-0.43)     ₹ 93.70
पालघर ₹ 93.08 (-0.27) ₹ 93.35
परभणी ₹ 95.11 (0) ₹ 95.11
पुणे ₹ 93.08 (0.77) ₹ 92.31
रायगड ₹ 93.25 (0.87)     ₹ 92.38
रत्नागिरी ₹ 94.28 (-0.64) ₹ 94.92
सांगली ₹ 92.47 (-0.38)     ₹ 92.85
सातारा ₹ 93.34 (0.54) ₹ 92.80
सिंधुदुर्ग ₹ 94.39 (0.13) ₹ 94.26
सोलापूर ₹ 92.79 (-0.55) ₹ 93.34
ठाणे ₹ 92.22 (-1.99) ₹ 94.21
वर्धा ₹ 92.72 (-0.33) ₹ 93.05
वाशिम ₹ 93.33 (0) ₹ 93.33
यवतमाळ ₹ 95.10 (0.63) ₹ 94.47

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता. इंडियन ऑईलच्या वेबसाईटवरही https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर  सोप्या पद्धतीने पाहता येतील. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

दरम्यान, जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे दर आणखी काही दिवस घसरण्याची शक्यता आहे. ही घसरण कायम राहिल्यास भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट होण्याची शक्यता आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देशांतर्गत किरकोळ किमती 15 दिवसांच्या 'रोलिंग' सरासरीच्या आधारे ठरवल्या जातात. अशा स्थितीत जागतिक स्तरावर दर सातत्याने घसरल्यानंतरच देशात इंधनाचे दर कमी होतील. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी