Bank Deposit Programme | एक लाखांपेक्षा जास्त लोकांना झाला १,३०० कोटींचा फायदा, अडचणींवर काढला मार्ग : पंतप्रधान मोदी

PM Narendra Modi on Bank Deposit Programme: बॅंकेतील मुदतठेवींवर (Bank deposit) पाच लाख रुपयांपर्यतच्या रकमेवर निश्चित मुदतीत विमा संरक्षण (Insurance) या विषयावरील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. पंतप्रधान म्हणाले की आज देशातील बॅंकिंग क्षेत्रासाठी (Banking sector) आणि देशातील कोट्यवधी बॅंक खातेधारकांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. अनेक दशकांपासून असलेल्या एका मोठ्या समस्येवर उत्तर शोधण्यात आले आहे आणि आज तो ऐतिहासिक दिवस आहे.

Multibagger Stock
बॅंकेतील मुदतठेवींवर मिळणार विमा संरक्षण 
थोडं पण कामाचं
  • बॅंक ठेवीदारांच्या सुरक्षेसाठीच्या विमा योजनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केले मत
  • देशातील बॅंकिंग अधिक सुरक्षित केल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन
  • आजचा भारत समस्यांकडे पाठ न फिरवता मार्ग काढत असल्याचा व्यक्त केला विश्वास

Bank Deposit Programme: नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) बॅंकांमधील मुदतठेवी (Bank Fixed deposit)आणि त्याची सुरक्षितता यावर आपले मत व्यक्त केले. बॅंकेतील मुदतठेवींवर (Bank deposit) पाच लाख रुपयांपर्यतच्या रकमेवर निश्चित मुदतीत विमा संरक्षण (Insurance) या विषयावरील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी बोलत होते. पंतप्रधान म्हणाले की आज देशातील बॅंकिंग क्षेत्रासाठी (Banking sector) आणि देशातील कोट्यवधी बॅंक खातेधारकांसाठी महत्त्वाचा दिवस आहे. अनेक दशकांपासून असलेल्या एका मोठ्या समस्येवर उत्तर शोधण्यात आले आहे आणि आज तो ऐतिहासिक दिवस आहे. (PM Modi addressed Depositor first Programme, said more than 1 lakh people benefitted)

नवा भारत समस्या टाळत नाही

पंतप्रधान मोदी म्हणाले की मागील काही दिवसात १ लाखांपेक्षा जास्त ठेवीदारांचा अडकलेला पैसा त्यांच्या खात्यात जमा झाला आहे. ही रक्कम जवळपास १,३०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. आज या कार्यक्रमात आणि यानंतरदेखील ३ लाख अशा आणखी ठेवीदारांचा पैसा त्यांच्या खात्यात जमा होणार आहे. कोणत्याही देशात समस्यांवर उत्तर शोधून त्या वाढण्यापासून रोखता येते. मात्र अनेक वर्षे आमच्याकडे ही प्रवृत्ती होती की समस्या असेल तर टाळा. मात्र आजचा भारत समस्यांवर उत्तर शोधण्यसाठी प्रयत्नशील असतो. तो समस्या टाळत नाहीत किंवा त्याकडे दुर्लक्ष करत नाही.

सरकारने संवेदनशीलपणे केल्या सुधारणा

पीएम मोदी पुढे म्हणाले की आधी लोकांना बॅंकेत अडकलेले पैसे मिळवण्यासाठी अनेक वर्षे लागायची. आपल्या देशातील मध्यम वर्ग, कनिष्ठ मध्यम वर्ग आणि गरीबांनी या समस्येला तोंड दिले आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी आमच्या सरकारने खूप संवेदनशीलपणे बदल केले आहे आणि सुधारणा केल्या आहेत. आपल्या देशात बॅंक ठेवीदारांसाठीच्या विमा संरक्षणाची व्यवस्था ६०च्या दशकात बनवण्यात आली. आधी बॅंकेत जमा केलेल्या फक्त ५०,००० रुपयांच्या रकमेवरच गॅरंटी होती. मात्र याला वाढवून १ लाख रुपये करण्यात आले होते. आम्ही ही रक्कम वाढवून ५ लाख रुपये केली आहे.

बॅंकेवर संकट आल्यावर ठेवीदारांना नक्की मिळणार ५ लाख रुपये

ठेवीदारांना मिळणाऱ्या पैशांसंदर्भात मोदी म्हणाले की आज कोणत्याही बॅंकेवर जर संकट आले तर त्या बॅंकेतील ठेवीदारांना ५ लाख रुपयांपर्यतची रक्कम निश्चित मिळणार आहे. यामुळे ९८ टक्के लोकांची बॅंक खाती पूर्णपणे कव्हर झाली आहेत. आज ठेवीदारांचे जवळपास ७६ लाख कोटी रुपये पूर्णपणे सुरक्षित आहेत. इतके व्यापक सुरक्षा कवच विकसित देशांमध्ये देखील नाही. कायद्यामध्ये सुधारणा करून आणखी एका प्रश्नावर उत्तर शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आधी पैसे परत मिळण्यासंदर्भात कोणतीही कालमर्यादा नव्हती. मात्र आता आमच्या सरकारने ९० दिवस म्हणजे ३ महिन्यांच्या आत ठेवीदारांना रक्कम परत करणे बंधनकारक केले आहे. बॅंक बुडाल्याच्या स्थितीत ९० दिवसांच्या आत ठेवीदारांना किंवा खातेधारकांना त्यांचे पैसे परत मिळणार आहेत.

पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की आम्हाला जर बॅंका वाचवायच्या असतील तर ठेवीदारांना सुरक्षा द्यावी लागेल. आम्ही हे काम करून बॅंकांनादेखील वाचवले आहे आणि ठेवीदारांनादेखील वाचवले आहे. बॅंका या अर्थव्यवस्थेसाठी विश्वासाचे प्रतिक आहेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी