Petrol Price: पेट्रोलच्या दरात सलग घसरण सुरुच, सलग पाचव्या दिवशी कपात, पाहा आजचे दर

काम-धंदा
Updated May 13, 2019 | 19:56 IST | टाइम्स नाऊ मराठी

Petrol Price Today: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आज पुन्हा एकदा घसरण झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोलच्या दरात सलग घसरण सुरु आहेत. पाहूयात पेट्रोल आणि डिझेलचे आज काय दर आहेत.

Petrol diesel price falls
पेट्रोलच्या दरात सलग घसरण सुरुच  |  फोटो सौजन्य: BCCL

मुंबई: सर्वसामान्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण पेट्रोल आणि डिझेलच्या दरात घसरण सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे. तेल कंपन्यांनी दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि चेन्नईत पेट्रोल-डिझेलच्या दरात पुन्हा एकदा कपात केली आहे. यामुळे नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली आणि मुंबईत पेट्रोलच्या दरात ३० पैशांनी कपात करण्यात आली आहे. कोलकातामध्ये २९ पैशांनी कपात झाली आहे तर चेन्नईत ३२ पैशांनी कपात करण्यात आली आहे. तर, डिझेलच्या दरात दिल्ली आणि कोलकातामध्ये १३ पैशांनी कपात केली आहे. मुंबई आणि चेन्नईत १४ पैशांनी कपात करण्यात आली आहे.

गेल्या पाच दिवसांत राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरा १.५७ रुपये प्रति लिटर घसरण झाली आहे. तर, डिझेलच्या दरात गेल्या पाच दिवसांत ६८ पैसे प्रति लिटर इतकी घसरण झाली आहे. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार, सोमवारी इंधन दरात कपात झाल्यावर दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईत पेट्रोलचे दर क्रमश: ७१.४३ रुपये, ७३.५० रुपये, ७७.०४ रुपये आणि ७४.१४ रुपये प्रति लिटर इतके झाले. तर डिझेलच्या दरात घसरण होत क्रमश: ६५.९८ रुपये, ६७.७३ रुपये, ६९.१३ रुपये आणि ६९.७४ रुपये प्रति लिटर इतके झाले.

आंतरराष्ट्रीय बाजारात गेल्या १५ दिवसांत कच्च्या तेलाचा सरासरी भाव ७१.३२ डॉलर प्रति बॅरल इतका राहीला. गेल्या आठवड्यात कच्च्या तेलाचा उच्चांकी आणि निचांक दर हा क्रमश: ७५.६० डॉलर प्रति बॅरल आणि ६८.७९ डॉलर प्रति बॅरल इतका झाला.

बाजारातील तज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात होत असलेल्या चढ-उताराचा परिणाम भारतातील पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दोन आठवड्यांनंतर दिसून येतो. अँजल ब्रोकिंगचे डेप्युटी वाइस प्रेसिडेंट (एनर्जी आणि करन्सी रिसर्च) अनुज गुप्ता यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या किमतीत गेल्या १५ दिवसांपासून घसरण सुरु आहे. यामुळे येत्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात आणखीन घसरण होण्याची शक्यता खूपच कमी आहे. निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तीन ते चार रुपये प्रति लिटर वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, ही वाढ एकदम होणार नाही तर तेल कंपन्या हळूहळू पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ करतील.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी