पेट्रोल, डिझेल आजचा भाव: पेट्रोल-डिझेल महागलं, मुंबईसह महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शहरातील दर पाहा

काम-धंदा
रोहित गोळे
Updated Jun 29, 2020 | 10:11 IST

Petrol and diesel prices Today 29 June: पेट्रोल आणि डिझेलचे दर आज पुन्हा एकदा वाढले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या दरात सतत वाढ होत आहे. हीच दरवाढ आज देखील पाहायला मिळाली.

petrol_diesel_price
पेट्रोल-डिझेल दर   |  फोटो सौजन्य: BCCL

थोडं पण कामाचं

 • पेट्रोल आणि डिझेल आज पुन्हा महागलं 
 • पेट्रोल आणि डिझेल महागल्याने सरकारविरोधात नाराजी
 • पेट्रोल डिझेलच्या किंमतीमध्ये दिवसेंदिवस वाढ

मुंबई: Petrol, diesel price Today 29 June, 2020: देशभरात इंधनाचे आज (२९ जून) पुन्हा पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले पाहायला मिळत आहेत. पेट्रोलच्या दरात (Petrol price) प्रति लिटर ५ पैशांची वाढ झाली आहे तर डिझेलच्या दरात (Diesel price) प्रति लिटर १२ पैशांची वाढ झाली आहे. काल (२८ जून) पेट्रोल-डिझेलमध्ये कोणतीही दरवाढ झाली नव्हती. मात्र, आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल-डिझेलचे भाव वाढले आहेत. गेल्या महिन्यात उत्पादन शुल्कात मोठी वाढ करण्यात आल्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतींमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. 

तेल कंपन्या देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती एकाच दिवशी वाढवतात, परंतु राज्यांमध्ये त्यांचे दर वेगवेगळे आहेत कारण त्यावर आकारण्यात येणारा सेल टॅक्स किंवा व्हॅट वेगवेगळ्या राज्यात बदलतात. मुंबईत पेट्रोलचे दर हे प्रचंड वाढले आहेत. मुंबईत पेट्रोलचे दर हे ८७.१९ रुपयांवर पोहचले आहेत. तर डिझेलचे दर हे ७८.८३ पर्यंत गेले आहेत. (Today Mumbai Petrol diesel Price)

दरम्यान, राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या तुलनेत डिझेलची किंमत वाढलेली पाहायला मिळत आहे. सध्या दिल्लीत पेट्रोलचा दर हा ८०.४३ रुपये आहे तर डिझेलचा दर ८०.५३ रुपये एवढा आहे. दिल्ली सरकारने व्हॅटमध्ये वाढ केल्यामुळे दिल्लीत डिझेल पेट्रोलपेक्षा महाग झाले आहे. 

दिल्ली सरकारने डिझेलवरील व्हॅट दर 16.75% वरुन 30% पर्यंत वाढविला आहे. त्याचप्रमाणे पेट्रोलवरील कराचा दर 27% वरुन 30% करण्यात आला. दिल्लीत डिझेलचे दर देशभरात दुसर्‍या क्रमांकावर आहेत. राजस्थानमध्ये डिझेल सर्वात महाग आहे.

महाराष्ट्रातील प्रमुख शहरांमधील पेट्रोल-डिझेलचे आजचे दर (Maharashtra Citywise Petrol-Diesel Price) 

शहरं पेट्रोल दर डिझेल दर
मुंबई ८७.१९ रुपये प्रति लिटर ७८.८३ रुपये प्रति लिटर 
ठाणे  ८६.८८ रुपये प्रति लिटर ७७.२४ रुपये प्रति लिटर
पुणे  ८७.१० रुपये प्रति लिटर ७७.४७ रुपये प्रति लिटर
नाशिक  ८७.३१ रुपये प्रति लिटर ७७.६९ रुपये प्रति लिटर
औरंगाबाद  ८७.७२ रुपये प्रति लिटर ७८.१५ रुपये प्रति लिटर
कोल्हापूर ८७.६९ रुपये प्रति लिटर ७७.१५ रुपये प्रति लिटर
लातूर  ८८.०८ रुपये प्रति लिटर ७८.५१ रुपये प्रति लिटर
नागपूर  ८७.५६ रुपये प्रति लिटर ७८.०२ रुपये प्रति लिटर
सातारा  ८७.४६ रुपये प्रति लिटर ७७.८५ रुपये प्रति लिटर
रत्नागिरी  ८८.१० रुपये प्रति लिटर ७८.४४ रुपये प्रति लिटर


देशातील प्रमुख शहरांमधील पेट्रोलचे दर

 1. दिल्लीः 80.43 रुपये प्रति लिटर
 2. मुंबईः 87.19 रुपये प्रति लिटर
 3. चेन्नई:  83.63 रुपये प्रति लिटर
 4. गुरुग्राम: 78.23 रुपये प्रति लिटर
 5. हैदराबादः 83.49 रुपये प्रति लिटर
 6. बंगळुरू: 83.04 रुपये प्रति लिटर

देशातील प्रमुख शहरांमध्ये डिझेलचे दर

 1. दिल्लीः 80.53 रुपये प्रति लिटर
 2. मुंबईः 78.83 रुपये प्रति लिटर
 3. चेन्नई: 77.72 रुपये प्रति लिटर
 4. गुरुग्राम: 72.39 रुपये प्रति लिटर
 5. हैदराबादः 78.69 रुपये प्रति लिटर
 6. बंगळुरू: 76.58 रुपये प्रति लिटर
   

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी