PMAY-G | घर बनवण्यासाठी सरकार देते सब्सिडीवर कर्ज, पाहा कसा घ्यायचा फायदा

PMAY-G | प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने मोबाइलवर आधारित आवास अॅप बनवले आहे. याला तुम्ही गुगल प्लेस्टोअरवरून डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला मोबाइल नंबरच्या मदतीने यामध्ये लॉग-इन आयडी बनवावा लागेल. यानंतर हे अॅप तुमच्या मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवेल. याच्या मदतीने लॉगिन करून आवश्यक माहिती भरा. अर्ज केल्यानंतर केंद्र सरकार लाभार्थींची निवड करते.

PMAYG
पंतप्रधान आवास योजना ग्रामीण 
थोडं पण कामाचं
  • पीएम आवास याजना ग्रामीण (PMAY-G ) अंतर्गत कमी उत्पन्न गटातील नागरिकांना घरे बनवण्यासाठी सब्सिडीवर कर्ज
  • वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यत असेल तर ६ लाख रुपयांच्या कर्जावर ६.५ टक्क्यांपर्यतची क्रेडिट लिंक्ड सब्सिडी
  • कर्जाचा कमाल कालावधी २० वर्षांचा असला पाहिजे

PMAY-G | नवी दिल्ली : पीएम आवास याजना ग्रामीण (PMAY-G ) अंतर्गत कमी उत्पन्न गटातील (Low Income citizen)नागरिकांना घरे बनवण्यासाठी सब्सिडीवर कर्ज (subsidized loan)दिले जाते. पीएमएवायजी (PMAYG)योजनेनुसार जर तुमचे वार्षिक उत्पन्न ६ लाख रुपयांपर्यत असेल तर ६ लाख रुपयांच्या कर्जावर ६.५ टक्क्यांपर्यतची क्रेडिट लिंक्ड सब्सिडी (Credit linked subsidy)मिळेल. कर्जाचा कमाल कालावधी २० वर्षांचा असला पाहिजे. जर तुम्हाला घर बनवण्यासाठी (Home)अधिक रक्कम हवी असेल तर तुम्हाला त्या अतिरिक्त रकमेवर नेहमीचे व्याज द्यावे लागेल. (PMAY-G : Government gives subsidized loan to build the home, check how to get the benefit)

असा करा अर्ज

प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत अर्ज करण्यासाठी सरकारने मोबाइलवर आधारित आवास अॅप बनवले आहे. याला तुम्ही गुगल प्लेस्टोअरवरून डाउनलोड करू शकता. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला मोबाइल नंबरच्या मदतीने यामध्ये लॉग-इन आयडी बनवावा लागेल. यानंतर हे अॅप तुमच्या मोबाइल नंबरवर ओटीपी पाठवेल. याच्या मदतीने लॉगिन करून आवश्यक माहिती भरा. पीएमएवाय-जी अंतर्गत घर मिळवण्यासाठी अर्ज केल्यानंतर केंद्र सरकार लाभार्थींची निवड करते. यानंतर लाभार्थींची अंतिम यादी पीएमएवाय-जी च्या वेबसाइटवर टाकण्यात येते.

PMAY ग्रामीण लिस्टमध्ये असे चेक करा नाव

सर्वात आधी  rhreporting.nic.in/netiay/Benificiary.aspx या वेबसाइटवर जा. जर रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तो टाका आणि क्लिक करा. यानंतर सर्व माहिती समोर येईल. जर रजिस्ट्रेशन नंबर नसेल तर अॅडव्हान्स सर्च वर क्लिक करा. यानंतर जो फॉर्म येईल त्याला भरा. त्यानंतर सर्च पर्यायावर क्लिक करा. जर तुमचे नाव पीएमएवाय-जी यादीत समाविष्ट असेल तर त्यासंदर्भातील माहिती तिथे दिसेल.

२०१६ मध्ये पीएम आवास योजनेची सुरूवात

पंतप्रधान आवास योजना-ग्रामीण ही भारत सरकारच्या प्रमुख योजनांपैकी एक आहे. याचे उद्दिष्ट २०२२ पर्यत सर्वांना घरे उपलब्ध करून देणे हे आहे. या योजनेअंतर्गत २०२१-२२ पर्यत सर्व पायाभूत सुविधांसह २.१४ कोटी घरांच्या निर्मितीचे उद्दिष्ट आहे. अर्थात या यादीत २.९५ कोटी कुटुंबाचा समावेश होता. अनेक पातळ्यांवर सत्यता तपासल्यानंतर अनेक घरे यासाठी पात्र नसल्याचे आढळून आले होते. नोव्हेंबर २०१६ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योजनेची सुरूवात केली होती. आतापर्यत या योजनेअंतर्गत १,६३,६६,४५९ घरे बनली आहेत. पीएम आवास ग्रामीण योजनेअंतर्गत २,१९,७८९.३९ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे.

पीएम आवास योजनेमुळे अनेकांना घर बांधण्यास आर्थिक लाभ मिळाला आहे. कोरोना महामारीनंतर अनेक बॅंकांनी गृहकर्जाच्या व्याजदरात कपात केली आहे. त्यातच रियल इस्टेटमध्ये सध्या मंदीचे वातावरण आहे. त्यामुळे घर खरेदी करण्यासाठी सध्याची परिस्थिती अनूकूल आहे. तुलनेने कमी किंमतीत घर मिळवता येणे शक्य आहे. अनेक बॅंका गृहकर्जावर ऑफरदेखील देत आहेत. 


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी