Petrol Price: बांगलादेशमध्ये पेट्रोल ५२% महागलं तरीही दर भारताप्रमाणेच, सर्वात स्वस्त अन् महाग पेट्रोल कुठल्या देशात?

Petrol Price updates: भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने त्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. पण भारतातच इंधन इतके महाग का? आणि भारताच्या शेजारील देशांत इंधन दर किती? वाचा

Representative Image
प्रातिनिधिक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • बांगलादेशमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तब्बल ५२ टक्क्यांनी वाढ 
  • बांगलादेशात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या 
  • भारताच्या शेजारील देशांत काय आहेत इंधन दर? 

Petrol-Diesel Price: भारतात गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात झालेल्या वाढीमुळे नागरिकांचं बजेट कोलमडलं आहे. पेट्रोलने शंभरी पार केली आहे. तर त्याच दरम्यान भारताच्या शेजारील बांगलादेशमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. बांगलादेश सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या किमती ५२% ने वाढवली आहे. इंधन दरात झालेल्या या वाढीनंतर तेथील नागरिक निषेधार्थ रस्त्यावर उतरले आहेत. (Petrol price in India is more than other countries check fuel rate of Pakistan Bhutan china Bangladesh)

आंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाच्या वाढलेल्या किमतींमुळे बांगलादेशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याचे तेथील सरकारचे म्हणणे आहे. बांगलादेशात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातच आता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाल्याने बांगलादेशमधील परिस्थिती आणखी गंभीर झाली आहे.

बांगलादेशमध्ये इंधन दरात इतकी वाढ झाली असली तरी तेथील पेट्रोल आणि डिझेलचे दर हे भारतातील दराच्या आसपासच असल्याचं दिसत आहे. भारतीय रुपयानुसार आपल्या शेजारील देशांमध्ये पेट्रोलचे दर काय आहेत हे आपण जाणून घेऊयात. यासोबतच सर्वात स्वस्त आणि सर्वात महाग पेट्रोल कोणत्या देशात हे जाणून घेऊयात.

अधिक वाचा : Passenger regulation : आता विजय मल्ल्या, नीरव मोदीसारखे लोक पळून जाऊ शकणार नाहीत, सरकार करते आहे ही व्यवस्था

बांगलादेशमध्ये पेट्रोल दरात किती वाढ?

५ ऑगस्ट २०२२ रोजीचा दर - ८९ टका प्रति लिटर म्हणजेच भारतीय रुपयानुसार ७४.१६ रुपये प्रति लिटर

६ ऑगस्ट २०२२ रोजीचा दर - १३५ टका प्रति लिटर म्हणजेच भारतीय रुपयानुसार ११२.५ रुपये प्रति लिटर

अधिक वाचा : Bullet Train Ticket Price: पहिल्या बुलेट ट्रेनचं किती असेल भाडे? रेल्वेमंत्री म्हणतात, आधी प्रोजेक्ट होऊ द्या मग ठरवू

या देशांत सर्वात स्वस्त पेट्रोल (किंमत भारतीय रुपयांत)

वेनेजुएला - १.७५ रुपये 
लिबिया - २.४४ रुपये 
ईराण - ४.२२ रुपये 
अल्जेरिया - २४.९३ रुपये 
अंगोला - २९.२० रुपये 

अधिक वाचा : 5G Services : खूशखबर! एअरटेल या महिन्यात सुरू करणार 5G सेवा, 2024 पर्यंत संपूर्ण देशभरात उपलब्ध... एअरटेलच्या नफ्यात दणदणीत वाढ

या देशांत सर्वात महाग पेट्रोल (किंमत भारतीय रुपयांत)

हाँगकाँग - २३५.२३ रुपये 
आईसलँड - १९५.३६ रुपये 
सेंट्रल अफ्रिकन - १८५.०१ रुपये 
बारबाडोस - १८४.६० रुपये 
नॉर्वे - १८४.४२ रुपये 

जगभरात पेट्रोलचा दर सरासरी १११.३७ रुपये 

भारतीय रुपयानुसार तुलना केली तर जगभरातील पेट्रोलची किंमत सरासरी १११.३७ रुपये इतकी आहे. अशा परिस्थितीत बहुतांश आशियाई देशांत पेट्रोलचे दर यापेक्षा कमी आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी