पीएम जनधन खात्यात मिळतोय बंपर फायदा, पटकन सुरू करा खाते

PM Jan Dhan Account: प्रधानमंत्री जनधन योजनेत (PM Jan Dhan Account) कोणत्याही बॅंकेच्या शाखेत किंवा पोस्टऑफिसात खाते उघडता येते. या योजनेअंतर्गत अनेक प्रकारचे लाभ खातेधारकांना मिळतात.

PM Jan Dhan Account
पीएम जनधन खाते 

थोडं पण कामाचं

 • १.३० लाख रुपयांचा लाभ
 • कसे सुरू करायचे खाते?
 • जनधन खात्याचे फायदे

नवी दिल्ली : Pradhan Mantri Jan Dhan Yojana: प्रधानमंत्री जनधन योजना ही एक अशी योजना आहे ज्या अंतर्गत देशातील गरीब आणि दुर्बल घटकांना झीरो बॅलन्सवर बॅंक आणि पोस्ट ऑफिसमध्ये खाते सुरू करता येते. ही सरकारची महत्त्वकांक्षी योजना आहे. प्रधानमंत्री जनधन योजनेत (PM Jan Dhan Account) कोणत्याही बॅंकेच्या शाखेत (Bank account) किंवा पोस्टऑफिसात खाते उघडता येते. या योजनेअंतर्गत अनेक प्रकारचे लाभ खातेधारकांना मिळतात. या खात्यात कोणते लाभ मिळतात आणि हे खाते कसे सुरू करायचे हे जाणून घ्या (Benefits of PM Jan Dhan Account, know how to open it) 

१.३० लाख रुपयांचा लाभ

प्रधान मंत्री जनधन योजनेअंतर्गत सुरू करण्यात आलेल्या खात्यात खातेधारकाला एकूण १.३० लाख रुपयांचा लाभ मिळतो. याशिवाय यामध्ये अपघात विमादेखील मिळतो. खातेधारकाला एक लाख रुपये अपघात विमा आणि त्याशिवाय ३०,००० रुपयांचा जनरल इन्श्युरन्सदेखील मिळतो. जर एखाद्या खातेधारकाला काही नुकसान झाल्यास किंवा त्याच्याबरोबर काही वाईट घडल्यास त्याला ३०,००० रुपये मिळतात. तर जर खातेधारकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची रक्कम मिळते.

कसे सुरू करायचे खाते?

जर तुम्हाला जनधन खाते सुरू करायचे असेल तर जवळच्या बॅंकेच्या शाखेच्या जाऊन फॉर्म भरावा लागेल. त्यात तुमचे नाव, मोबाईल नंबर, बॅंकेच्या शाखेचे नाव, नॉमिनी, व्यवसाय किंवा रोजगार, वार्षिक उत्पन्न आणि खाते सुरू करणाऱ्यावर अवलंबून असणाऱ्यांची संख्या, एसएसए कोड किंवा वार्ड नंबर, पिन कोड इत्यादी माहिती भरावी लागते. भारतात राहणारा कोणताही नागरिक ज्याचे वय १० वर्षांपेक्षा अधिक आहे तो जनधन खाते सुरू करू शकतो.

ही कागदपत्रे लागतात

प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत खाते सुरू करण्यासाठी आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड, वोटर कार्ड, गॅझेटेड अधिकाऱ्याचे पत्र ज्यात खाते सुरू करणाऱ्या अटेस्टेड फोटो असेल यापैकी कोणतेही एक ओळखपत्र सादर करावे लागते.

जनधन खात्याचे फायदे -

 1. या खाते सुरू केल्यानंतर ६ महिन्यांनी ओव्हरड्राफ्टची सुविधा
 2. एक लाख रुपयांपर्यतचे अपघात विमा संरक्षण
 3. ३०,००० रुपयापर्यतचे लाइफ कव्हर
 4. डिपॉझिटवर व्याज
 5. खात्याबरोबर फ्री मोबाईल बॅंकिंग सुविधा
 6. रुपे डेबिट कार्डची सुविधा ज्याद्वारे खात्यातून पैसे काढता येतात किंवा खरेदी करता येते
 7. पीएम किसान आणि श्रमयोगी मानधन यासारख्या योजनांमध्ये पेन्शनसाठी खाते सुरू करणे सोपे होते
 8. देशभरात कुठेही पैसे ट्रान्सफर करता येतात
 9. सरकारी योजनांचे फायदे मिळत पैसे सरळ खात्यात जमा होतात

आधीच असलेले आपले बॅंक खाते जनधन खात्यात कसे रुपांतरित करावे ?

याशिवाय जर तुमचे आधीच बचत खाते असेल तर तुम्ही तुमच्या बचत खात्याला किंवा सेव्हिंग्स अकाऊंटला जनधन खात्यात बदलू शकता. यासाठी तुम्हाला आपल्या बॅंकेच्या शाखेत जावे लागेल. तिथे जाऊन रुपे कार्डसाठी (RuPay Card) अर्ज करावा लागतो. त्यासाठी आवश्यक तो फॉर्म भरून बॅंकेत जमा करा. हा फॉर्म बॅंकेकडून स्वीकारण्यात आल्यानंतर तुमचे बचत खाते जनधन खात्यात रुपांतरित होईल.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी