PM Kisan Samman Nidhi : पीएम किसान योजनेच्या तेराव्या हप्त्याचे पैसे या दिवशी खात्यात जमा होणार

PM Kisan 13th Installment Release date, 13th Installment to be released : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या तेराव्या हप्त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत.

PM Kisan 13th Installment
पीएम किसान योजना  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पीएम किसान योजनेच्या तेराव्या हप्त्याचे पैसे या दिवशी खात्यात जमा होणार
  • पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील स्टेटस चेक करा...
  • शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात नियमानुसार पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार

PM Kisan 13th Installment Release date, 13th Installment to be released : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या तेराव्या हप्त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. योजनेचा तेरावा हप्ता सोमवार 27 फेब्रुवारी 2023 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण केलेल्या आधार संलग्न असलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा होतील. 

ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते अद्याप आधार संलग्न नाही त्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी आधी स्वतःचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडून घ्यावे लागेल. शेतकऱ्यांच्या आधार सीडिंग झालेल्या बँक खात्यांमध्येच नियमानुसार योजनेचे पैसे जमा होतील. 

शेतकऱ्यांना त्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जोडायचे असल्यास आधार सीडिंग ई-केवायसी (eKYC PMKisan) करून घ्यावे लागेल. बँकेत बँकेच्या तर पोस्टात पोस्टाच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने आधार सीडिंग ई-केवायसी करून घेता येईल. 

नियमानुसार प्रक्रिया योग्य प्रकारे पूर्ण केल्यास 48 तासांच्या आत संबंधित खाते आधारशी जोडले जाईल. सर्व प्रयत्न करुनही ई-केवायसी होत नसेल तरच पीएम किसान योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी त्यांचे नवे खाते इंडियन पोस्ट पेमेंट बँक अर्थात आयपीपीबीमध्ये सुरू करावे. 

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारची शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली योजना आहे. यात देशातील सर्व भूमीधारक शेतकऱ्यांना कृषी आणि संबंधित कामासाठी  तसेच घरगुती आर्थिक गरजा पूर्ण करण्यासाठी केंद्राकडून सन्मान निधी दिला जातो. शेतकऱ्यांन सन्मानाने जगता यावे यासाठी ही योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेची पूर्ण जबाबदारी केंद्र सरकारने स्वतःकडे ठेवली आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील स्टेटस चेक करा...

  1. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील स्वतःचे स्टेटस चेक करण्यासाठी शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. आधार सीडिंग ई-केवायसी पूर्ण केलेले नाही 
  2. होमपेजवरील Farmers Corner मधील Beneficiary Status पर्यायावर क्लिक करावे. 
  3. नोंदणीकृत आधार क्रमांक किंवा बँक खाते क्रमांक टाकावा. यानंतर 'डेटा मिळवा' वर क्लिक करा.
  4. हप्त्याची स्थिती कळेल. 

ज्या शेतकऱ्यांनी अद्याप आधार सीडिंग ई-केवायसी केलेले नाही त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडलेले नाही. यामुळे संबंधितांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभ मिळणार नाहीत. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचे लाभ मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्याचे आधार सीडिंग ई-केवायसी करणे अत्यावश्यक आहे. आधार सीडिंग ई-केवायसी हे ओटीपी अथवा बायोमेट्रिक पद्धतीने होऊ शकते. यासाठीची सविस्तर माहिती pmkisan.gov.in या वेबसाईटवर मिळेल.

ओटीपी आधारित ई-केवायसी https://exlink.pmkisan.gov.in/aadharekyc.aspx वर उपलब्ध आहे. बायोमेट्रिक ई-केवायसी करण्यासाठी जवळच्या CSC केंद्रांशी संपर्क साधता येईल. यासंदर्भातील अधिक माहिती https://digitalseva.csc.gov.in/ वर उपलब्ध आहे.

Intelligence Bureau Recruitment 2023 : दहावी पास झालेल्यांना इंटेलिजन्स ब्युरोत नोकरीची संधी

Bank of Maharashtra Recruitment 2023:  बँकेत नोकरीची सुवर्ण संधी, आजच अर्ज करा, पगार 78,000 रुपये महिना 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी