PM-KISAN 10th installment | नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज (१ जानेवारी) प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजनेच्या (Pradhan Mantri Kisan Samman Nidhi scheme) १०व्या हफ्ता मिळण्याची घोषणा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे केले आहे. पीएम किसान योजनेद्वारे मिळणाऱ्या आर्थिक लाभासाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात १०व्या हफ्त्यासाठीची ((PM-KISAN 10th installment)२,००० रुपयांची थेट जमा होणार आहे. पुढील काही दिवसात शेतकऱ्यांच्या (Farmers) खात्यात ही रक्कम जमा झालेली असेल. केंद्र सरकार पीएम किसान सम्मान निधी योजनेद्वारे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ६,००० रुपयांची आर्थिक मदत जमा करत असते. २,००० रुपयांच्या तीन हफ्त्यात वर्षभरात ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते. (PM Narendra Modi, releases 10th PM-KISAN installment via video conferencing today)
शेतकऱ्यांना वर्षभरात एकूण ६,००० रुपयांची आर्थिक मदत या योजनेद्वारे केंद्र सरकारकडून थेट केली जाते. प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीचा पहिला हफ्ता एप्रिल ते जुलै या महिन्यांदरम्यान दिला जातो. तर दुसरा हफ्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान दिला जातो आणि योजनेचा तिसरा हफ्ता डिसेंबर ते मार्च या कालावधीत दिला जातो. पीएम किसान योजनेसाठीचा सर्व निधी केंद्र सरकारकडून दिला जातो. गरीब आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांना या आर्थिक मदत करण्याचे उद्दिष्ट या योजनेद्वारे राबवले जाते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये ही योजना सुरू केली होती.
सध्या प्रधान मंत्री किसान सम्मान निधी योजनेसाठी ११ कोटी शेतकरी पात्र असून त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो. पीएम किसान योजनेच्या १०व्या हफ्त्याच्या २,००० रुपयांच्या आर्थिक मदतीची वाट देशभरातील शेतकऱ्यांना आहे. १०व्या हफ्त्याआधी केंद्र सरकारने नोंदणीकृत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात आतापर्यत १.५८ लाख कोटी रुपये जमा केले आहेत.
पीएम किसान निधीच्या १०व्या हफ्त्याची वाट लाखो शेतकरी पाहत आहेत. मात्र त्याचवेळी पीएम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाइटवर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सूचना देण्यात आली आहे. पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर म्हटले आहे की 'पीएम किसान योजनेअंतर्गत नाव नोंदवलेल्या शेतकऱ्यांसाठी ई-केवायसी ही बंधनकारक करण्यात आली आहे. आधारवर आधारित ओटीपी ऑथेंटिकेशनसाठी कृपया फार्मर कॉर्नरमधील ईकेवायसी पर्यायावर क्लिक करा. बायोमेट्रिक ऑथेंटिकेशनसाठी जवळच्या सीएससी केंद्रांमध्ये संपर्क करा.'
प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचा १० वा हफ्ता (PM Kisan Samman Nidhi 10th Installment) शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी आता काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. जवळपास १२ कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांची (Farmers) या योजनेअंतर्गत नोंदणी झाली आहे. पीएम किसान सम्मान निधी (PM Kisan Samman Nidhi)योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या अपात्र लोकांची फेरपडताळणी राज्य सरकारांकडून सुरू झाली आहे. या योजनेचा फायदा खऱ्या शेतकऱ्याला मिळावा हा सरकारचा हेतू आहे. मात्र या योजनेअंतर्गत अपात्र लोकांनीदेखील नोंदणी केली आहे. अशा अपात्र लोकांकडून आता वसूली केली जाणार आहे. पीएम किसान सम्मान निधी योजनेसाठी पात्र नसतानाही नोंदणी करणाऱ्यांच्या ही बाब ध्यानी नाही की त्यांचे नाव, आधार आणि पॅनशी लिंक आहे. त्यामुळे सरकार त्यांच्या नावावरून त्यांच्या उत्पन्नाचे विवरण माहित करून घेते. राज्य सरकारदेखील यासंदर्भातील आकडेवारी तयार करत आहेत.