PM Kisan | पीएम किसान योजनेचा १०वा हफ्ता जमा झाला नसल्यास करा तक्रार, या क्रमांकावर...

PM Kisan | शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचा १० हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. पीएम किसान योजनेद्वारे देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात (Farmers Account) २० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत पोचवण्यात आली आहे. जानेवारी २०२२ ते मार्च २०२२ या कालावधीसाठीचा २,००० रुपयांचा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे.

PM Kisan 10th installment
पीएम किसानचा १०वा हफ्ता 
थोडं पण कामाचं
  • शेतकऱ्यांना मिळाला पीएम किसानचा १०वा हफ्ता
  • पंतप्रधानांनी घोषणा केल्यानंतर पीएम किसान योजनेचा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा
  • २,००० रुपयांचा दहावा हफ्ता

PM Kisan Scheme : नवी दिल्ली : पीएम किसान सम्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Scheme) शेतकऱ्यांना मिळणाऱ्या मदतीचा १० हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. या योजनेद्वारे देशातील १० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात (Farmers Account) २० हजार कोटी रुपयांची आर्थिक मदत पोचवण्यात आली आहे. जानेवारी २०२२ ते मार्च २०२२ या कालावधीसाठीचा २,००० रुपयांचा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. पहिल्या दिवशी महाराष्ट्रात (Maharashtra) ३८२८ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. (PM Kisan 10th installment released. If not received register complaint on these number)

तुमच्या खात्यात रक्कम जमा झाली की नाही ते तपासा

यात प्रत्येक जिल्हावार मदत मिळाली असून त्याची आकडेवारी वेगवेगळी आहे. राज्यात अहमदनगर जिल्ह्याला सर्वात जास्त ९८८ कोटी रुपये तर त्याखालोखाल सोलापूर जिल्ह्याला ९१२ कोटी रुपयांची मदत मिळाली आहे. यानंतर कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याचा नंबर आहे. तुम्हाला मदत मिळाली आहे की नाही हे तुम्ही PM Kisan च्या अधिकृत वेबसाईट वर https://pmkisan.gov.in तपासू शकता. या वेबसाइटवर होम पेजवर उजव्या बाजूला खाली Farmers Corner असा ऑप्शन आहे. त्यात Farmers Corner मध्ये Beneficiaries List या ऑप्शनवर जा. तिथे आपले राज्य, जिल्हा, उपजिल्हा आणि ब्लॉक निवडा. त्यानंतर लाभार्थ्यांची पूर्ण यादी समोर येईल. त्यामध्ये तुम्ही तुमचे नाव तपासू शकता.

पैसै जमा झाले नसल्यास पुढील क्रमांकावर तक्रार करा, त्याचबरोबर पीएमकिसानच्या ईमेल आयडीवर संपर्क करा.

पीएम किसान टोल फ्री नंबर : 18001155266
पीएम किसान हेल्पलाइन नंबर : 155261
पीएम किसान लैंडलाइन नंबर : 011—23381092, 23382401
पीएम किसानची नवीन हेल्पलाइन : 011-24300606
पीएम किसानची आणखी एक हेल्पलाइन  : 0120-6025109
ई-मेल आईडी: pmkisan-ict@gov.in

पंतप्रधानांनी जाहीर केला १०वा हफ्ता

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी काल (१ जानेवारी) प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme) १०व्या हफ्ता मिळण्याची घोषणा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले होते. पीएम किसान योजनेद्वारे मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात १०व्या हफ्त्यासाठीची ((PM-KISAN 10th installment)२,००० रुपयांची थेट जमा होणार आहे. पुढील काही दिवसात शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात ही रक्कम जमा झालेली असेल. केंद्र सरकार पीएम किसान सम्मान निधी योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत जमा करत असते. २,००० रुपयांच्या तीन हफ्त्यात वर्षभरात ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. 

ई-केवायसी बंधनकारक

पीएम किसान निधीच्या १०व्या हफ्त्याची वाट लाखो शेतकरी पाहत आहेत. मात्र त्याचवेळी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर म्हटले आहे की 'पीएम किसान योजनेअंतर्गत नाव नोंदवलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी ही बंधनकारक करण्यात आली आहे. आधारवर आधारित ओटीपी ऑथेंटिकेशनसाठी कृपया फार्मर कॉर्नरमधील ईकेवायसी पर्यायावर क्लिक करा. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी जवळच्या सीएससी केंद्रांमध्ये संपर्क करा.'

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी