LPG Gas Cylinder Price Hike: मोठा धक्का! एलपीजी गॅस सिलिंडरच्या दराबाबत सरकारचा निर्णय...कोट्यवधी ग्राहकांना बसणार फटका

LPG Gas Cylinder : सातत्याने वाढत असलेल्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त आहेत. त्यात आता त्यांना या आघाडीवर पुन्हा एकदा झटका बसण्याची चिन्हे आहेत. देशभरातील गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींबाबत सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. एलपीजी सिलिंडरवरील सवलत आता रद्द करण्यात आली आहे.

LPG Cylinder Price
एलपीजी सिलिंडरचे दर 
थोडं पण कामाचं
  • एलपीजी गॅस सिलिंडर आणखी महागणार
  • पेट्रोलियम कंपन्यांनी गॅस सिलिंडरवरील सलवत रद्द करण्याचा घेतला निर्णय
  • कोट्यवधी ग्राहकांना बसणार फटका

LPG Gas Price Update : नवी दिल्ली : एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत (LPG Gas Cylinder Price)ही सर्वसामान्यांसाठी महत्त्वाची बाब असते. स्वयंपाक घरातील बजेटचा तो महत्त्वाचा भाग असतो. सातत्याने वाढत असलेल्या एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीमुळे सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त आहेत. त्यात आता त्यांना या आघाडीवर पुन्हा एकदा झटका बसण्याची चिन्हे आहेत. देशभरातील गॅस सिलेंडरच्या वाढत्या किमतींबाबत सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. येत्या दिवसात एलपीजी गॅस सिलिंडर घेण्यासाठी आणखी पैसे मोजावे लागणार आहेत. तुमच्या माहितीसाठी एलपीजी सिलिंडरवरील सवलत (Discount on Gas Cylinder) आता रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांना एलपीजी गॅस सिलिंडर बुकिंगसाठी आणखी रुपये खर्च करावे लागतील. (Petroleum companies to stop discount on LPG Gas Cylinder)

अधिक वाचा - Sitting Job Side Effects: तुमचे काम बैठे आहे का? ऑफिस किंवा घरी तासनतास बसून काम केल्यास लागतील हे आजार...

गॅस सिलिंडरवरील सवलत रद्द

आतापर्यत सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांकडून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरवर 200 ते 300 रुपयांची सूट दिली जात होती. मात्र कंपन्यांनी ही सवलत आता रद्द केली आहे. व्यावसायिक सिलिंडरवर अधिक सवलत देणाऱ्या वितरकांच्या तक्रारी लक्षात घेऊन पेट्रोलियम कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे. सर्वसामान्यांना याचा मोठा फटका बसत व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर महाग होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा - Skin Dryness: रुक्ष त्वचेवर करा घरगुती उपाय, असं बनवा मॉइश्चुरायझर

पेट्रोलियम कंपन्यांचा आदेश

या नव्या निर्णयामुळे ग्राहकांना गॅस सिलिंडरवर सूट मिळणार नाही. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन (IOC) आणि एचपीसीएल (HPCL) आणि बीपीसीएल ( BPCL) या तीन आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी एलपीजी गॅस सिलिंजरच्या वितरकांना सांगितले आहे की, आतापासून कोणत्याही व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या ग्राहकांना सवलतीची सुविधा मिळणार नाही. सवलत रद्द करण्याचा निर्णय 8 नोव्हेंबरपासून लागू झाला आहे.

अधिक वाचा - गँगवॉरमधून 22 वर्षीय तरुणाची हत्या

कोणत्या सिलिंडरवर सवलत नाही

इंडियन ऑइलने दिलेल्या माहितीनुसार, 19 किलो आणि 47.5 किलोचे सिलिंडर यावर आता सवलत मिळणार नाही. सवलतीशिवायच्या दरात हे गॅस सिलिंजर विकले जातील. तर एचपीसीएलने म्हटले आहे की 19 किलो, 35 किलो, 47.5 किलो आणि 425 किलोच्या सिलिंडरवर उपलब्ध असलेल्या सर्व सवलती रद्द केल्या आहेत.

आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांना हा मोठाच धक्का असणार आहे. याआधी नवरात्रीमध्ये एलपीजी सिलेंडरच्या (LPG cylinder price) दरात कपात करण्यात आली होती. देशातील व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत( LPG latest price)  ही कपात करण्यात आली होती. घरगुती सिलेंडरच्या दरात मात्र कोणतीही कपात करण्यात आली नव्हती. याचबरोबर पीएनजीच्या दरातदेखील मागील काळात वाढ झाली आहे. इंधनाचे दर वाढल्याने अनेक स्तरावर महागाई वाढण्याची भीती असते. एलपीजी गॅस आणि पेट्रोल-डिझेलच्या दरावर सरकारने दिलासा द्यावा अशी अपेक्षा सर्वसामान्यांना आहे. दर महिन्याच्या पहिल्या तारखेला पेट्रोलियम कंपन्या एलपीजी गॅस सिलिंडरचे नवे दर जाहीर करत असतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी