Fuel Price Today: नवी दिल्ली : आज एलपीजी सिलिंडरच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला भूर्दंड बसणार आहे. मात्र दुसरीकडे आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. दिल्लीत पेट्रोल 105.41 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याचबरोबर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत एका लिटर पेट्रोलसाठी लोकांना 120.51 रुपये खर्च करावे लागत आहेत. आज 1 मे ला महाराष्ट्र दिनी (Maharashtra Day)ग्राहकांना पेट्रोल आणि डिझेलच्या दराच्या पार्श्वभूमीवर वाढ न झाल्याने थोडासा दिलासा मिळाला आहे. मात्र तुम्हाला माहित असले पाहिजे की व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत आज 100 रुपयांहून अधिक वाढ झाली आहे. (Petrol & Diesel rate remains stable in various parts of country)
अधिक वाचा : LPG Price Hike : एलपीजी गॅस सिलिंडर महागला, मे महिन्याच्या पहिल्या तारखेला सर्वसामान्यांना महागाईचा झटका
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर एलपीजी गॅस सिलिंडर, पेट्रोल, डिझेल, सीएनजी यांचे दर फारच महत्त्वाचे ठरत आहेत. या सर्व वस्तूंचे दर वाढल्याने सर्वसामान्यांच्या खिशावर प्रत्यक्ष भार तर वाढतोच. मात्र त्याचबरोबर महागाईतदेखील अतिरिक्त वाढ होते. पेट्रोलियम कंपन्या वेळोवेळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर करत असतात. तर एलपीजी गॅस सिलिंडरचे दर महिन्याच्या एक तारखेला जाहीर केले जातात. मागील काही महिन्यांपासून एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीतदेखील वाढ होते आहे.
इतर शहरांमध्ये विकल्या जाणार्या इंधनाचे दर किती आहेत?
शहर पेट्रोल (रु. प्रति लीटर) डिझेल (रु. प्रति लीटर)
बेंगळुरू 111.09 94.79
कोलकाता 115.12 99.83
दिल्ली 105.41 96.67
आग्रा 105.03 96.58
लखनौ 105.25 96.83
पोर्ट ब्लेअर 91.45 85.83
परभणी 123.51 106.08
श्रीगंगानगर 122.93 105.34
मुंबई 120.51 104.77
भोपाळ 118.14 101.16
जयपूर 118.03 100.92
रांची 108.71 102.02
पाटणा 116.23 101.06
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल 102 डॉलरच्या जवळ आहे. देशातील कच्च्या तेलाच्या करारातून पंपावर विकले जाणारे पेट्रोलचे चक्र 22 दिवसांचे असते म्हणजेच महिन्याच्या 1 तारखेला खरेदी केलेले कच्चे तेल 22 तारखेला पंपावर पोहोचते (सरासरी अंदाज). कच्च्या तेलावर प्रक्रिया करण्याचा खर्च एक लिटर किरकोळ तेलाच्या किंमतीमध्ये समाविष्ट केला जातो, त्यानंतर जेव्हा ते रिफायनरीतून बाहेर येते तेव्हा त्याची मूळ किंमत निश्चित केली जाते. त्यानंतर तेथून तेल पंपापर्यंत पोहोचवण्याचा खर्च, केंद्र व राज्याचे कर तसेच डीलरचे कमिशनही जोडले जाते. या सर्वाचा खर्च ग्राहकांकडून वसूल केला जातो.
तुम्ही तुमच्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज एसएमएसद्वारेही पाहू शकता. तुम्ही इंडियन ऑइलचे (IOC) ग्राहक असल्यास, तुम्ही RSP<डीलर कोड> 9224992249 पाठवू शकता आणि HPCL ग्राहक 92249992249 या क्रमांकावर HPPRICE <डीलर कोड> पाठवू शकतात. BPCL ग्राहक 9223112222 या क्रमांकावर RSP<डीलर कोड> पाठवू शकतात.