Petrol Diesel Price | भाववाढ थांबेना! आज पुन्हा वाढले पेट्रोल-डिझेलचे दर...सीएनजीदेखील महागले

Inflation : पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलचे दर (Diesel Price)हा आता सर्वसामान्यांसाठी रोजच चिंता करण्याचा मुद्दा झाला आहे. आज पुन्हा एकदा दरात वाढ करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा 80 पैशांनी वाढ झाली आहे. एका दिवसाच्या दिलाशानंतर ही वाढ करण्यात आली आहे. दरवाढीनंतर 2 एप्रिल रोजी दिल्लीत पेट्रोल 102.61 रुपये आणि डिझेल 93.87 रुपये प्रतिलिटर दराने मिळते आहे.

Petrol Diesel Price Today
पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर 
थोडं पण कामाचं
  • पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा वाढ झाली आहे
  • 12 दिवसात 10 पटीने भाव वाढले आहेत
  • सीएनजीच्या दरातही वाढ झाली आहे

Petrol Diesel Price update 2 April 2022 : नवी दिल्ली : पेट्रोल (Petrol Price) आणि डिझेलचे दर (Diesel Price)हा आता सर्वसामान्यांसाठी रोजच चिंता करण्याचा मुद्दा झाला आहे. आज पुन्हा एकदा दरात वाढ करण्यात आली आहे. शनिवारी सकाळी देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा 80 पैशांनी वाढ झाली आहे. एका दिवसाच्या दिलाशानंतर ही वाढ करण्यात आली आहे. दरवाढीनंतर 2 एप्रिल रोजी दिल्लीत पेट्रोल 102.61 रुपये आणि डिझेल 93.87 रुपये प्रतिलिटर दराने मिळते आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतीमुळे सर्वच नागरिक हैराण झाले आहेत. आधीच असलेल्या महागाईत (Inflation)त्यामुळे आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. इंधन दरवाढीचा परिणाम बाजारपेठेतील सर्वच घटकांवर होत असतो. (Petrol-Diesel rate hike today, CNG rate also rise)

अधिक वाचा : Pakistan Currency update | पाकिस्तानी रुपया 'आयसीयू'मध्ये...डॉलरच्या तुलनेत झाली विक्रमी घसरण

12 दिवसात 10 पटीने वाढले भाव

12 दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 10 वेळा वाढ करण्यात आली आहे. 22 मार्चपासून देशभरात पेट्रोलचे दर 7.20 रुपयांनी वाढले आहेत. यापूर्वी 21 मार्च रोजी राजधानीत पेट्रोलचा दर 95.41 रुपये आणि डिझेलचा दर 86.67 रुपये प्रति लिटर होता.

अधिक वाचा : गुडी पाडव्याच्या मुहूर्तावर सोन्या-चांदीचे दर वाढले, खरेदी पूर्वी जाणून घ्या आजचा भाव

असा जाणून घ्या ताजा दर

तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर किती आहेत याची माहिती तुम्ही एसएमएसद्वारेही मिळवू शकता. यासाठी इंडियन ऑइल (IOCL) च्या ग्राहकांना RSP कोड लिहून ९२२४९९२२४९ या क्रमांकावर पाठवावा लागेल. तुम्हाला इंडियन ऑइलच्या वेबसाइटवर कोड सापडेल.

अधिक वाचा : Financial Planning Tips | नवीन आर्थिक वर्षात तुमच्या फायद्याच्या 5 गोष्टी... हे केल्यास तंदुरुस्त राहील तुमचा खिसा

सीएनजीच्या दरातही वाढ 

लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे, शुक्रवारी संध्याकाळीच आयजीएलने घरगुती गॅल म्हणजेच पीएनजीच्या किमतीही वाढवल्याचं जाहीर केले आहे. आयजीएलने सांगितले की पाईपद्वारे स्वयंपाकघरात पोहोचणाऱ्या पीएनजीची किंमत प्रति एससीएम 5.85 रुपयांनी वाढवण्यात आली आहे. या वाढलेल्या किमती १ एप्रिल २०२२ पासून लागू झाल्या आहेत. या वाढीनंतर आता दिल्ली एनसीआरमध्ये PNG च्या किमती ४१.७१/SCM वर गेल्या आहेत.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली असूनही पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढत आहेत. रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धादरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती फेब्रुवारीमध्ये प्रति बॅरल $ 130 च्या सर्वोच्च पातळीवरून $ 103 पर्यंत घसरल्या, परंतु राष्ट्रीय बाजारात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी झाल्या नाहीत.

रशियाबरोबर भारत करणार करार

अमेरिका आणि अमेरिकेचे समर्थक असलेल्या अनेक पाश्चात्य देशांनी रशियावर निर्बंध लादले आहेत. या निर्बंधांमधून वाट काढण्यासाठी रशिया भारताला सवलतीच्या दरात पेट्रोल, डिझेल, कोळसा आणि गॅसची विक्री करण्यास उत्सुक आहे. या संदर्भात दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरू आहे. चर्चा यशस्वी झाल्यास भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणावर पेट्रोल, डिझेल, कोळसा आणि गॅस खरेदी करणार आहे. खरेदी व्यवहार करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लवकरच लेखी करार होणार असल्याचे सूत्रांकडून समजते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी