PM Kisan Samman Yojana | दहाव्या हफ्त्यात मिळतील आणखी तीन सुविधा, पटापट चेक करा काय मिळणार ?

PM Kisan Samman Scheme 10th Installment: जे शेतकरी पीएम किसान सम्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हफ्त्याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी खूशखबर आहे. त्यांच्या खात्यात १५ डिसेंबरच्या आसपास ही रक्कम जमा होणार आहे. शिवाय प्रसार माध्यमांमधून आलेल्या माहितीनुसार यात शेतकऱ्यांना आणखी तीन सुविधादेखील दिल्या जाणार आहेत. ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान योजनेचा लाभ मिळतो आहे त्यांना पीएम किसान मानधन योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही.

PM Kisan Samman Scheme 10th Installment
पीएम किसान सम्मान योजनेचा १० वा हफ्ता 
थोडं पण कामाचं
  • पीएम किसान सम्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १० वा हफ्ता लवकरच जमा होणार
  • प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रकमेवर दुप्पट करण्याचा केंद्र सरकारचा विचार
  • किसान क्रेडिट कार्डला पीएम किसान सम्मान योजनेशी जोडण्यात आले आहे

PM Kisan Samman Scheme 10th Installment | नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Yojana) मिळणाऱ्या रकमेवर दुप्पट करण्याचा विचार केंद्र सरकार (Central Government)करते आहे. जर सरकारने ही रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात आता २,००० रुपयांऐवजी ४,००० रुपये जमा होणार आहेत. मात्र सरकार यासोबतच आणखी तीन सुविधा देण्यासंदर्भातदेखील विचार करते आहे. पीएम किसान सम्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १० वा हफ्ता (PM Kisan Samman Scheme 10th Installment)लवकरच जमा होणार आहे. जे शेतकरी पीएम किसान सम्मान योजनेअंतर्गत मिळणाऱ्या हफ्त्याची वाट पाहत आहेत त्यांच्यासाठी खूशखबर आहे. त्यांच्या खात्यात १५ डिसेंबरच्या आसपास ही रक्कम जमा होणार आहे. शिवाय प्रसार माध्यमांमधून आलेल्या माहितीनुसार यात शेतकऱ्यांना आणखी तीन सुविधादेखील दिल्या जाणार आहेत. (PM Kisan Samman Yojana : Very soon 10th Installment will credited along with 3 more benefits)

किसान क्रेडिट कार्ड आणि पीएम किसान सम्मान योजना एकत्र

आता किसान क्रेडिट कार्डला (Kisan Credit card) पीएम किसान सम्मान योजनेशी जोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड बनवण्यात कोणतीही अडचण येऊ नये यासाठी असे करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान योजनेचा लाभ मिळतो आहे त्यांना याचा लाभ मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही. सध्या देशभरातून ७ कोटी शेतकऱ्यांकडे किसान क्रेडिट कार्ड आहे. जर सरकार लवकरच एक कोटी आणखी शेतकऱ्यांना याचा लाभ देणार आहे. या कार्डावर शेतकऱ्यांना तीन ते चार लाख रुपयांपर्यतचे कर्ज उपलब्ध करून दिले जाते.

पीएम किसान मानधन योजना

ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान योजनेचा लाभ मिळतो आहे त्यांना पीएम किसान मानधन योजनेचा (PM Mandhan Yojana) लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता नाही. कारण सरकारकडे या शेतकऱ्यांची सर्व माहिती आहे. यासाठी शेतकऱ्यांना कोणताही अतिरिक्त खर्च देखील करावा लागणार नाही. कारण जे पैसे पीएम किसान सम्मान योजनेद्वारे मिळत आहेत ते सरळ योजनेकडे ट्रान्सफर केले जाणार आहेत.

किसान आय कार्ड बनवण्याची योजना

पीएम किसान सम्मान योजनेअंतर्गत उपलब्ध झालेल्या आकडेवारीच्या आधारावर सरकार शेतकऱ्यांसाठी एक विशेष प्रकारचे आय कार्ड किंवा आयडी बनवू इच्छिते. हे आय कार्ड केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीच्या आधारावर निश्चित केले जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना कृषीशी निगडीत सुविधा पोचवणे अधिक सोपे होणार आहे. शिवाय शेतकरी या योजनांचा कुठपर्यत लाभ घेत आहेत हेदेखील सरकारला समजून घेता येणार आहे. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासंदर्भात केंद्र सरकारकडून विविध पावले उचलण्यात येत आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे आणि त्यांच्यासमोरील आर्थिक अडचणी दूर व्हाव्यात यासाठी सरकारने विविध योजना सुरू केल्या आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी