ग्राहक रडत पोहचले पीएमसी बँकेत, पैसे काढण्याची मर्यादा १ लाख करण्याची मागणी

काम-धंदा
Updated Sep 25, 2019 | 14:25 IST | टाइम्स नाऊ मराठी

आरबीआयने पीएमसी बँकेतून पैसे काढण्यावर निर्बंध आणले आहे. १ हजार रुपयेच काढण्याची मुभा देण्यात आल्याने अनेक ग्राहक रडत रडत बँकेत पोहचत आहे. खातेदारांनी रिझर्व्ह बँकेला पैसे काढण्याची मर्यादा १ लाख रुपये करण्याच

pmc bank demand by depositors to raise withdrawal limit to rs 1 lakh business news in marathi
ग्राहक रडत पोहचले पीएमसी बँकेत, पैसे काढण्याची मर्यादा १ लाख करण्याची मागणी 

थोडं पण कामाचं

  • रिझर्व बँकने महाराष्ट्रातील पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटीव बँक (पीएमसी) कर्ज वाटपात अनियमिततेनंतर काही निर्बंध लावले आहे
  • यात अंतर्गत खातेदारांना आपल्या खात्यातून केवळ १००० रुपये काढण्याची मर्यादा घालून दिली आहे.
  • पीएमसीला या शिवाय नवे कर्ज देण्यावर आणि जमा करण्यावर बंदी घातली आहे.

मुंबई : रिझर्व बँकने महाराष्ट्रातील पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटीव बँक (पीएमसी) कर्ज वाटपात अनियमिततेनंतर काही निर्बंध लावले आहे. यात अंतर्गत खातेदारांना आपल्या खात्यातून केवळ १००० रुपये काढण्याची मर्यादा घालून दिली आहे. त्यावर खातेदारांचे संरक्षण करणाऱ्या ऑल इंडिया बँक डिपॉझिटर्स असोशिएशन (आयडीबीडीए) ने मंगळवारी खातेदारांच्या हितांच्या संरक्षणाबाबत चिंता व्यक्त केली. 

पीएमसीला या शिवाय नवे कर्ज देण्यावर आणि जमा करण्यावर बंदी घातली आहे. ग्राहकांना सर्वात अधिक चिंता ही सहा महिन्यांपर्यंत केवळ १ हजार रुपये काढण्यासंबंधी आहे. यात एटीएमवरून लेनदेन आणि ऑनलाईन बँकिंगही सामील आहे. 

असोशिएशनचे अध्यक्ष सुनील भंडारे यांनी पीएमसी बँकेच्या खातेदारांचे मूल्य वाचविण्यासाठी केंद्रीय बँकेच्या या पाऊलाचे स्वागत केले आहे. पण त्यांच्या खात्यातून केवळ १ हजार रुपये काढण्याच्या नियमावर प्रश्न उपस्थित केले आहेत. 

त्यांनी सांगितले की, बँकेत लोकांच्या मेहनतीचे पैसे जमा करण्यात आले आहेत. अनेक लोक आपल्या कुटुंबाचा नियमित खर्चाचे पैसे बँकेत जमा करता. काही जणांनी आपल्या आय़ुष्याची बचत पीएमसी बँकेत जमा केली आहे. 

भंडारे यांनी सांगितले की, सहकारी बँकांमध्ये वरिष्ठ नागरिक, मध्यम वर्गातील कुटुंब आपले पैसे जमा करतात. कारण त्यांना या बँकेतून वाढीव दराने व्याज मिळते.  त्यांनी रिझर्व बँकेला विनंती केली की १००० रुपये काढण्याची मर्यादा शिथिल करावी त्यामुळे खातेदारांना भरवसा कायम राहिल. 

जमाकर्त्यांना आपल्या खात्यातून एक लाखांपर्यंतची रक्कम काढण्याची परवानगी देण्यात यावी.जमा विमा आणि कर्ज गॅरेंटी नियमांतर्गत या रकमेपर्यंत विम्याचे संरक्षण आहे. त्यामुळे इतकी रक्कम काढण्याची परवानगी दिली पाहिजे. 

मुंबईच्या भांडूप येथील पीएमसी बँकेच्या मुख्यालयाबाहेर शेकडो लोक जमा झालेल्या लोकांच्या मनात आपल्या खात्यातील पैसे बुडल्याची भीती दिसत होती. बँकेवर निर्बंधाच्या बातमीनंतर लोकांनी मुख्यालयाबाहेर गर्दी केली होती. 

दरम्यान, रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले के पीएमसी बँकेचे लायसन्स रद्द केलेले नाही. त्यामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पीएमसी बँकेच्या शाखांमध्ये पोहचणाऱ्या ग्राहकांमध्ये रिक्षाचालकांपासून छोटे व्यापारी, पेन्शनधारक, गृहिणी आणि वयस्क व्यक्तींचा समावेश आहे. 

डोळ्यात अश्रू असलेल्या महिलेने यावेळी सांगितले की,  मी आज आहे काल काय होईल याचा भरवसा नाही. या बँकेतून ईएमआय जात असल्याने अनेक खातेदार चिंतेत आहे. या बँकेतून हप्ता गेला नाही तर माझा सीबील स्कोअर खराब होऊ शकतो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी