PM KISAN Scheme मधील लाभार्थ्यांचे स्टेटस कसे पाहाल, नवीन नोंदणी आणि आवश्यक कागदपत्रे, जाणून घ्या

PM Kisan 10th Installment Date 2021: प्रधानमंत्री किसान सम्मान योजना ही केंद्र सरकारकडून मध्यम आणि छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी चालवण्यात आलेली योजना आहे. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना लागू झाली आहे. या योजनेनुसार लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. हे पैसे शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात जमा होतात. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या मदतीने शेतकऱ्यांची पडताळणी केली जाते.

PM Kisan Samman Scheme
प्रधानमंत्री किसान सम्मान योजना 
थोडं पण कामाचं
 • प्रधानमंत्री किसान सम्मान निधीद्वारे शेतकऱ्यांना तीन हफ्त्यात आर्थिक लाभ
 • योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड बॅंक खात्याशी लिंक होणे आवश्यक
 • यावर्षीचा तिसरा हफ्ता १५ डिसेंबर २०२१ पर्यत जमा केला जाणार

PM KISAN Scheme | नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सम्मान निधीद्वारे (PM KISAN Scheme )शेतकऱ्यांना तीन हफ्त्यात आर्थिक लाभ दिला जातो. एप्रिल ते जूनमध्ये पहिला हफ्ता, ऑगस्ट ते नोव्हेंबरमध्ये दुसरा हफ्ता आणि डिसेंबर ते मार्च दरम्यान तिसरा हफ्ता शेतकऱ्यांच्या (Farmers)खात्यात जमा केला जातो. सूत्रांकडून समोर आलेल्या माहितीनुसार यावर्षीचा तिसरा हफ्ता (PM Kisan Samman Scheme 10th Installment) १५ डिसेंबर २०२१ पर्यत जमा केला जाणार आहे. प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्याच्या खात्यात ६००० रुपयांची रक्कम सरकारकडून जमा केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांचे आधार कार्ड बॅंक खात्याशी (Aadhar linking to bank account)लिंक होणे आवश्यक असते. पीएम किसान सम्मान योजनेत नवीन नोंदणी कशी करायची (PM Kisan Samman new regestraion), पीएम किसान योजनेसाठी कोणते कागदपत्रे (PM Kisan Samman yojana documents लागतात, ते पाहूया. (PM KISAN Scheme : How to check beneficiary status, new registration & required documents) 

काय आहे प्रधानंत्री किसान सम्मान योजना

प्रधानमंत्री किसान सम्मान योजना ही केंद्र सरकारकडून मध्यम आणि छोट्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यासाठी चालवण्यात आलेली योजना आहे. १ डिसेंबर २०१८ पासून ही योजना लागू झाली आहे. या योजनेनुसार लाभार्थी शेतकऱ्यांना दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत केली जाते. हे पैसे शेतकऱ्याच्या बॅंक खात्यात जमा होतात. राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेश यांच्या मदतीने शेतकऱ्यांची पडताळणी केली जाते.

प्रधानमंत्री किसान सम्मान योजनेअंतर्गत (PM Kisan Samman Yojana) मिळणाऱ्या रकमेवर दुप्पट करण्याचा विचार केंद्र सरकार (Central Government)करते आहे. जर सरकारने ही रक्कम दुप्पट करण्याचा निर्णय घेतला तर शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात आता २,००० रुपयांऐवजी ४,००० रुपये जमा होणार आहेत. मात्र सरकार यासोबतच आणखी तीन सुविधा देण्यासंदर्भातदेखील विचार करते आहे. 

प्रधानंत्री किसान योजनेचे पेमेंट कसे चेक करायचे?

 1. पेमेंट चेक करण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर म्हणजे https://pmkisan.gov.in/ वर जा.
 2. वेबसाईटवर सर्वात वर ‘Farmers Corner’चा पर्याय आहे, त्या पर्यायावर दिलेली लिंक सेलेक्ट करा.
 3. यानंतर beneficiary status option ची निवड करा. तिथे तुम्हाला तुमचे स्टेटस चेक करता येईल. स्टेटसवर शेतकऱ्यांच्या नावाची यादी असेल आणि त्यांच्या बॅंक खात्यात किती पैसे जमा झाले तेदेखील पाहता येईल.
 4. त्यानंतर तिथे तुम्हाला आधार नंबर किंवा खातेक्रमांक किंवा मोबाइल नंबर टाकावा लागेल.
 5. शेवटी ‘Get Data’वर क्लिक करा.

पीएम किसान योजनेचे स्टेटस कसे चेक करायचे?

 1. सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर https://pmkisan.gov.in/ जा.
 2. सर्वात वर ‘Farmers Corner’ पर्याय आहे, त्यावर क्लिक करा.
 3. beneficiary status पर्याय निवडा. स्टेटसवर शेतकऱ्यांचे नाव आणि त्यांना मिळालेले पैसे याची यादी असेल.
 4. आता आधार क्रमांक, खातेक्रमांक किंवा मोबाइल नंबर टाका. या तिघांपैकी एकाच्या मदतीने तुम्ही पीएम किसान योजनेतील आर्थिक लाभाचे स्टेटस चेक करू शकाल.

पीएम किसान निधीमध्ये नाव कसे चेक करायचे?

वर दिलेल्या वेबसाईटवर जाऊन ‘Farmers Corner’ पर्यायावर जाऊन तुम्ही तुमचे नाव तपासू शकता. त्याचबरोबर तुमच्या आधार नंबरमध्ये काही चूक असल्यास तो एडिटदेखील करू शकता. 
पीएम किसान योनजेमध्ये डॉक्टर्स, इंजिनियर्स आणि रिटायर्ड पेन्शनर्स ज्यांचे मासिक उत्पन्न १०,००० रुपयांपेक्षा जास्त आहे अशांना लाभ मिळत नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी