नवी दिल्ली: आज पुन्हा एकदा पेट्रोल (Petrol) आणि डीझेलच्या (diesel) किंमतीत वाढ (price hike) पाहायला मिळाली. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती स्थिर (stable) होत्या. मात्र आज या किंमतींमध्ये बदल (change) पाहायला मिळत आहेत. मागच्या किंमतीच्या तुलनेत आता या दोन्ही इंधनांची (fuels) किंमत वाढली आहे. मुंबईत (Mumbai) पेट्रोल पुन्हा एकदा वाढून 91 रुपयांच्या वर गेले आहे.
गेल्या पाच दिवसांपासून पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती स्थिर होत्या. मात्र आज सरकारी कंपन्यांनी पेट्रोल आणि डीझेलच्या किंमती वाढवल्या आहेत. यामुळे हे दर 20 पैशांपेक्षा जास्त वाढली आहे. दिल्लीत बुधवारी पेट्रोलची किंमत 84.45 रुपये प्रति लीटर झाली आहे. याशिवाय डीझेलची किंमत 74.63 रुपये झाली आहे. तर मुंबईत पेट्रोलची किंमत 91.07 रुपये प्रति लीटर आणि डीझेलची किंमत 81.34 रुपये प्रति लीटर झाली आहे.
आज चेन्नईत पेट्रोलची किंमत 87.18 रुपये प्रति लीटरवर पोहोचली आहे तर डीझेलची किंमत 79.95 रुपये प्रति लीटर झाली आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत 85.92 रुपये प्रति लीटर आणि डीझेलची किंमत 78.22 रुपये प्रति लीटर झाली आहे. आज झालेल्या वाढीच्या आधी दिल्लीत पेट्रोलचा दर हा 84.20 रुपये प्रति लीटर तर डीझेलचा दर 74.38 रुपये प्रति लीटर होता. तर मुंबईत वाढ होण्याआधीची पेट्रोलची किंमत 90.83 रुपये आणि डीझेलची किंमत 81.07 रुपये प्रति लीटर होती. तर कोलकातामध्ये पेट्रोल 85.68 रुपये आणि डीझेल 77.97 रुपये होते. चेन्नईतल्या या बदलांपूर्वीच्या किंमती पेट्रोल 86.96 रुपये आणि डीझेलची किंमत 79.72 रुपये होती.
आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचे दिसून आले आहे. ज्याचा परिणाम म्हणून देशातल्या इंधनदरातही वेगाने वाढ दिसून येत आहे. कच्चे तेल हे 53.50 डॉलर प्रति बॅरल या दराने सध्या विकले जात आहे तर ब्रेंट क्रूड प्रति बॅरल 56.58 डॉलर्सला पोहोचले आहे.