पेट्रोल आणि डिझेलच्या दरांनी गाठला गेल्या २ वर्षांतला उच्चांक, जाणून घ्या आपल्या शहरातील किंमती

काम-धंदा
Updated Dec 04, 2020 | 10:40 IST | टाइम्स नाऊ मराठी

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. आज (शुक्रवारी) तर या दरांनी गेल्या दोन वर्षांतील उच्चांक गाठला आहे. जाणून घ्या मुख्य शहरांमधील इंधनांच्या किंमती, या दरवाढीमागचे कारण आणि ताजे दर.

Petrol and diesel prices
पेट्रोल आणि डीझेलच्या दरांनी गाठला गेल्या २ वर्षांतला उच्चांक, जाणून घ्या आपल्या शहरात काय आहेत किंमती 

थोडं पण कामाचं

  • का वाढत आहेत इंधनांच्या किंमती?
  • दररोज सकाळी ६ वाजता ठरतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती
  • कोणत्या शहरात किती आहेत पेट्रोल-डिझेलच्या किंमती?

नवी दिल्ली: सरकारी तेल कंपन्यांनी (Government oil firms) आज पुन्हा एकदा पेट्रोल (petrol) आणि डिझेलच्या (diesel) किंमतीत वाढ (hike) केली आहे. आज पेट्रोलची किंमत २० पैशांनी तर डिझेलची किंमत २३ पैशांनी वाढली आहे. त्यामुळे आज (शुक्रवारी) दिल्लीत पेट्रोलची किंमत ८२.८६ रुपये तर डिझेलची किंमत ७३.०७ रुपये प्रति लीटर झाली आहे. देशात गेल्या २५ महिन्यातील हा सर्वोच्च दर (highest point in 25 months) आहे. पैकी मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) हा दर सर्वाधिक आहे. इथे एक लीटर पेट्रोलची किंमत ९०.६२ रुपये तर डिझेलची किंमत ८०.८३ रुपये प्रति लीटर झाली आहे.

का वाढत आहेत इंधनांच्या किंमती?

यावर्षी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या किंमतीत विक्रमी घट झाल्याने इथेही दर कमी होण्याची आशा लोकांना होती. मात्र लोकांना दरवाढीचा झटका केंद्र सरकारने दिला आहे. सरकारने पेट्रोलवर १० रुपये आणि डीझेलवर १३ रुपये प्रति लीटर उत्पादन शुल्क वाढवले आहे. याआधी २०१४ साली पेट्रोलवरील कर ९.४८ रुपये प्रति लीटर होता तर डिझेलवरील कर ३.५६ रुपये होता. नोव्हेंबर २०१४ ते जानेवारी २०१६पर्यंत केंद्र सरकारने या करांमध्ये ९ वेळा वाढ केली. या १५ आठवड्यांमध्ये पेट्रोलवरील ड्युटी ११.७७ रुपये आणि डिझेलवरील ड्युटी १३.४७ रुपये प्रति लीटर या दराने वाढली आहे.

दररोज सकाळी ६ वाजता ठरतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती

दर दिवशी सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल होतात. सकाळी ६ वाजल्यापासूनच नवे दर लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत एक्साईज ड्यूटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्या गेल्यानंतर ही किंमत जवळपास दुप्पट होते.

कोणत्या शहरात किती आहेत पेट्रोल-डिझेलच्या किंमती?

शहर                 पेट्रोल दर (प्रति लीटर)                डिझेल दर (प्रति लीटर)

दिल्ली               ८२.८६                                     ७३.०७

मुंबई                 ८९.५२                                     ७९.६६

कोलकाता          ८४.३७                                     ७६.६४

चेन्नई                ८५.७६                                     ७८.४५            

लखनऊ             ८२.९४                                     ७३.४१

पटना                ८५.४३                                     ७८.३६

चंडीगढ             ७९.७८                                     ७२.८१         

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी