PM Modi Wealth : पंतप्रधान मोदींकडे आहे इतक्या कोटींची संपत्ती, स्वतःचे वाहन नाही, दान केली जमीन

Narendra Modi : राजकारणातील उच्चपदस्थांची संपत्ती हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यातही जर ती व्यक्ती मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानपदी असेल तर सर्वांचेच लक्ष असते. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांच्या मालमत्तेची चर्चा होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 2.23 कोटी रुपयांची मालमत्ता (PM Modi assets) आहे. यातील संपत्ती मुख्यतः बँक ठेवी आणि बचत म्हणून आहे. परंतु आता त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही कारण त्यांनी गांधीनगरमधील जमिनीचा एक तुकडा दान केला आहे.

PM Modi Assets
पंतप्रधान नरेंद्र मोदींची संपत्ती 
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान मोदींसह अनेक केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केली संपत्ती
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 2.23 कोटी रुपयांची मालमत्ता, यातील मुख्यत:बॅंक ठेवी, विमा योजनांमध्ये
  • ंतप्रधान नरेंद्र मोदींची कोणत्याही बाँड्स, म्युच्युअल फंडांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक नाही. स्वतःचे कोणतेही वाहन नाही.

PM Modi Assets : नवी दिल्ली : राजकारणातील उच्चपदस्थांची संपत्ती हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्यातही जर ती व्यक्ती मुख्यमंत्री किंवा पंतप्रधानपदी असेल तर सर्वांचेच लक्ष असते. आता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या मालमत्तेची चर्चा होते आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे 2.23 कोटी रुपयांची मालमत्ता (PM Modi assets) आहे. यातील संपत्ती मुख्यतः बँक ठेवी आणि बचत म्हणून आहे. परंतु आता त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही कारण त्यांनी गांधीनगरमधील जमिनीचा एक तुकडा दान केला आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) यासंदर्भातील माहिती दिली आहे. "स्थावर मालमत्ता सर्वेक्षण क्रमांक 401/A इतर तीन संयुक्त मालकांसोबत संयुक्तपणे मालकीची होती आणि यात प्रत्येकाचा 25 टक्के समान वाटा होता. आता ही जमीन दान करण्यात आली आहे," असे पंतप्रधान कार्यालयाच्या वेबसाईटवरील जाहीरनाम्यात म्हटले आहे. (PM Modi have assets of Rs 2.23 crore, donated his land as per PMO declaration)

अधिक वाचा : Sharad Pawar: भाजप मित्रपक्षांना हळूहळू संपवतो, नितीश कुमारांनी टाकलेलं पाऊल अत्यंत शहाणपणाचं: शरद पवार

नरेंद्र मोदींची गुंतवणूक राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात

नरेंद्र मोदींनी गुजरातचे मुख्यमंत्री असताना ऑक्टोबर 2002 मध्ये विकत घेतलेला एक निवासी भूखंड भागीदारीमध्ये इतर तीन जणांकडे होता. या भूखंडात प्रत्येकाचा समान वाटा होता. 31 मार्च 2022 पर्यंतच्या घोषणेनुसार, पंतप्रधानांकडे 35,250 रुपये रोख, पोस्ट ऑफिसमध्ये राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रात 9,05,105 रुपये आणि आयुर्विमा पॉलिसींमध्ये 1,89,305 रुपये होते.

अधिक वाचा : Raksha Bandhan 2022: रक्षाबंधनाला लक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद अन् लाभेल उत्तम आरोग्य, राखी बांधण्यापूर्वी करावे लागेल हे काम

पंतप्रधान मोदींची संपत्ती 2.23 कोटी रुपये

पंतप्रधान मोदींची जंगम मालमत्ता मार्च 2021 अखेर 1,97,68,885 रुपयांवरून 26.13 लाख रुपयांनी वाढून मार्च 2022 अखेरीस 2,23,82,504 रुपयांवर पोहोचली. पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोणत्याही बाँड्स, म्युच्युअल फंडांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक नाही. स्वतःचे कोणतेही वाहन नाही. दागिन्यांबद्दल म्हणाल तर पीएमओच्या घोषणेनुसार, पीएम मोदींकडे 1.73 लाख रुपयांच्या चार सोन्याच्या अंगठ्या आहेत.

अधिक वाचा : भले शाबास! माय-लेकानं सोबत उत्तीर्ण केली लोकसेवा आयोगाची परीक्षा, सोबतच लागणार नोकरीला, आई होती अंगणवाडी शिक्षिका

या केंद्रीय मंत्र्यांनी जाहीर केली संपत्ती

सर्व 29 कॅबिनेट मंत्र्यांपैकी, धर्मेंद्र प्रधान, ज्योतिरादित्य सिंधिया, आर के सिंग, हरदीप सिंग पुरी, परशोत्तम रुपाला आणि जी किशन रेड्डी यांनी गेल्या आर्थिक वर्षासाठी त्यांची स्वतःची मालमत्ता तसेच त्यांचे अवलंबित्व घोषित केले आहे. मुख्तार अब्बास नक्वी, जे गेल्या आर्थिक वर्षात कॅबिनेट मंत्री होते आणि त्यांनी जुलैमध्ये पद सोडले होते. त्यांनीही आपली मालमत्ता जाहीर केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संपत्ती मुख्यतः बँक ठेवी आणि बचत यांच्या स्वरुपात आहे. त्याचबरोबर आता त्यांच्याकडे कोणतीही स्थावर मालमत्ता नाही. पंतप्रधान मोदींकडे गांधीनगरमध्ये एक भूखंड होता. मात्र आता तो जमिनीचा एक तुकडा दान मोदींनी केला आहे. पंतप्रधान कार्यालयाने (PMO) यासंदर्भातील माहिती दिली आहे. "स्थावर मालमत्ता सर्वेक्षण क्रमांक 401/A इतर तीन संयुक्त मालकांसोबत संयुक्तपणे मालकीची होती आणि यात प्रत्येकाचा 25 टक्के समान वाटा होता. अर्थात आता ही जमीन दान करण्यात आली असल्याने पंतप्रधान मोदींच्या मालकीची आता कोणतीही जमीन नाही.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी