PM Kisan Samman Yojana: मोठी बातमी! या लोकांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळणार नाही

काम-धंदा
Updated Apr 13, 2022 | 11:29 IST | टाइम्स नाऊ मराठी

PM Kisan Scheme । जर तुम्हीही पीएम किसान योजनेत नोंदणी केली असेल आणि ११ व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी खूप अतिशय महत्त्वाची आहे. लक्षणीय बाब म्हणजे अनेक अपात्र लोक या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत.

PM Kisan Samman Yojana All these people will not get the benefit of PM Kisan Yojana
या लोकांना पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळणार नाही  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • जे लोक आयकर भरतात त्यांना पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळत नाही.
  • योजनेअंतर्गत ११.३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १.८२ लाख कोटी रूपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत.
  • या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रूपयांची आर्थिक मदत देते.

PM Kisan Scheme । नवी दिल्ली : जर तुम्हीही पीएम किसान योजनेत (pm kisan yojana) नोंदणी केली असेल आणि ११ व्या हप्त्याची वाट पाहत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आहे. लक्षणीय बाब म्हणजे अनेक अपात्र लोक या सरकारी योजनेचा लाभ घेत आहेत. चला तर म जाणून घेऊया कोणत्या लोकांना या सरकारी योजनेचा लाभ मिळणार नाही. (PM Kisan Samman Yojana All these people will not get the benefit of PM Kisan Yojana). 

या लोकांना नाही मिळणार फायदा 

दरम्यान, जे लोक आयकर भरतात त्यांना पीएम किसान सन्मान निधीचा लाभ मिळत नाही. याशिवाय डॉक्टर, चार्टर्ड अकाउंटंट, वकील, इंजिनियर, आर्किटेस्ट अशा व्यावसायिकांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. तसेच जे लोक पदापासून दूर झालेले आहेत ते देखील या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही. 

अधिक वाचा : बलात्कार पिडीतेशी न्यायाधीशांची 'गंदी बात'

११.३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा

पीएम किसान सन्मान योजनेअंतर्गत ११.३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात १.८२ लाख कोटी रूपये ट्रान्सफर करण्यात आले आहेत. कोरोना महासाथीच्या काळात शेतकऱ्यांच्या खात्यावर १.३० लाख कोटी रूपये जमा करण्यात आले आहेत. 

कोणत्या लोकांना मिळणार लाभ? 

या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित व्यक्तीचे वय १४ ते ४० वर्ष असणे गरजेचे आहे. याशिवाय तुमच्याकडे २ हेक्टर लागवडीयोग्य जमीन असणे देखील आवश्यक आहे, ज्या शेतकऱ्यांकडे लागवडीयोग्य जमीन नाही ते या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. 

६००० रूपयांचा लाभ मिळणार 

या योजनेअंतर्गत केंद्र सरकार शेतकऱ्यांना वार्षिक ६००० रूपयांची आर्थिक मदत देते. सरकार हे पैसे तीन हप्त्यांमध्ये देते. म्हणजेच तुम्हाला ४ महिन्यांच्या फरकाने २००० रूपये मिळतात. हे पैसे थेट तुमच्या बॅंक खात्यात ट्रान्सफर केले जातात. 

१ जानेवारीला १० वा हप्ता ट्रान्सफर करण्यात आला 

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १० व्या हप्त्याचे पैसे १ जानेवारी २०२२ रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात ट्रान्सफर करण्यात आले. देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यावर २००० रुपयांचा हप्ता वर्ग करण्यात आला.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी