Digital gold vs Physical Gold: प्रत्यक्ष सोनं की डिजिटल सोनं? कुठली गुंतवणूक ठरते फायद्याची?

भारतीयांचं सोन्यात गुंतवणूक करण्याचं प्रमाण लक्षणीय आहे. मात्र गेल्या काही वर्षात डिजिटल सोनं खरेदीचं प्रमाण वाढत आहे. प्रत्यक्ष सोनं घेणं अधिक चांगलं की डिजिटल सोनं, हे आपण समजून घेऊया.

Digital gold vs Physical Gold
प्रत्यक्ष सोनं की डिजिटल सोनं?  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • डिजिटल सोनं घ्यावं की प्रत्यक्ष सोनं?
  • अनेकांपुढे असतो पेच
  • दोन्हीचे वेगवेगळे फायदे आणि तोटे

Digital gold vs Physical Gold: भारतीयांच्या मनात सोन्याला (Gold) विशेष स्थान आहे. सोनं हे श्रीमंतीचं आणि समृद्धीचं प्रतिक मानलं जातं. लाखो भारतीयांसाठी सोनं हा गुंतवणुकीचा एक सर्वात विश्वासार्ह स्रोत मानला जातो. वर्षानुवर्षं लोक सोन्यात पैसे गुंतवतात आणि काही वर्षांनी त्यातून चांगलाच नफा कमावत असल्याचं दिसून येतं. गेल्या काही वर्षात प्रत्यक्ष सोनं घेण्याऐवजी (Physical Gold) ऑनलाईन सोनं (Digital Gold) खरेदी कऱण्याचा ट्रेंड वाढत असल्याचं चित्र आहे. वेगवेगळ्या मुहूर्तांवर, कार्यक्रमाच्या वेळी आणि मंगल प्रसंगी सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर केली जाते. डिजिटल सोनं घेतल्यामुळे ग्राहकांना 24 कॅरेट शुद्ध सोनं घेतल्याचं समाधानही मिळतं. तुम्ही पेटीएम, गुगल पे, फोन पे, MMTC यासारख्या प्लॅटफॉर्मवरून सोन्यात गुंतवणूक करू शकता. मात्र प्रत्यक्ष सोनं घेणं अधिक फायद्याचं ठरतं की डिजिटल सोनेखरेदी बरी पडते, हे समजून घेणं आवश्यक आहे. दोन्हीचे काही फायदे तर काही तोटे असतात. 

डिजिटल सोन्याचे फायदे

डिजिटल सोनं घेण्यासाठी तुमच्याकडे खूप पैसे असण्याची गरज नसते. तुम्ही एक रुपयापासून कितीही रुपयांच्या सोन्याची खरेदी करू शकता. शिवाय 24 कॅरेट शुद्ध सोनं तुम्हाला मिळत असतं. सोनं खरं आहे की बनावट याची चाचपणी करत बसण्याची गरज नसते. त्यामुळे याबाबत फसवणूक होण्याची शक्यताही नसते. हे सोनं विकल्यानंतर ताबडतोब तुमच्या खात्यात पैसे जमा होतात. 

अधिक वाचा - Cheap Movie Tickets: सिनेमाचं तिकीट आणि पॉपकॉर्न होणार स्वस्त, असे असतील दर

डिजिटल सोन्याचे तोटे

डिजिटल सोनं घेण्याचे जसे फायदे आहेत, तसेच तोटेही आहेत. डिजिटल सोन्यावर 3 टक्के जीएसटी लागतो. उदाहरणार्थ जर तुम्ही 10 हजार रुपयांचं सोनं विकत घेणार असाल, तर तुम्हाला 10,300 रुपये भरावे लागतात. त्याशिवाय दोन ते तीन टक्के रक्कम ही स्टोअरेज, इन्शुरन्स आणि ट्रस्टी फीच्या रुपात भरावी लागते. यासाठी कुठलाही रेग्युलेटर नसतो. 

लिक्विडिटीचा फायदा

डिजिटल सोनं हे पूर्णतः लिक्विड असतं. याचा उपयोग कोलॅट्रल स्वरुपात होऊ शकतो. हे सोनं तुम्ही गहाण ठेवलंत, तर तुम्हाला सहज कर्जही मिळू शकतं. त्याचप्रमाणं या सोन्याची खरेदीविक्री करण्यासाठी दरवेळी कागदपत्रांची पूर्तता करण्याचीही गरज नसते. 

अधिक वाचा - Mukesh Ambani news: 5G मध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स समुहाने केला मोठा करार

दोन लाखांपर्यंत मुदत

डिजिटल सोन्यात कुठल्याही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्ही जास्तीत जास्त 2 लाख रुपयांपर्यंत सोन्याची गुंतवणूक करू शकता. त्याला सुरक्षित आणि विम्याच्या संरक्षणाखाली ठेवण्यात येतं. काही प्लॅटफॉर्मवर स्टोअरेजच्या वेळेची मर्यादाही घालून देण्यात आलेली असते. एकंदर प्रत्यक्ष सोनं घेण्यापेक्षा डिजिटल सोनं घेणं सोयीचं ठरतं. 

प्रत्यक्ष सोनं

प्रत्यक्ष सोनं घेताना त्याच्या दर्जाबाबत फसवणूक होण्याची शक्यता असते. दुकानातील सोन्यात भेसळ असण्याचीही शक्यता असते. गरजेच्या वेळी तुम्ही सोनं विकायला गेलात, तर तुम्हाला त्याचा पूर्ण पैसा लगेच मिळेलच, याची खात्री देता येत नाही. शिवाय तुमच्या मूळ गुंतवणुकीत वजन आणि इतर कारणांमुळे घट होण्याचीही शक्यता असते. सोनं बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलं, तर त्यासाठीही पैसे मोजावे लागतात. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी