पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग आठव्या दिवशी वाढ, जाणून घ्या आजचे नवे दर

Petrol Price Today: गेल्या अनेक दिवसांपासून होत असलेली इंधन दरवाढ आजही सुरुच असल्याचं दिसत आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मंगळवारी सुद्धा वाढ झाली आहे. जाणून घ्या पेट्रेल-डिझेलच्या दरात किती रुपयांनी वाढ झालीय

petrol price today diesel rate mumbai delhi chennai kolkata raise indian oil business news
पेट्रोल-डिझेलच्या दरात सलग आठव्या दिवशी वाढ, जाणून घ्या आजचे नवे दर  |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

  • पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ सुरुच
  • मंगळवारी सुद्धा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ
  • सलग आठव्या दिवशी पेट्रोल महागलं

नवी दिल्ली: पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सलग आठव्या दिवशी वाढ झाली आहे. तेल कंपन्यांनी मंगळवारी पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ केली आहे. ही दरवाढ पेट्रोलमध्ये २२-२३ पैसे प्रति लिटरने झाली आहे तर डिझेलच्या दरात १४ ते १५ पैसे प्रति लिटर इतकी झाली आहे. या दरवाढीनंतर भारतातील प्रमुख शहरांत पेट्रोल आणि डिझेलचे दर काय आहेत जाणून घेऊयात.

मुंबईत काय आहे दर? 

मुंबईत पेट्रोलच्या दरात २२ पैशांनी वाढ झाली आहे. या दरवाढीमुळे मुंबईत पेट्रोलचा दर ७९.७९ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. सोमवारी मुंबईत पेट्रोलचा दर ७९.५७ रुपये प्रति लिटर इतका होता. तर डिझेलचा दर ७०.२२ रुपयांवरुन ७०.३७ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे.

दिल्लीमध्ये पेट्रोल-डिझेलचा दर

दिल्लीत पेट्रोलचा दर ७३.९१ रुपयांवरुन ७४.१३ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. तर डिझेलचा दर ६६.९३ रुपये प्रति लिटरवरुन ६७.०७ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. देशातील इतर शहरांच्या तुलनेत दिल्लीमध्ये टॅक्स कमी आहे आणि त्यामुळे दिल्लीत पेट्रोल-डिझेलचे दर हे कमी आहेत. 

चेन्नई-कोलकातामध्ये काय आहे इंधन दर

चेन्नईत सोमवारी पेट्रोलचा दर ७६.८३ रुपये होता जो आता ७७.०६ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे. डिझेलचा दर ७०.७६ रुपयांवरुन ७०.९१ रुपये प्रति लिटर झाला आहे. तर कोलकातामध्ये पेट्रोलचा दर ७६.८२ रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर ६९.४९ रुपये प्रति लिटर इतका झाला आहे.

आठवड्याभरात मोठी वाढ

सोमवारी पेट्रोलच्या दरात २८-३१ रुपये प्रति लिटर इतकी वाढ झआली होती तर डिझेलच्या दरात १९ ते २१ पैसे प्रति लिटरने वाढ झाली होती. एकूणच गेल्या आठ दिवसांत पेट्रोलच्या दरात २.०९ पैशांनी वाढ झाली आहे तर डिझेलच्या दरात १.६५ पैसे प्रति लिटर इतकी वाढ झाली आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी