Best Travel Credit Cards | फिरायला जायचे प्लॅनिंग करतायेत का? मग या ५ क्रेडिट कार्डवर मिळतायेत मोठे फायदे

Best Travel Credit Cards | पर्यटनाला जायचे म्हणजे हॉटेलचे बुकिंग (Hotel Booking), रेल्वे किंवा विमान तिकिटाचे बुकिंग, शॉपिंग (Shopping)या सर्व गोष्टी आल्याच. अशावेळी काही क्रेडिट कार्ड्स (Credit Cards)तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. देशात आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रवासांसाठी आणि पर्यटनासाठी ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड्स बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुरुप योग्य त्या क्रेडिट कार्डची (Travel Credit Cards)निवड करू शकता.

Travel Credit Cards
ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड 
थोडं पण कामाचं
  • पर्यटन आणि सुट्ट्यांच्या सीझनची लवकरच सुरूवात
  • पर्यटनाचे प्लॅनिंग करणाऱ्यांसाठी विविध क्रेडिट कार्ड्स उपलब्ध
  • हॉटेलचे बुकिंग, रेल्वे किंवा विमान तिकिटाचे बुकिंग, शॉपिंग साठी क्रेडिट कार्ड्सवर ऑफर

Travel Credit Cards | नवी दिल्ली : लवकरच नाताळ आणि नवीन वर्ष यामुळे सुट्ट्या आणि पर्यटनाचा हंगाम (Tourism)सुरू होणार आहे. अनेक लोकांनी पर्यटनाचे प्लॅनिंगदेखील (Travel planning) सुरू केले आहे. पर्यटनाला जायचे म्हणजे हॉटेलचे बुकिंग (Hotel Booking), रेल्वे किंवा विमान तिकिटाचे बुकिंग, शॉपिंग (Shopping)या सर्व गोष्टी आल्याच. अशावेळी काही क्रेडिट कार्ड्स (Credit Cards)तुम्हाला उपयुक्त ठरू शकतात. देशात आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रवासांसाठी आणि पर्यटनासाठी ट्रॅव्हल क्रेडिट कार्ड्स बाजारात उपलब्ध आहेत. तुम्ही तुमच्या गरजेनुरुप योग्य त्या क्रेडिट कार्डची (Travel Credit Cards)निवड करू शकता. पाहूया कोणकोणते पर्याय उपलब्ध आहे आणि त्यात कोणते फायदे मिळतायेत. (Planning to go for travel, these 5 credit cards offering many benefits)

१. Axis Vistara सिग्नेचर क्रेडिट कार्ड

या क्रेडिट कार्डमध्ये विस्तारा मेंबरशिपचा फायदा मिळतो. याशिवाय भारतात असलेल्या विस्तारा लॉन्जच्या अॅक्सेसचा देखील यात समावेश आहे. यामध्ये ग्राहकांना २.५ कोटी रुपयांपर्यतचे एअर अॅक्सिडेंट कव्हर मिळते. शिवाय बोनस क्लब विस्तारा पॉइंट्स आणि प्रिमियम इकॉनॉमी तिकिट आणि इतरही फायदे उपलब्ध आहेत. या कार्डचे वार्षिक शुल्क ३,००० रुपये आहे.

२. HDFC Regalia क्रेडिट कार्ड

एचजीएफसी रेगॅलिया क्रेडिट कार्डमध्ये १ कोटी रुपयांपर्यतचे एअर अॅक्सिडेंट डेथ कव्हर मिळते. यामध्ये १५ लाख रुपयांपर्यतचे इमर्जन्सी ओव्हरसीज हॉस्पिटलायझेशन बेनेफिटदेखील उपलब्ध आहे. यामध्ये २ टक्के फॉरेन करन्सी मार्कअप शुल्क देखील लागते. यामध्ये कॉम्पिमेंटरी एअरपोर्ट लॉन्ज अॅक्सेसा लाभदेखील समाविष्ट आहे. यामध्ये भारत आणि सहा इतर देशांमधील १२ एअरपोर्ट लॉन्जचा समावेश आहे. या कार्डचे वार्षिक शुल्क २,५०० रुपये आहे.

३. Air India SBI सिग्नेचर क्रेडिट कार्ड

यामध्ये एअर इंडिया पोर्टलद्वारे बुक करण्यात आलेली एअर इंडियाच्या तिकिटांवर प्रत्येक १०० रुपयांमागे ३० रिवार्ड पॉइंट मिळतात. याशिवाय एअर इंडिया फ्रिक्वेंट फ्लायर प्रोग्रॅम फ्लाइंग रिटर्नची मेंबरशिप, ६०० पेक्षा जास्त एअरपोर्ट लॉन्जचा अॅक्सेस सोबत प्रायोरिटी पास प्रोग्रॅम इत्यादीचा लाभ समाविष्ट आहे.

४. SBI Card Elite क्रेडिट कार्ड

यामध्ये ट्रायडेन्ट प्रिव्हिलेज मेंबरशिपसोबत क्लब विस्तारा मेंबरशिप आणि एक अपग्रेड व्हाउचरचा फायदा मिळतो. यामध्ये १.९९ टक्क्यांची फॉरेन करन्सी मार्कअप शुल्कदेखील आहे. या कार्डअंतर्गत सहा कॉम्प्लिमेंटरी इंटरनॅशनल एअरपोर्ट लॉन्जचा अॅक्सेस मिळतो. यामध्ये दोन कॉम्प्लिमेंटरी देशांतर्गत लॉन्ज आणि इतर सुविधांचा समावेश आहे. या कार्डचे वार्षिक शुल्क ४,९९९ रुपये आहे.

५. सिटी प्रिमियर माइल्स क्रेडिट कार्ड

यामध्ये १ कोटी रुपयांपर्यतचे एअर अॅक्सिडेंट विमा कव्हर मिळते. यासोबत एअरपोर्ट लॉन्जचा अॅक्सेस आणि पार्टनर रेस्टॉरंटवर २० टक्क्यांची बचतचाही समावेश आहे. तुम्ही एअरलाइनवर करणार असलेल्या प्रति १०० रुपयांच्या खर्चावर १० माइल कमावू शकता. शिवाय तुम्ही १०० हॉटेल आणि एअरलाइन्स पार्टनर्सवर हे माइल रिडीम करू शकता. विशेष म्हणजे हे माइल्स कधीही एक्सपायर होत नाहीत. याचे वार्षिक शुल्क तुम्ही अर्ज करता त्यावेळेस सांगितले जाते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी