PM Modi Launches RBI Schemes | रिझर्व्ह बॅंकेच्या दोन महत्त्वाच्या योजना पंतप्रधान मोदींच्या हस्ते लॉंच

PM Modi Launches RBI Schemes: आरबीआय रिटेल डायरेक्ट योजनेअंतर्गत सर्वसामान्य किंवा रिटेल गुंतवणुकदार सरकारी कर्जरोखे किंवा बॉंड्समध्ये पैसा गुंतवू शकणार आहेत. या योजनेमुळे गुंतवणुकदारांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे आणलेल्या सिक्युरिटिजमध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. रिझर्व्ह बॅंक इंटिग्रेटेड ओंबड्समन स्कीमचा हेतू आरबीआयद्वारे नियमित करण्यात आलेल्या संस्थाविरुद्ध ग्राहकांना तक्रार करण्याची योग्य व्यवस्था उपलब्ध करून देणे हा आहे.

PM Modi Launches RBI Schemes
आरबीआयच्या दोन नव्या योजनांचे पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून रिझर्व्ह बॅंकेच्या दोन योजनांचे उद्घाटन
  • आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम ही गुंतवणुकीसाठीची योजना
  • रिझर्व्ह बॅंक इंटिग्रेटेड ओंबड्समन स्कीम ही तक्रारदारांना सुविधा उपलब्ध करून देणारी योजना

RBI New Schemes | नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi)यांनी आज रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाच्या (RBI)दोन नव्या योजना लॉंच केल्या. या दोन योजना म्हणजे आरबीआय रिटेल डायरेक्ट स्कीम (RBI's retail direct scheme)आणि रिझर्व्ह बॅंक इंटिग्रेटेड ओंबड्समन स्कीम (Reserve bank integrated ombudsman scheme). या योजनांद्वारे सर्वसाधारण गुंतवणुकदाराला गुंतवणुकीचे सुरक्षित आणि सुलभ पर्याय उपलब्ध होणार आहेत. (PM Modi Launches RBI Schemes: PM Modi launched two RBI schemes)

काय आहेत आरबीआयच्या या दोन योजना

आरबीआय रिटेल डायरेक्ट योजनेअंतर्गत सर्वसामान्य किंवा रिटेल गुंतवणुकदार सरकारी कर्जरोखे किंवा बॉंड्समध्ये पैसा गुंतवू शकणार आहेत. या योजनेमुळे गुंतवणुकदारांना केंद्र सरकार आणि राज्य सरकारद्वारे आणलेल्या सिक्युरिटिजमध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. या योजनेअंतर्गत गुंतवणुकदार सरकारी सिक्युरिटिज खाते ऑनलाइन मोफत स्वरुपात सुरू करू शकतात. तर रिझर्व्ह बॅंक इंटिग्रेटेड ओंबड्समन स्कीमचा हेतू आरबीआयद्वारे नियमित करण्यात आलेल्या संस्थाविरुद्ध ग्राहकांना तक्रार करण्याची योग्य व्यवस्था उपलब्ध करून देणे हा आहे. ही स्कीम वन नेशन-वन ओंबड्समन धोरणावर आधारित आहे. यामध्ये ग्राहकांना तक्रार करण्यासाटी एक पोर्टल, एक ईमेल आणि एक पत्ता याची सुविधा देण्यात आली आहे. इथे ग्राहकांना आपल्या तक्रारी दाखल करण्यासाठी, कागदपत्रे सबमिट करण्याची आणि फीडबॅक देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तक्रारदाराच्या शंकाचे निरसन करण्यासाठी आणि तक्रार नोंदवण्यासाठी अनेक भाषांमध्ये एक टोल फ्री नंबरदेखील उपलब्ध करून दिला जाणार आहे.

योजनांमुळे गुंतवणुकीचा परीघ विस्तारेल 

आरबीआयच्या योजना लॉंच करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की या कोरोना महामारीच्या काळात रिझर्व्ह बॅंकेने खूपच कौतुकास्पद काम केले आहे. सध्याचा काळ देशाच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे. यामध्ये आरबीआयची भूमिका महत्त्वाची आहे. मला पूर्ण खात्री आहे की आरबीआय या कसोटीवर यशस्वी ठरेल. आरबीआय सर्वसामान्य लोकांना सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, त्यांना डोळ्यासमोर ठेवत सातत्याने पावले उचलते आहे. पंतप्रधान मोदी पुढे म्हणाले की या योजनांमुळे गुंतवणुकीचा परीघ विस्तारणार आहे. कॅपिलट मार्केटमध्ये गुंतवणूक करणे अधिक सुरक्षित आणि सोपे होणार आहे. यामुळे सरकारी सिक्युरिटिजमध्ये गुंतवणूक करणे सोपे आणि सुरक्षित होणार आहे.

मध्यमवर्ग, ज्येष्ठ नागरिक, छोट्या गुंतवणकदारांसाठी उत्तम पर्याय

पंतप्रधान मोदी आपले मत व्यक्त करताना पुढे म्हणाले की छोट्यातील छोटी गुंतवणूक सध्याच्या काळात खूप उपयुक्त ठरणार आहे. आतापर्यत सरकारी सिक्युरिटिज मार्केटमध्ये मध्यम वर्ग, ज्येष्ठ नागरिक, छोटी बचत करणारे गुंतवणुकदार यांनी म्युच्युअल फंडांसारखे पर्याय निवडावे लागत होते. आता त्यांना गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय मिळाला आहे. यामुळे छोट्या गुंतवणुकदारांना निर्धास्तपणे गुंतवणूक करता येणार आहे. शिवाय यातून चांगला परतावादेखील मिळणार आहे. आर्थिक समावेशकतेसाठी तळातील शेवटच्या माणसाचाही सहभाग आवश्यक आहे. ऑनलाइन खाते सुरू करता येणार आहे, त्यामुळे नोकरदारांना घरबसल्या सुरक्षितरित्या गुंतवणूक करता येणार आहे. हे खाते गुंतवणुकदाराच्या बचत खात्याशी लिंक असणार आहे. बॅंकिंग व्यवस्थेत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत त्यामुळे बॅंकिंग व्यवस्थेत चैतन्य परत आले आहे. तक्रारदारांना सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दिशेने हे एक पाऊल आहे. आता तक्रारदार सहजरित्या तक्रार दाखल करू शकणार आहेत. थकित कर्जामध्ये पारदर्शकता आणत सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचे पुनर्भांडवलीकरण करण्यात आले आहे. वित्तीय व्यवस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांमध्ये अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी