पेट्रोलच्या दरात वाढ, पाहा किती रुपयांनी महागलं पेट्रोल

काम-धंदा
Updated Apr 22, 2019 | 15:00 IST | टाइम्स नाऊ हिंदी

पेट्रोलच्या दरात आज वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. जाणून घ्या पेट्रोलच्या दरात किती रुपयांनी वाढ झाली आहे.

Petrol price raise
प्रातिनिधीक फोटो  |  फोटो सौजन्य: BCCL

नवी दिल्ली: पेट्रोलच्या दरात सोमवारी वाढ झाल्याचं पहायला मिळालं. पेट्रोलच्या दरात वाढ झाली असताना डिझेलच्या दरात मात्र घसरण झाली आहे. पण, येत्या काळात इंधन दरवाढ होण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. कारण, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ होत आहे. अमेरिकेद्वारे ईराणच्या कच्च्या तेलावर लावण्यात येणाऱ्या बंदीच्या शक्यते नंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी दिल्ली, कोलकाता आणि मुंबईत पेट्रोलच्या दरात पाच पैशांनी वाढ केली आहे. तर, चेन्नईत सहा पैशांनी वाढ केली आहे. मात्र, देशातील चार प्रमुख महानगरांत डिझेलच्या दरात सात पैशांनी कपात करण्यात आली आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरात सलग वाढ होत असल्याचं दिसत आहे त्यामुळे आगामी काळात इंधन दरवाढ होण्याची दाट शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोमवारी ब्रेंट क्रूडचा दर ७४ डॉलर पेक्षा अधिक झाला आणि डब्ल्यूटीआयचा दर ६५ डॉलर प्रति बॅरलहून अधिक झाला.

इंडियन ऑईलच्या वेबसाइटनुसार, दिल्ली, कोलकाता, मुंबई आणि चेन्नईत पेट्रोलच्या दरात क्रमश: ७३ रुपये, ७५.०२ रुपये, ७८.५७ रुपये आणि ७५.७७ रुपये प्रति लिटर इतका दर आहे. चारही महानगरांमध्ये डिझेलचा दर क्रमश: ६६.३९ रुपये, ६८.१३ रुपये, ६९.४९ रुपये आणि ७०.१० रुपये प्रति लिटर इतका झाला आहे.

तज्ञांच्या मते, लवकरच ईराणकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांना येत्या काळात संकटाचा समना करावा लागण्याची शक्यता आहे. अमेरिकेकडून या गोष्टीचे संकेत मिळत आहेत की, ईराणकडून तेलाचं आयात पूर्णपणे बंद किंवा त्यावर प्रतिबंध लावण्यास लावला जाण्याची शक्यता आहे. ईराणकडून इंधन मिळणं बंद झाल्यास त्याचा परिणाम पुरवठ्यावर होईल आणि त्यामुळे इंधनाच्या दरात वाढ होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

लोकप्रिय वीडियो
पुढची बातमी
पेट्रोलच्या दरात वाढ, पाहा किती रुपयांनी महागलं पेट्रोल Description: पेट्रोलच्या दरात आज वाढ झाली आहे. तर डिझेलच्या दरात घसरण झाली आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्याने पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. जाणून घ्या पेट्रोलच्या दरात किती रुपयांनी वाढ झाली आहे.
Loading...
Loading...
Loading...