Modi Government | मोठी बातमी! केंद्र सरकार तुमच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर करणार का, जाणून घ्या काय आहे प्रकरण?

Social Media message : सर्वसामान्यांना कोरोनाच्या संकटाला तोंड देताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी या सुविधा दिल्या जात होत्या. देशात पुन्हा एकदा ओमिक्रॉनचा प्रसार होत आहे, त्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral Message) होतो आहे. या मेसेजमध्ये केंद्र सरकार देशातील तरुणांना कोरोनाच्या उपचारासाठी 4000 रुपये देत असल्याचा दावा केला जात आहे.

PIB Fact Check of social media message
कोरोना उपचारासाठी सरकार 4,000 रुपये देत असल्याच्या बातमीचा फॅक्ट चेक 
थोडं पण कामाचं
  • कोरोना महामारीच्या संकटाच्या काळात केंद्र सरकारने सर्वसामान्यांसाठी अनेक सुविधा सुरू केल्या
  • कोरोना उपचारासंदर्भात सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल
  • व्हायरल मेसेजचे पीआयबीकडून फॅक्ट चेक

PIB Fact Check :  नवी दिल्ली : देशभरात पसरलेल्या कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) संकटाच्या काळात केंद्र सरकारने (Central Government) सर्वसामान्यांसाठी अनेक सुविधा सुरू केल्या होत्या. सर्वसामान्यांना कोरोनाच्या संकटाला तोंड देताना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी या सुविधा दिल्या जात होत्या. देशात पुन्हा एकदा ओमिक्रॉनचा प्रसार होत आहे, त्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एक मेसेज मोठ्या प्रमाणावर व्हायरल (Viral Message) होतो आहे. या मेसेजमध्ये केंद्र सरकार देशातील तरुणांना कोरोनाच्या उपचारासाठी 4000 रुपये देत असल्याचा दावा केला जात आहे. या मेसेजच्या संपूर्ण सत्याबद्दल तुम्ही जाणून घ्या. (PIB Fact Check of news Modi government giving Rs 4,000 for corona treatment)

अधिक वाचा : Property Tips | घर खरेदी करतांय? मग खरेदीपूर्वी तपासा ही 5 कागदपत्रे, होणार नाही फसवणूक

केंद्र सरकार देतेय 4000 रुपये 

या व्हायरल मेसेजमध्ये असे लिहिले आहे की, पंतप्रधान रामबन सुरक्षा योजनेअंतर्गत सरकार सर्व तरुणांना मोफत उपचारासाठी 4000 रुपयांची मदत करत आहे. या व्हायरल मेसेजची सत्यता जाणून घेण्यासाठी पीआयबीने फॅक्ट-चेक केले, ज्यामध्ये हा मेसेज बनावट असल्याचे आढळून आले आहे.

ट्विटमधील दावा खोटा 

पीआयबीने ट्विटमध्ये लिहिले आहे की, तुम्ही तुमची वैयक्तिक माहिती कोणत्याही बनावट वेबसाइटवर शेअर करू नका. केंद्र सरकारकडून सध्या अशी कोणतीही योजना राबविली जात नाही. हा दावा पूर्णपणे बोगस आहे.

अधिक वाचा : Indian Railways Rule | रात्रीच्या प्रवासासाठीचा रेल्वेचा हा खास नियम जाणून घ्या, नाहीतर होईल नुकसान

सरकार पैसे देत नाही

पीआयबीने आपल्या तथ्य तपासणीमध्ये लिहिले आहे की भारत सरकारने अशी कोणतीही घोषणा केलेली नाही. अशा कोणत्याही बनावट संदेशाच्या लिंकवर तुमची कोणतीही वैयक्तिक माहिती शेअर किंवा फॉरवर्ड करू नका.

व्हायरल मेसेजची तपासता येते सत्यता

असा कोणताही मेसेज तुमच्यापर्यंत आल्यास, तुम्ही त्याची सत्यता जाणून घेण्यासाठी फॅक्ट चेक करू शकता. तुम्ही PIB द्वारे तथ्य तपासणी करू शकता. यासाठी तुम्हाला https://factcheck.pib.gov.in/ या अधिकृत लिंकला भेट द्यावी लागेल. याशिवाय, तुम्ही व्हॉट्सअॅप नंबर +918799711259 किंवा ईमेल: pibfactcheck@gmail.com वर व्हिडिओ पाठवू शकता.

अधिक वाचा : 7th Pay Commission | आनंदाची बातमी! ४७ लाख कर्मचारी आणि ६८ लाख पेन्शनधारकांसाठी ...पाहा कोणाला, किती मिळणार फायदा

सोशल मीडियावरील व्हायरल माहिती

सोशल मीडियाच्या वाढत्या प्रसार आणि वापराच्या काळात त्याची नकारात्मक बाजूदेखील समोर येत असते. अनेकवेळा सोशल मीडियाचा वापर करून चुकीची किंवा खोटी माहितीदेखील पसरवली जाते. लक्ष वेधून घेणारी किंवा आश्चर्यकारक बाब लगेच व्हायरल होत असते. अशा सोशल मीडियावरील असा बातम्या किंवा पोस्ट यांना बळी पडून अनेकांचे नुकसान होऊ शकते. त्यामुळे सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करतानाच त्यातील माहितीची खातरजमा करून घेणे देखील महत्त्वाचे ठरते. इंटरनेटच्या जमान्यात सोशल मीडियाचे महत्त्व प्रचंड वाढले आहे. मात्र याचा वापर जबाबदारीने होणेदेखील तितकेच महत्त्वाचे आहे. कोरोना महामारीच्या संकटाला भारतच नव्हे तर सर्व जगच तोंड देते आहे. अशावेळी कोरोनासंदर्भातील कोणत्याही चुकीच्या बातमीला सर्वसमान्यांनी बळी पडता कामा नये. सर्वसामान्यांचे यामुळे अधिक नुकसान होऊ नये म्हणूनच पीआयबीद्वारे फॅक्ट चेककरून खरे काय किंवा खोटे काय याची खातरजमा करत सर्वसामान्यांसमोर खरी माहिती आणली जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी