PM Kisan | पीएम किसान योजनेचा १०वा हफ्ता मिळणार १ जानेवारीला, ई-केवायसी बंधनकारक, पाहा केवायसी प्रोसेस

Benefits of PM Kisan | पीएम किसान योजनेचा १०वा हफ्ता १ जानेवारीला जमा होणार आहे. हा हफ्ता कधी जमा होणार याबद्दल अंदाज लढवले जात होते. पीएम किसान निधीच्या १०व्या हफ्त्याची वाढ लाखो शेतकरी पाहत आहेत. मात्र त्याचवेळी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे.

PM Kisan 10th installment on January 1 2022
पीएम किसान निधीचा १०वा हफ्ता 
थोडं पण कामाचं
 • पीएम किसान योजना २०१९ मध्ये सुरू झाली होती
 • शेतकऱ्यांना साहाय्य करण्यासाठी सुरू केली योजना
 • यात काही घटक वगळण्यातदेखील आले आहेत

PM Kisan 10th installment on January 1, 2022: नवी दिल्ली : पंतप्रधान किसान सम्मान निधी (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi) (PM-KISAN)योजनेचा १०वा हफ्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. याआधी हा हफ्ता कधी जमा होणार याबद्दल अंदाज लढवले जात होते. मात्र आता हे निश्चित झाले आहे की पीएम किसान योजनेचा १०वा हफ्ता १ जानेवारीला जमा होणार आहे. (PM-KISAN 10t installment to be disbursed on 1st January 2022, but e-KYC is mandatory)

ई-केवायसी बंधनकारक

पीएम किसान निधीच्या १०व्या हफ्त्याची वाट लाखो शेतकरी पाहत आहेत. मात्र त्याचवेळी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर म्हटले आहे की 'पीएम किसान योजनेअंतर्गत नाव नोंदवलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी ही बंधनकारक करण्यात आली आहे. आधारवर आधारित ओटीपी ऑथेंटिकेशनसाठी कृपया फार्मर कॉर्नरमधील ईकेवायसी पर्यायावर क्लिक करा. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी जवळच्या सीएससी केंद्रांमध्ये संपर्क करा.'

जर तुम्हाला पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची असेल तर पुढीलप्रमाणे स्टेप बाय स्टेप प्रक्रिया पूर्ण करा.

 1. -पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ या अधिकृत वेबसाइटवर जा.
 2. - उजव्या हाताला, होमपेजमध्ये खालील बाजूस, तुम्हाला फार्मर्स कॉर्नर दिसेल.
 3. - तिथे फार्मर्स कॉर्नरच्या अगदी खाली एक बॉक्स आहे, तिथे ई-केवायसी म्हटले आहे.
 4. -ई-केवायसीवर क्लिक करा.
 5. - त्यानंतर आधार ईकेवायीसची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक पेज ओपन होईल.
 6. -आता तुम्ही त्यात तुमचा आधार क्रमांक भरा आणि त्यानंतर कॅप्चा कोड भरा आणि त्यानंतर सर्च बटनावर क्लिक करा.
 7. - यानंतर तुम्हाला तुमच्या आधारशी लिंक केलेला मोबाइल नंबर टाकावा लागेल. त्यावर क्लिक केल्यावर तुम्हाला ओटीपी येईल.
 8. -हा ओटीपी तुमच्या नोंदणीकृत मोबाइल नंबरवर येईल.
 9. - तो ओटीपी भरा आणि ऑथेंटिकेशनसाठी सब्मिट बटणावर क्लिक करा.
 10. -तुम्ही ऑथेंटिकेशनसाठी सब्मिट बटणावर क्लिक केल्याबरोबर तुमची पीएम किसान योजनेसाठी ई-केवायसी प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण होईल.

नोंदणी झालेल्या खात्यांची पडताळणी होणार

प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा १० वा हफ्ता (PM Kisan Samman Nidhi 10th Installment) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. जवळपास १२ कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांची (Farmers) या योजनेअंतर्गत नोंदणी झाली आहे. पीएम किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi)योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या अपात्र लोकांची फेरपडताळणी राज्य सरकारांकडून सुरू झाली आहे. या योजनेचा फायदा खऱ्या शेतकऱ्याला मिळावा हा सरकारचा हेतू आहे. मात्र या योजनेअंतर्गत अपात्र लोकांनीदेखील नोंदणी केली आहे. अशा अपात्र लोकांकडून आता वसूली केली जाणार आहे. पीएम किसान सम्मान निधी योजनेसाठी पात्र नसतानाही नोंदणी करणाऱ्यांच्या ही बाब ध्यानी नाही की त्यांचे नाव, आधार आणि पॅनशी लिंक आहे. त्यामुळे सरकार त्यांच्या नावावरून त्यांच्या उत्पन्नाचे विवरण माहित करून घेते. राज्य सरकारदेखील यासंदर्भातील आकडेवारी तयार करत आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी